Wednesday 25 November 2015

चार्ल्स थामसन रीस विल्सन

Charles Thomson Rees Wilson



आज आपण पाहतो की अनेक नवनवीन संशोधनं होत आहेत आणि ह्याच संशोधनांच्या आधारे आपल्या जीवनात एक प्रकारची सहजता येऊ लागली आहे.
 संशोधनांचे काही उदाहरणं म्हणजे.....

आपल्याला हे चित्रपटांमधुन किंवा ऐकून हे माहीत आहे की सुरुवातीच्या काळामधे काबूतरांमार्फत संदेश पोचवला जाई..तेच आजच्या काळात आपण बघितलं तर आज अगदी साता समुद्रापालिकडेही माणूस दूरध्वनी वरून किंवा वीडियो कॉलिंग च्या सहाय्याने सहज बोलू शकतो...
घारीचे उदाहरण घेऊन विमानाचा शोध लावण्यात आला आणि ह्यामुळे आज आपल्याला परदेश गमनागमन एकदम सोपे झाले आहे..
सुरवातीच्या काळामधे संगणक हे एक अतिशय मोठे व अवजड असे यंत्र होते व प्रत्येकाच्या आवाक्याच्याही बाहेर होते पण तेच आज हे अगदी छोट्या आकारामधे (टॅब, नोटबुक... ) उपलब्ध आहेत आणि परवडणारेही आहे..
असे अनेक संशोधन आपण आजच्या जगात बघत आहोत.. हे सारे शक्य होऊ शकले ते मानवाने केलेल्या नवीन विचार व शोधांमुळे.. हे संशोधन निर्माण होतात ते व्यवस्थित केलेल्या निरिक्षण व अभ्यासामुळे.. एखादी गोष्ट किंवा घटना कशी घडली, का घडली ह्याचा योग्य रीतीने अभ्यास केल्यावर ही असे शोध लागतात.. असेच अनेक शोध लावणारे बरेच संशोधक ह्या आपल्या संपूर्ण जगाला लाभले व त्यांच्यामुळे आपले जीवन आज बऱ्यापैकी सोपे झाले आहे..

Tuesday 28 July 2015

A salute to Dr Abdul Kalam..

काल रात्री अगदी वाऱ्याच्या वेगाने डॉ. अब्दुल कलाम ह्यांच्या निधनाची वार्ता सर्वत्र पसरली.. ऐकून एक धक्काच बसला.. क्षणभर स्वतःवर विश्वासच बसत नव्हता.. 
डॉ. ए. पी. जे.अब्दुल कलाम हे एक थोर शास्त्रज्ञ होते. आणि एवढेच नाही तर त्यांना 40 देशांतील विद्यापीठांमधुन डॉक्टरेट ही पदवी ही बहाल केलेली होती व त्याचबरोबर पद्मभूषण, पद्मविभूषण, भारतरत्न असे पुरस्कारही त्यांना मिळालेले होते. 

Monday 13 July 2015

स्मार्ट फूड पॅकिंग

आपण अनेक वेळा काही खाद्य पदार्थ बाजारातून आणतो आणि घरी येईपर्यंत ते बहुतेक वेळेला खराब होतात.. काही वेळेला आपल्याला समजतसुद्धा नाही की नक्की हा पदार्थ खाण्या योग्य आहे की नाही.. आणि म्हणूनच आपल्याला तो खाद्य पदार्थ चांगला आहे की नाही हे आधीच कळण्यासाठी आता नॅनोसंवेदक (NANOSENSORS) वापरण्यात येणार आहेत.  

Tuesday 7 July 2015

एकांत


असेच सायंकाळी एका
मन रमले होते एका विश्वातच वेगळ्या
बाहेरही ढग जमुनी आले होते सारे
पसरली होती चोहिकडे अगदी निरव अशी शांतता

कसला ही आवाज नाही
नाही कुठलीही हालचाल
झाडांनाही अलगदच
स्पर्श होत होता वाऱ्याचा

बाहेर होती निव्वळ शांतता
मनात मात्र होता कल्लोळ विचारांचा
बाहेरील शांतता पाहून 
मनातला गोंधळ क्षणभर थांबला
वाटले जरा अनुभवावा 
कधीतरी एकांत हा

स्वतःशीच बोलावे अन 
स्वतःशीच हसावे
अगदी मनमुरादपणे, 
स्वतःशीच भांडावे
वाटले कधी रडावेसे तर 
भरपूर रडून ही घ्यावे
बांध सारे तोडून, 
सर्व भावनांना बेछूटपणे वाहू द्यावे

नको कोणते संभाषण
नको कुठल्या भेटी गाठी
सोडुनी भ्रांत साऱ्या
स्वतःच स्वतःमधे रंगून जावे

नाही कोणी रोखायला,
नाही कोणी टोकायला
पाहिजे तसे पाहिजे तेव्हा, 
मोकळे आपण बागडायला
सर्वांमधे राहून ही 
'एकटे' तर बरेच राहतात
पण एकांतात राहुनही 
मेळाव्याचा भास घेणारे तसे कमीच असतात.. 

- केतकी कुलकर्णी 

Thursday 18 June 2015

खाद्यपदार्थामधील नॅनोटेक्नोलॉजी



आपण मागे आजार आणि त्यावर नॅनोचे उपाय बघितले. पण हे आजार बहुतांश वेळा निर्माण होतात ते आपल्या खाण्यातून. जे अन्न आपण खातो ते जर व्यवस्थित नसेल, तर आपल्याला आजार होतात. हल्ली बरेच पदार्थ डब्यांमधे pack करून ठेवलेले असतात.. त्या डब्यांना कधी कधी गंज चढतो. तेच बऱ्याच वेळा आपण बाहेरून होटेल मधून वगैरे अन्न मागवतो, ते आपल्याला प्लास्टिकच्या पिशव्यांमधून मिळतं.. तर बरेचसे पदार्थ हे प्लास्टिक मधेच pack केले गेलेले असतात. प्लास्टिक मधे जेव्हा हे अन्न pack केले जाते, तेव्हा अन्नाबरोबर ह्या प्लास्टिकची रासायनिक क्रिया चालू होते आणि असे अन्न वरच्यावर खल्ल्यामुळे आपल्यात हार्मोनल बदल होउ लागतात जे आपल्यासाठी अत्यंत घातक असतात. तसेच बहुतांश वेळा अन्न घरी घेऊन येईपर्यंत ते खराब झालेले असते. आणि ह्या सर्व गोष्टी टाळण्यासाठी, नॅनो टेक्नोलॉजीमुळे अन्न पदार्थ साठवायला जे डब्यासारखं किंवा पिश्व्यांसारखं 'पॅकिंग मटेरियल' वापरलं जातं त्याच्यात सगळ्यात मोठा बदल होईल. 

सिल्वर (चांदी) व titanium dioxideचे नॅनोकण वापरले जाट आहेत ज्यामुळे अन्न खराब होत नाही. त्याचबरोबर चिकणमाती(clay)चे नॅनो कणही वापरले जात आहेत ज्यामुळे हवा, CO2, दमट वायु अन्नापर्यंत पोहचू शकत नाही व अन्न खराब होण्यापासून सुरक्षित राहतं. केमिकल giant Bayer ने Durathene नावाची एक पारदर्शक पातळ फिल्म बनवली आहे ज्यामधे हे चिकणमातीचे नॅनोकण वापरले जात आहेत ज्यामुळे अन्न सुरक्षित ठेवण्यास खुप मदत होत आहे. 


तसेच आपण नव्या प्रकारचे पॅकिंग मटेरियल बनवु शकु. ही मटेरियल्स एवढी छान असतील की आत्ताच्या पत्रायाच्या डब्यासारखा त्यांना गंज वगैरे लागणार नाही किंवा प्लास्टिक सारखी त्यांची अन्नावर रासायनिक क्रियाही होणार नाही. त्यामुळे अन्न पदार्थ जास्ती काळ टीकू शकतील. नॅनो जगातील हे पॅकिंग मटेरियल खुपच 'स्मार्ट' असेल! या पॅकिंग मटेरियलचं काम फक्त अन्न पदार्थ टिकवून ठेवणं एवढंच असणार नाही तर पदार्थाची चाव घेणं, त्याचा वास घेणं, आणि प्रत्येकाला हव्या त्या चवीचा, वासाचा पदार्थ देणं हेही असेल. एखाद्याला जसे खुप तिखट किंवा गोड किंवा जरा अगोड पदार्थ लागतात आणि आपण त्याला ते तसे खाण्यास देतो तसेच काहीसे हे पॅकिंग मटेरियल्ससुद्धा करतील. या पॅकिंग मटेरियलमधे अतिपातळ असे एकावर एक सुक्ष्म थर असतील, त्यांच्यात चवीसाठी लागणारे सगळे पदार्थ साठवलेले असतील. आणि हे कसं मिसळायचे आणि कसे खायचे याच्या सर्व सुचना पाकिटावर असतील... आपल्याला त्या फक्त पाळायच्या.. बास्स्स!!!

या पॅकिंग मटेरियलमधे वेगवेगळ्या वासासाठी वेगवेगळे essenceसुद्धा असतील ज्यामुळे चवीबरोबरच मला हवा तो वास ही देता येईल.. आणि ह्या सर्वाची थोडी फार सुरुवात झाली आहे. 
काय! आश्चर्य वाटत असेल ना हे सर्व वाचून... 

हवी ती चव, हवा तो flavour.. सगळ काही शक्य आहे ह्या एका सूक्ष्म असलेल्या कणातून.... पण ह्याही पलीकडे जाऊन ही नॅनो टेक्नोलॉजी काम करते.. नुसतेच अन्न टिकवून त्याला चव देणं नाही तर अन्न खराब जर झाले तर त्याचा संकेतही आपल्याला मिळू शकेल व त्याचबरोबर एखाद्या पदार्थाला एक tag लावून त्या पदार्थाची सगळी हालहवाल, म्हणजे तो कुठून कुठे फिरतोय, तो एखाद्या विशिष्ट क्षणी कुठे होता, तो खाण्यायोग्य आहे की नाही ही सगळी माहिती आपल्याला मिळु शकेल.. ती कशी हे आपण पाहू पुढच्या लेखात.

- केतकी कुलकर्णी

Tuesday 9 June 2015

पहिला पाऊस…


४ महीने रणरणत्या उन्हात तापणारी ही वसुंधरा भूमी.. वाऱ्याचा लवलेशही नसल्यामुळे स्तब्ध झालेली ती झाडे.. पाण्याच्या उणीवेमुळे सुकलेली ती झाडांची पाने... घामाच्या वाहत असणाऱ्या सततच्या धारा... हे सारे काही म्हणजे हा उन्हाळा!!

Saturday 23 May 2015

एक आगळी वेगळी कविता..... :-)


कविता आणि लेख एकदा
असेच एकमेकांना येऊन भेटले
दोघेही मग नकळतच
गप्पांमधे रंगून गेले

लेखास कविता बोलू लागली
तुझी किमया तर लय न्यारी
इवलासा शब्द मिळाला जरी
अख्खे एक पुस्तक लिहिले जाते भारी

असो कोणती प्रेमाची कादंबरी
वा असो कुठली थ्रिलर स्टोरी
तुझ्यातल्या शृंगारिकतमुळे वाचतांना 
त्यात निर्माण होते एक वेगळीच गोडी

ह्यावर लेख म्हणाला..
तुझे ही कौतुक काही कमी नाही
तुझ्यात झळकते ती शब्दांची रोषणाई
सुरेल सुमधुर यमकांचा मेळ बसुनी
चारोळ्या अन त्रिवेणीतूनही तू नटतेस भारी

तुझ्यातल्या नाजूक हळुवारपणाने
लोक होती घायाळ जागीच
तुझ्यातील तन्मय अर्जवाने
पाषाणास ही पाझर फूटती

दोघेही मग एकमेकांस म्हणाले
लेख-कविता ही जोडीच आगळी
एकात श्रृंगारिकता तर एकात अदाकारी
दोघेही आपण बोधकारी

असेच शब्दांच्या खेळामधुनी
लोकांपर्यंत पोचत राहु
आपल्या ह्या कलेच्या प्रेमात पाडण्यासाठी
लोकांना उद्युक्त करत राहु


-  केतकी कुलकर्णी 

Friday 22 May 2015

आजार मोठा उपाय नॅनो - 2


मागच्या लेखात आपण cancer वर नॅनो टेक्नॉलॉजी कशी उपयोगी ठरू शकते हे बघितले. आता आपण पुढे अजून कुठे कुठे वैद्यकीय शास्त्रात ह्याचा उपयोग होतो हे थोडक्यात बघू. 

आज एक आजार अत्यंत कॉमन झालेला आहे, तो म्हणजे मधुमेह (डायबेटीस)… मधुमेह एकदा झाला की मग संपलं.

Saturday 2 May 2015

आजार मोठा उपाय नॅनो







आमच्या ओळखीतील एक आजोबा कॅन्सरची ट्रिटमेंट घेत असताना वारले. त्यांना कधीही व्यसन नव्हते. त्यांचे खाणे पिणे व्यवस्थीत होते. उभ्या आयुष्यात कधी कोणता मोठा आजार झाला नाही आणि उतारवयात लक्षात आले ते थेट कॅन्सर....लास्ट स्टेज..सारेच हळहळले. पण आता जाण्याचेच वय त्यात काय खंत करायची असे म्हणत त्यांनी ही धीराने घेतले आणि घरातल्या सगळ्यांना धीर दिला म्हणून सगळे या दुःखातून लवकर सावरले. परंतु त्यानंतर काही दिवसातच ४०-४५ वय असलेल्या एका मैत्रीणीचा कॅन्सरने मृत्यू झाल्याची बातमी धडकली आणि आधीपेक्षा जास्त सुन्न व्हायला झाले....४०-४५ हे काय वय आहे जाण्याचे....त्यानंतर अगदी विशीतल्या मुलाला देखील कॅन्सर झाल्याचे कानावर आले. एका पाठॊपाठ एक घटना समोर आल्यावर विचारचक्र आपोआप सुरु झाले की अचानक हा कॅन्सर सारखा आजार बळावला कसा? याने माझे डोके ठणकू लागले.

Tuesday 28 April 2015

बळीराजा बळी




काय करू कूटं जाऊ
काय बी कळंना
कुनास साद घालू कसी घालू
काय बी सुधरंना

Monday 13 April 2015

विश्व नॅनो टेक्नोलॉजीचे!!!

नॅनो टेक्नोलॉजी.. 

सध्या एक अतिशय चर्चेत असलेला हा विषय.. ह्यास विज्ञान जगातील एक चमत्कार जरी म्हटले तरी काही वावगे ठरणार नाही.. अशी ही टेक्नोलॉजी.. काय आहे असे ह्यामधे? नक्की काय आहे ह्या टेक्नोलॉजीमध्ये??
मुळात नॅनो म्हणजे काय.. हे आपण आधी बघू.. 

Tuesday 24 March 2015

कोल्हापुर वैद्यकीय व आरोग्य शिबिर...


बापुंच्या कृपेने कोल्हापुर वैद्यकीय व आरोग्य शिबिरामधे भाग घेण्याची ह्या वेळेला मिळालेली ही तिसरी संधी..
ह्या शिबिराची व्यापकता व महत्त्व आपल्यातील प्रत्येकालाच माहीत आहे. ह्या शिबिरामधे मी जे काही बघितले, अनुभवले, ऐकले ते सर्व गावकर्यांच्या दृष्टीने एका संवादात्म्क पद्धतीने मांडण्याचा केलेला हा एक छोटा प्रयास!
दोन स्त्रियांधील हा संवाद!!!!

Saturday 21 March 2015

गुढी पाडवा

                                   
 एखादी व्यक्ति ह्या दिवशी मुद्दाम आपल्याला विचारते "आज काय आहे?" आणि आपण पटकन बोलून जातो "आज पाडवा".. असे बोलून होते न होते तेच समोरून उत्तर येते "नीट बोल गाढवा".
आणि हे अगदी आपण सारेच एक विनोद म्हणून सहज बोलत असतो. एक विनोदाचा भाग सोडला तर...
सहज जरा विचार केला ह्यावर.. की असं का बरे बोलायला चालु केले असेल कोणी! इतका सुरेख सण हा आपल्या हिंदू धर्माताला.. आणि ह्या दिवशी असे का बोलत असावे. पाडव्याला गाढवा हाच का शब्द वापरला गेला.. ती rhyme पूर्ण करायला काही तरी चांगल्या शब्दाचाही उपयोग नाही का होउ शकत..?

Tuesday 3 March 2015

एक आगळे वेगळे नाते.. नाते बहिण-भावाचे!!

दि. ३ मार्च २०१५च्या प्रत्यक्ष दैनिकातील अजितसिंह पाध्ये ह्यांनी लिहिलेली कविता वाचली.. "गोष्ट एका बहिणीच्या दादाची".. कविता वाचली आणि टचकन डोळ्यात पाणी आलं..
बहिणीचे व तिच्या दादाचे प्रेम किती सुंदरपणे मांडले आहे.

Friday 13 February 2015

भांडण प्रेमाचे.....

भांडण प्रेमाचे.....


असे म्हणतात भांडणातून प्रेम वाढत जाते...
असे म्हणतात भांडणातून प्रेम वाढत जाते
असेच एकदा तिने ठरवले
प्रेमाचे छोटे भांडण करावे

Thursday 12 February 2015

...प्रेम...

...प्रेम...


मुक्या भावनांना मिळे
डोळ्यात वास
हृदयातील शब्दाना असे
ओठांचा ध्यास

Tuesday 10 February 2015

कोल्हापुर वैद्यकीय व आरोग्य शिबिर..

कोल्हापुर वैद्यकीय व आरोग्य शिबिर..

फेब्रुवारी 2015!!!!
ह्या महिन्याच्या सुरुवातिचेच 2 दिवस माझ्या आयुष्यात कायमचे कोरले गेले आहेत.
मला बरेच काही शिकवून गेले हे 2 दिवस.. किती तरी गोष्टींची जाण करून गेले हे 2 दिवस..
असे काय होते ह्या 2 दिवसांमधे..
तर परमपूज्य अनिरुद्ध बापूंच्या कृपेने व प्रेरणेने होत असलेले कोल्हापुर वैद्यकीय व आरोग्य शिबिर!!!
दर वर्षी जानेवारी महिन्यामधे हे शिबिर आयोजित करण्यात येते. 
अवाढव्य अशा ह्या शिबिरात बरेच गावकरी सहभाग घेत व ह्याचा लाभ घेत.

Friday 23 January 2015

विश्वास!!!

कधी कधी आपण एखाद्याला विचारतो, 
"काय, इतका पण विश्वास नाही का माझ्यावर?" 
तेव्हा ह्यावर अगदी सहज उत्तर काही वेळा दिलं जातं...
"विश्वास तर पाणिपतच्या लढाईत मेला"
खरच ना! आपल्या प्रत्येकाच्या जीवनात वैयक्तिक पातळीवर ही पानीपतची लडाई सुरूच असते..आणि ह्यामधे बळी जातो तो विश्वासाचा.
आणि एखाद्याच्या विश्वासाचा बळी जाणं म्हणजेच त्या व्यक्तीचा विश्वासघात होणं. आणि हा विश्वासघात होणं म्हणजेच आपण ज्याला म्हणतो एखाद्याच्या पाठीत खंजीर खुपसणं!
आणि ह्या अश्या परिस्थितीतून आपल्यातील प्रत्येक जण गेलेला असतो. कोणीही ह्याला अपवाद नाही.. 
आपण एखाद्या व्यक्तिवर खुप विशवास ठेवतो, अगदी किती तरी वर्षांच्या ओळखीतून एक बांधीलकि निर्माण झालेली असते आणि त्यातूनच पुढे मग हा विश्वास develop झालेला असतो.. आणि मग एक दिवस असा एक क्षण येतो की ती व्यक्ति मग काही स्वार्थामुळे म्हणा, किंवा कुठल्याही कारणासाठी म्हणा, आपल्या त्या विश्वासाला तडा द्यायला जरा ही मागे पुढे बघत नाही. आणि मग जेव्हा ही गोष्ट आपल्याला समजते तेव्हा मग एका क्षणासाठी काळजात असे चर्रर होऊन जाते आणि मग आपले मन असंख्य प्रश्नांच्या विळख्यात जखडले जाते... "का? कशासाठी? आपण काय ह्याचे वाईट चिंतले होते किंवा काय ह्याचे घोडे मारले होते? का असा विश्वासघात केला?" असे एक ना अनेक प्रश्न लहरी मनात तरंगायला लागतात. पण ह्याचे उत्तर काही सापडत नाही आणि मग नाईलाजाने गप्प बसावे लागते.. ह्यातूनच मग हळूहळू असे होत जाते की आपले मन कोणावरही विश्वास ठेवायला तयार नसते. आणि मग अविश्वासाचे जाळे पसरत जाते आणि आपण सर्वच ह्या जाळ्यात मग अडकून जातो. 
कधी कधी खरेच असे  वाटते की जर प्रत्येकाने असे ठरवले की.. मी माझ्या अगदी जवळ असणाऱ्या व्यक्तिशी तरी कायम प्रामाणिक राहील, किमान प्रत्येक जण एका तरी व्यक्तीच्या विश्वासाला तडा जाणार नाही ह्याची काळजी घेईल तर कदाचित ह्या सध्या मजबूत झालेल्या  अविश्वासाच्या जाळयातून बाहेर पडायला सोपे होईल, नाही का? 
जर ही गोष्ट आपल्या स्वतःपासूनच सुरु करायचा प्रयास केला तर?

Monday 19 January 2015

विचार

आपण सर्वच जण ह्या शब्दाशी जोडले गेलेलो आहोत. विचार करणे ही एक आपल्या आयुष्यातील एक अविभाज्य गोष्ट बनलेली आहे. आपल्या आयुष्यात श्वासोच्छ्वासाचे जे महत्त्व आहे तेवढेच महत्व मला वाटते विचार ह्या गोष्टीला आहे. फरक इतकाच की माझी श्वास घेण्याची क्रिया माझ्या जन्माच्या आधिपासूनच म्हणजे आईच्या गर्भात असल्यापासूनच चालू होते व विचार करण्याची क्रिया मी जन्माला आल्यानंतर चालु होते. अगदी लहान बाळ सुद्धा विचार करतच असत.. आपण बघतो ना की कधी कधी मधेच बाळ खुदकन हसतं, मधेच रडतं.. कोणाकडे जातं खेळायला तर कोणाकडे पाठ फिरवतं.. तेव्हा त्याच्या ही मनात, डोक्यात विचार चालूच असतील ना! फक्त त्याला हे समजत नसते की आपण विचार करत आहोत.. इतकेच!

Friday 9 January 2015

प्रवास.....

ट्रेन पकडण्यासाठी प्लॅटफॉर्म वर आले. भरपूर गर्दी होती.. ट्रेन ची वाट बघत सगळे उभे होते... एकदाचि ट्रेन आली आणि सगळ्यांची जी ट्रेनमधे चढण्यासाठी ओढाताण सुरु झाली की काही बघायलाच नको.. कसेतरी धक्काबुक्की करत, ट्रेन मधे घुसले.. तर पुन्हा आतमधे पण गाडी भरलेलीच की! कस तरी वाट काढत काढत आत जायचा प्रयास केला आणि उभ राहण्यासाठी एक कोपरा पकडला.. हुश्श्! सुटकेचा श्वास सोडला..पण खरच अगदी भर गर्दीच्या वेळेत ट्रेन मधून प्रवास करण म्हणजे खर तर एक अत्यंत दिव्य काम आहे!!

आपल्या आयुष्यसुद्धा असेच असते नाही का? 

Thursday 1 January 2015

कनेक्शन


Connection
अगदी रोजच्या वापरातला किती महत्वाचा शब्द आहे ना हा!
अगदी तंत्रज्ञानापासून ते आपल्या रोजच्या जीवनात ह्या शब्दाचा समावेश होतो. 
हल्ली तर सोशल मिडीया साइट्सवर हा शब्द हमखास वापरला जातो. बेसिकली Connection म्हणजे जोडणे.. 
मी अमुक अमुक व्यक्तिशी फेसबुक किंवा ट्वीटर किंवा आणखी कुठे कनेक्ट झालो म्हणजेच माझा त्या व्यक्ति बरोबर फेसबुक किंवा इतर माध्यमांद्वारे संपर्क जोडला गेला..

Feedback

Name

Email *

Message *