Wednesday 21 December 2016

मर्ल टेलर

असे दृश्य कदाचित दुर्मिळच आपल्याला बघायला मिळत असेल की एखादी व्यक्ती एका विशिष्ट गोष्टीतून किंवा एखाद्या व्यक्तीकडून प्रेरणा घेते आणि त्यानंतर मग त्या व्यक्तीचे आयुष्यच बदलून जाते. एक टर्निंग पॉईंट त्या व्यक्तीच्या जीवनात येतो आणि मग ती प्रेरणाच त्या व्यक्तीची आयुष्यभराची सोबती होऊन राहते. आता तुम्हाला कदाचित प्रश्न पडेल कि मला नक्की काय सांगायचं आहे!!! 
अशीच एक आपले आयुष्य एका छंद असणाऱ्या गोष्टीचे करिअर करून आजही त्याचा पुरेपुर आनंद वेचणारी व्यक्ती म्हणजे मर्ल टेलर.

Monday 12 September 2016

जॉन डाल्टन

     चिकाटी आणि जिद्द माणसाकडे असली, तर त्याच्या समोर कितीही आव्हाने आली, कितीहि विरोध आला, तरी त्याला न जुमानता आपल्या ध्येयाच्या दिशेने योग्य वाटचाल करुन, ते त्यांना हवे ते मिळवतातच.

Wednesday 8 June 2016

हॅम रेडियो - 4

         



लायसेंसचे जनरल आणि रेस्ट्रिक्टेड असे दोन प्रकार असतात हे आपण बघितले. ह्या दोन्ही लायसेंसमधला फरक अगदी संक्षिप्त स्वरुपात बघायचं झालं तर रेस्ट्रिक्टेड मधे सिग्नल पाठवण्यासाठी 50 वॉटच्या पॉवर पर्यन्तच उपयोग होऊ शकतो पण जनरल मधे मात्र पूर्ण 400 वॉट पॉवर वापरता येऊ शकते. तसेच व्ही.एच.एफ. आणि एच.एफ. फ्रीक्वेंसी बैंड्समधे ही फरक असतो. हे पुढे विस्तृतपणे आपण पाहूच


आता हा लायसेंस मिळवण्यासाठी नेमकं काय करावं लागतं हे आपण पाहू. 

Saturday 2 April 2016

हॅम रेडियो - 3

           

          मागच्या लेखात आपण हॅम रेडियोची गरज बघितली. आता पुढे थोडक्यात हॅम म्हणजे काय ते आपण पाहू.
हॅम रेडियो म्हणजेच अमेच्युर रेडियो. अमेच्युरचा अर्थच मुळी हौशि असा आहे. ह्या अमेच्युर रेडियो एक छंद म्हणून वापरला जायचा. लोक हे स्वतःच्या आनंदासाठी, स्वतःचे रेडियो स्टेशन बसवण्यासाठी, जगभरातील व्यक्तींशी संपर्क साधण्यासाठी वापरत.

Wednesday 16 March 2016

हॅम रेडियो - गरज काळाची

          आज आपल्या प्रत्येकाकडे संवाद साधण्याच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. संगणक, मोबाइल्स, इत्यादि गोष्टींचा वापर करून आपण संवाद साधू शकतो. जवळपास आज प्रत्येकाकडेच साध्या फोन्सच्या जागी स्मार्ट फोन आले आहेत, मोठ्या कंप्यूटर्सच्या जागी लॅपटॉप, नोटपॅड वगैरे उपलब्ध झाले आहेत, आणि ह्यामुळे आपण अगदी सहजपणे संभाषण करू शकतो. अगदी साध्या गप्पांपासून ते अगदी इमरजेंसीच्या प्रत्येक गोष्ट आपण ह्या माध्यमांच्या सहाय्याने बोलू शकतो. कधी डायरेक्ट कॉल करून तर कधी व्हाट्सअप, एस एम एस, फेसबुक, ट्विटरवरुन आपण बोलू शकतो. 

Monday 7 March 2016

Happy Women's Day..

         

          काही दिवसांपूर्वीच माझ्या ओळखीमधे असणाऱ्या एका जोडप्याला मुलगा झाला. ते संपूर्ण कुटुंब त्यामुळे अगदी खुश होतं. खुप जल्लोष केला जात होता. सगळीकडे अगदी आनंदाचे वातावरण होते. मीसुद्धा तिथे त्यांना अभिनन्दन करायला गेले होते. तिथे गेल्यावर मुलगा झाला म्हणून अर्थातच सगळे खुपच खुश असल्यामुळे त्यांनी एक छोटासा समारंभ ठेवला होता. मीदेखिल त्या समारंभामधे आनंदाने सहभागी झाले होते. तेवढ्यात

Friday 29 January 2016

नॅनो कॉम्प्यूटर्स

ज्यावेळी कॉम्पुटरचा शोध लागलेला तेव्हा कॉम्पुटर हे जवळजवळ एका खोलीइतक्या मोठ्या आकाराचे होते आणि त्यामानाने त्याचा वेग हा अतिशय कमी होता. मग पुढे पुढे जसजशी प्रगती होत गेली, तसतशी ह्या कॉम्प्यूटर्सचा आकार कमी कमी होत गेला.. 

आता आपल्याकडे अगदी मुबलक प्रमाणात नोटबुक, टॅबलेट पीसी उपलब्ध असतात.. अगदी आपला डेस्कटॉप पीसी पण फ्लॅट, छोट्या आकारामधे आणि जलद वेगाचा असतो.. मग हा नॅनो कॉम्पुटर काय आहे?? ह्यात असं काय वैशिष्ट आहे? ह्याचा आकार किती असेल?? कोणाला काही अंदाज आहे का की किती लहान असेल हा नॅनो कॉम्पुटर??

Wednesday 27 January 2016

ग्रेगॉर मेंडेल..

संशोधन हे कुठेही व कुठल्याही विषयावर केले जाऊ शकते. एखाद्याला जर एखाद्या विषयावर सखोल ञान प्राप्त करुन घ्यायचे असेल, तर त्याच्याकडे अनंत पर्याय असतात. आणि सखोल ञान प्राप्त करत करतच त्याच आधारे, एखादे नवीन काहीतरी शोधले जाऊ शकते. नवीन काही शोधायचे असेल किंवा करायचे असेल, तर त्यासाठी Sky is the limit..

असेच एक वेगळ्याच विषयावर शोध लावणारे संशोधक म्हणजे - ग्रेगॉर मेंडेल. सर्व स्तरांवर वाढत जाणा‍र्‍या गतीने व वेगवेगळ्या शाखांमध्ये होणारे बदल उत्सुकता निर्माण करतात. फक्त निसर्गाच्या देणगीवर संतुष्ट राहून जीवन जगण्य़ाऐवजी, उत्सुकतेच्या बळावर अधिकाधिक संशोधनांचे दरवाजे उघडणारे हे एक थोर वैज्ञानिक.

Monday 25 January 2016

RAJASTHAN....

     


      फिरणं.. ही एक गोष्ट आपल्यातील बहुतांश लोकांना अगदी आवडणारी गोष्ट.. कुठेतरी कधी तरीअसं मस्त चेंज म्हणून फिरून यावं, असं सगळ्यांनाच वाटत असतं. आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनातून, तणावातून एक ब्रेक प्रत्येकालाच हवाहवासा वाटतो. 

Feedback

Name

Email *

Message *