Sunday 28 December 2014

हॅम रेडीओ - 2 - मोर्स कोड

ham radio-morse code

 आंतरराष्ट्रीय मोर्स कोड हे हॅम रेडीओ ऑपरेटरमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. ह्यात हे संदेश प्रेषकयंत्रातून पाठवण्यासाठी उपयोगी पडते. सामान्यतः ह्याचा उल्लेख CW (Continuous Wave) म्हणून केला जातो.
मोर्स कोड ने एखादा संदेश प्रेषकयंत्र म्हणेच transmitter द्वारे पाठवला जातो व समोरच्याला म्हणजेच receiver कडे तो संदेश तसाच्या तसा मिळतो.

Tuesday 23 December 2014

"मायक्रोचिप इम्प्लांट" " 'मेंदूच्या' मक्तेदारीला धोका" - अतीशय सुंदर लेख

हरी ॐ
दि. ६/१२/१४ च्या दैनिक प्रत्यक्ष वर्धापनदिन विशेषांकामधील "मायक्रोचिप इम्प्लांट"  " 'मेंदूच्या' मक्तेदारीला धोका" हा मिहिरसिंह नगरकर ह्यांनी लिहिलेला लेख वाचला.
वाचून अगदी थक्क व्हायला झाले. तंत्रज्ञान हे विकसित होत आहे हे तर आपल्याला माहीतच आहे पण ते ज्या झपाट्याने आणि ज्या पद्धतीने प्रगत होत आहे हे बघितल्यावर कधी कधी पुढे काय होईल ह्याची काळजी वाटल्याशिवाय रहात नाही. मायक्रोचिप इम्प्लांट वाचतना काहीसे असेच माझे ही झाले.

Saturday 20 December 2014

Self Health - By Dr. Aniruddha D Joshi (Sadguru Aniruddha Bapu)

Self Health- Trivikram
Photo Courtesy : Aniruddha Kaladalan

13 डिसेम्बर 2014 रोजी परमपूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापू एक डॉक्टर म्हणून, म्हणजेच Dr. Aniruddha Dhairyadhar Joshi आरोग्यावर जवळ जवळ 5 तास बोलले. ह्यात आता अगदी लहान वयापासून ते म्हातार्‍या लोकांना होणारे कॉमन आजार कुठले ते कशामुळे होतात हे सगळे बापूंनी सांगितले.

Thursday 4 December 2014

हॅम रेडीओ - 1

Ham Radio
अनिरुद्धाज ऍकेडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट अंतर्गत मला हॅम रेडीओचे प्रशिक्षण घेण्याची संधी मिळाली. खुप आधी पासून ह्या विषयाची उत्सुकता होती. आणि परम पूज्य बापूंनी अर्थात माझ्या डॅडनी माझी ही इच्छा पूर्ण केली. याबद्दल मी अंबज्ञ आहे. त्यामुळेच काही लेखांमध्ये आपण हॅम रेडीओची माहीती जाणून घेणार आहोत.

Amateur radio किंवा Ham radio म्हणजे असा समूह ज्यात लोक समोरच्या इतर amateur radio चालकांशी संपर्क साधातांना Transmitters व receiversचा उपयोग करतात. ह्या amateur रेडियो ऑपरेटर्स ना ham रेडियो ऑपरेटर्स किंवा फक्त hams म्हणून ओळखले जाते.
ह्यामधे एक विशिष्ट प्रकारची सांकेतिक भाषा वापरली जाते, ज्याला Morse Code असे म्हणतात.  "डा" (-) व  "डिट" (.) अशा प्रकारची ही भाषा असते. ह्या Morse Code च्या सहाय्याने संदेश गुप्तपणे पाठवण्यास मदत होते.


Poem - 1 _जीवन तुझ्याच शब्दांचा एक ग्रंथ रे


मी काय गाणं गाऊ तुझे
तूच एक गीत रे

Feedback

Name

Email *

Message *