४ महीने रणरणत्या उन्हात तापणारी ही वसुंधरा भूमी.. वाऱ्याचा लवलेशही नसल्यामुळे स्तब्ध झालेली ती झाडे.. पाण्याच्या उणीवेमुळे सुकलेली ती झाडांची पाने... घामाच्या वाहत असणाऱ्या सततच्या धारा... हे सारे काही म्हणजे हा उन्हाळा!!
असेच हे दिवस रेटत असतांना मधेच अचानक एक दिवस एक मंद असा मातीचा सुगंध दरवळायला लागतो.. सगळीकडे एक असे शांत पण प्रसन्न आणि थंड वातावरणाची निर्मीती होते. स्तब्ध असलेली ती झाडे हळुवारपणे डोलू लागतात, कोमेजुन गेलेल्या त्या पानांना पालवी फुटू लागते, तापलेल्या ह्या वसुंधरा आईला, पाण्याचा अलगद स्पर्श होऊन मिळालेला एक सुखद विसावा.. हाच तो पहिला पाऊस..
फक्त आपण माणसेच नाही तर पशु पक्षी, झाडे फुले सगळी अगदी आतुरतेने ज्याची वाट बघतात तो हा पहिला पाऊस. ह्या पहिल्या पाऊसाची मजा काही वेगळीच असते ना? सगळा माहोल एका क्षणात काही वेगळाच होऊन जातो. शीतलता, प्रेम, एक मादक सुगंध, आनंद घेऊन हा पहिला पाऊस आपल्या प्रत्येकाला भेटायला येतो. आणि अशा पाऊसाचे स्वागत आपण कधी ह्यात भिजुन, तर कधी चहा-शिऱ्याचा स्वादिष्ट बेत आखुन करतो..

उन्हातून तापून निघालेल्या सर्वांनाच एक दिलासा देऊन जातो हा पाऊस..
कधी कधी वाटते, आपण ही असेच पहिल्या पाऊसासारखीच असतो तर! आपल्या येण्याने, आपल्या सहवासाने वातावरण प्रसन्न व्हायला पाहिजे, सगळीकडे आनंद पसरला पाहिजे, आपल्या येण्याने इतरांना त्रास नाही तर छान वाटले पाहिजे. हा पाऊस कधी विचार करत नाही, की मला इथे पडायला जास्ती आवडते, मग मी इथेच पडणार, तिकडे मला त्रास होतो, मग तिथे मी फिरकणार ही नाही.. तो सगळीकडे सारखाच पडतो. मग पहिल्यांदा पडणार असो की शेवटी शेवटी पडणार असो.. तो सगळीकडे पडतोच. कधीही कुठलाही भेदभाव ह्याच्याकडे नाही.. पाऊसाला कधीही कुठला पैसा अडका ही लागत नाही. आपण नेहमी गाण म्हणतो..
ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा
पैसा झाला "खोटा" पाऊस आला मोठा..
ह्यातच कळून येते.. त्याला पैसा ही लागत नाही... खरच.. खूप काही शिकवून जातो हा पाऊस आपल्याला.. नाही का?
आता ह्या आपल्या रिमझिमणाऱ्या पाऊसाने आपल्या साऱ्यांच्याच मनात शिरकाव केलेला आहेच. चला तर मग.. आपण ही सारेच ह्या पाऊसाची मजा लुटूया, अन सोबत शिरा, खारावलेले शेंगदाणे अन चहाचा बेत आखूया..
काय मग, येताय ना..

- केतकी कुलकर्णी
1 comments:
Very nice article Ketaki. Nice thought you have put that our presence should be feeler like first rain.
It is really so lovely experience of first rain which pleases our motherland as well as every one.
Post a Comment