माझे सदगुरु

पिता, सखा आणि सदगुरु


माझ्या आयुष्यातला एक मोठा टर्निंग पॉईंट म्हणजे माझ्या आयुष्यात झालेले बापूंचे आगमन..
आयुष्याकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन देणारा आणि माझे आयुष्यच संपूर्ण सहजतेने बदलणारा हा माझा सदगुरु. 
बापू म्हणजे एक आधार.. भक्कम आधार.. जो कधीही सोडून जात नाही.
बापू म्हणजे एक असा मित्र जो कधीही दगा देत नाही.. एकमेव साथी जो अखेरपर्यंत सोबत करतो.
बापू म्हणजे माझे डॅड जे लेकीचे सर्व उचित हट्ट प्रेमाने पूर्ण करतात. 
बापूंकडे येणे यापेक्षा बापूंचे होणे हे जास्त गरजेचे असते. आणि एकदा का कोणी याचा झाला की त्याच्या आयुष्याचा प्रवास केवळ आनंदाच्या आणि सुखाच्या दिशेने सुरु होतो. कारण हेच तर बापूंचे ब्रीद वाक्य आहे....
"अवघाचि संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोका"

नृत्य म्हणू नका, दिग्दर्शन म्हणू नका, गायन म्हणू नका.. अगदी दगडातून मूर्ति कोरण्यापासून ते प्राचीन असलेल्या बल विद्या पर्यंत प्रत्येक गोष्टीत बापूंचे ज्ञान अगाध आहे. M.D Medicine मधले एक डॉक्टर आहेत पण तरीसुद्धा homeopathy चे ही संपूर्ण ज्ञान त्यांना आहे. किंबहुना ते स्वतः हे शिकले आहेत. वैद्यकीय क्षेत्रा व्यतिरिक्त ही टेक्नोलॉजीचे ही भरभरून ज्ञान त्यांच्या जवळ आहे. अशी कुठलीच गोष्ट जगात नाही ज्याचे ज्ञान माझ्या बापूंकडे नाही. अहोरात्र मेहनत घेऊन हे मिळविलेले ज्ञान आहे. नुसते ज्ञान नाही मिळविले तर त्या ज्ञानाचा वापर विकासासाठी, प्रबोधनासाठी ते करत असतात. का? कोणासाठी? तर त्यांच्या सार्‍या श्रद्धावान मित्रांसाठी. श्रद्धाहीनांच्या गर्तेत सापडलेल्या अजाण लेकारांसाठी...

अध्यात्म आणि विज्ञान ह्यांची उत्तम सांगड घालून प्रपंच कसा सुरेखपणे करायचा हे शिकवतो हा माझा बापू.

सर्वात महत्वाची गोष्ट बापूंनी शिकवली ती म्हणजे प्रत्येक कार्य पावित्र्य आणि मर्यादेच्या अधिष्ठानानेच करणे! आणि त्याच बरोबर कुठलीही गोष्ट करताना त्यात वास्तवाचे भान ठेवणे.
असा माझा शिक्षक.. माझा सद्गुरु.. म्हणजे डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी! 
म्हणजेच माझे बापू!

2 comments:

nileshlok2025 said...

Mast. Khup chaan mahiti lihili aahe. Good presentation of blog.

Viraj Sarode said...

Apratim......

Post a Comment

Feedback

Name

Email *

Message *