Thursday 18 June 2015

खाद्यपदार्थामधील नॅनोटेक्नोलॉजी



आपण मागे आजार आणि त्यावर नॅनोचे उपाय बघितले. पण हे आजार बहुतांश वेळा निर्माण होतात ते आपल्या खाण्यातून. जे अन्न आपण खातो ते जर व्यवस्थित नसेल, तर आपल्याला आजार होतात. हल्ली बरेच पदार्थ डब्यांमधे pack करून ठेवलेले असतात.. त्या डब्यांना कधी कधी गंज चढतो. तेच बऱ्याच वेळा आपण बाहेरून होटेल मधून वगैरे अन्न मागवतो, ते आपल्याला प्लास्टिकच्या पिशव्यांमधून मिळतं.. तर बरेचसे पदार्थ हे प्लास्टिक मधेच pack केले गेलेले असतात. प्लास्टिक मधे जेव्हा हे अन्न pack केले जाते, तेव्हा अन्नाबरोबर ह्या प्लास्टिकची रासायनिक क्रिया चालू होते आणि असे अन्न वरच्यावर खल्ल्यामुळे आपल्यात हार्मोनल बदल होउ लागतात जे आपल्यासाठी अत्यंत घातक असतात. तसेच बहुतांश वेळा अन्न घरी घेऊन येईपर्यंत ते खराब झालेले असते. आणि ह्या सर्व गोष्टी टाळण्यासाठी, नॅनो टेक्नोलॉजीमुळे अन्न पदार्थ साठवायला जे डब्यासारखं किंवा पिश्व्यांसारखं 'पॅकिंग मटेरियल' वापरलं जातं त्याच्यात सगळ्यात मोठा बदल होईल. 

सिल्वर (चांदी) व titanium dioxideचे नॅनोकण वापरले जाट आहेत ज्यामुळे अन्न खराब होत नाही. त्याचबरोबर चिकणमाती(clay)चे नॅनो कणही वापरले जात आहेत ज्यामुळे हवा, CO2, दमट वायु अन्नापर्यंत पोहचू शकत नाही व अन्न खराब होण्यापासून सुरक्षित राहतं. केमिकल giant Bayer ने Durathene नावाची एक पारदर्शक पातळ फिल्म बनवली आहे ज्यामधे हे चिकणमातीचे नॅनोकण वापरले जात आहेत ज्यामुळे अन्न सुरक्षित ठेवण्यास खुप मदत होत आहे. 


तसेच आपण नव्या प्रकारचे पॅकिंग मटेरियल बनवु शकु. ही मटेरियल्स एवढी छान असतील की आत्ताच्या पत्रायाच्या डब्यासारखा त्यांना गंज वगैरे लागणार नाही किंवा प्लास्टिक सारखी त्यांची अन्नावर रासायनिक क्रियाही होणार नाही. त्यामुळे अन्न पदार्थ जास्ती काळ टीकू शकतील. नॅनो जगातील हे पॅकिंग मटेरियल खुपच 'स्मार्ट' असेल! या पॅकिंग मटेरियलचं काम फक्त अन्न पदार्थ टिकवून ठेवणं एवढंच असणार नाही तर पदार्थाची चाव घेणं, त्याचा वास घेणं, आणि प्रत्येकाला हव्या त्या चवीचा, वासाचा पदार्थ देणं हेही असेल. एखाद्याला जसे खुप तिखट किंवा गोड किंवा जरा अगोड पदार्थ लागतात आणि आपण त्याला ते तसे खाण्यास देतो तसेच काहीसे हे पॅकिंग मटेरियल्ससुद्धा करतील. या पॅकिंग मटेरियलमधे अतिपातळ असे एकावर एक सुक्ष्म थर असतील, त्यांच्यात चवीसाठी लागणारे सगळे पदार्थ साठवलेले असतील. आणि हे कसं मिसळायचे आणि कसे खायचे याच्या सर्व सुचना पाकिटावर असतील... आपल्याला त्या फक्त पाळायच्या.. बास्स्स!!!

या पॅकिंग मटेरियलमधे वेगवेगळ्या वासासाठी वेगवेगळे essenceसुद्धा असतील ज्यामुळे चवीबरोबरच मला हवा तो वास ही देता येईल.. आणि ह्या सर्वाची थोडी फार सुरुवात झाली आहे. 
काय! आश्चर्य वाटत असेल ना हे सर्व वाचून... 

हवी ती चव, हवा तो flavour.. सगळ काही शक्य आहे ह्या एका सूक्ष्म असलेल्या कणातून.... पण ह्याही पलीकडे जाऊन ही नॅनो टेक्नोलॉजी काम करते.. नुसतेच अन्न टिकवून त्याला चव देणं नाही तर अन्न खराब जर झाले तर त्याचा संकेतही आपल्याला मिळू शकेल व त्याचबरोबर एखाद्या पदार्थाला एक tag लावून त्या पदार्थाची सगळी हालहवाल, म्हणजे तो कुठून कुठे फिरतोय, तो एखाद्या विशिष्ट क्षणी कुठे होता, तो खाण्यायोग्य आहे की नाही ही सगळी माहिती आपल्याला मिळु शकेल.. ती कशी हे आपण पाहू पुढच्या लेखात.

- केतकी कुलकर्णी

Tuesday 9 June 2015

पहिला पाऊस…


४ महीने रणरणत्या उन्हात तापणारी ही वसुंधरा भूमी.. वाऱ्याचा लवलेशही नसल्यामुळे स्तब्ध झालेली ती झाडे.. पाण्याच्या उणीवेमुळे सुकलेली ती झाडांची पाने... घामाच्या वाहत असणाऱ्या सततच्या धारा... हे सारे काही म्हणजे हा उन्हाळा!!

Feedback

Name

Email *

Message *