Friday 23 January 2015

विश्वास!!!

कधी कधी आपण एखाद्याला विचारतो, 
"काय, इतका पण विश्वास नाही का माझ्यावर?" 
तेव्हा ह्यावर अगदी सहज उत्तर काही वेळा दिलं जातं...
"विश्वास तर पाणिपतच्या लढाईत मेला"
खरच ना! आपल्या प्रत्येकाच्या जीवनात वैयक्तिक पातळीवर ही पानीपतची लडाई सुरूच असते..आणि ह्यामधे बळी जातो तो विश्वासाचा.
आणि एखाद्याच्या विश्वासाचा बळी जाणं म्हणजेच त्या व्यक्तीचा विश्वासघात होणं. आणि हा विश्वासघात होणं म्हणजेच आपण ज्याला म्हणतो एखाद्याच्या पाठीत खंजीर खुपसणं!
आणि ह्या अश्या परिस्थितीतून आपल्यातील प्रत्येक जण गेलेला असतो. कोणीही ह्याला अपवाद नाही.. 
आपण एखाद्या व्यक्तिवर खुप विशवास ठेवतो, अगदी किती तरी वर्षांच्या ओळखीतून एक बांधीलकि निर्माण झालेली असते आणि त्यातूनच पुढे मग हा विश्वास develop झालेला असतो.. आणि मग एक दिवस असा एक क्षण येतो की ती व्यक्ति मग काही स्वार्थामुळे म्हणा, किंवा कुठल्याही कारणासाठी म्हणा, आपल्या त्या विश्वासाला तडा द्यायला जरा ही मागे पुढे बघत नाही. आणि मग जेव्हा ही गोष्ट आपल्याला समजते तेव्हा मग एका क्षणासाठी काळजात असे चर्रर होऊन जाते आणि मग आपले मन असंख्य प्रश्नांच्या विळख्यात जखडले जाते... "का? कशासाठी? आपण काय ह्याचे वाईट चिंतले होते किंवा काय ह्याचे घोडे मारले होते? का असा विश्वासघात केला?" असे एक ना अनेक प्रश्न लहरी मनात तरंगायला लागतात. पण ह्याचे उत्तर काही सापडत नाही आणि मग नाईलाजाने गप्प बसावे लागते.. ह्यातूनच मग हळूहळू असे होत जाते की आपले मन कोणावरही विश्वास ठेवायला तयार नसते. आणि मग अविश्वासाचे जाळे पसरत जाते आणि आपण सर्वच ह्या जाळ्यात मग अडकून जातो. 
कधी कधी खरेच असे  वाटते की जर प्रत्येकाने असे ठरवले की.. मी माझ्या अगदी जवळ असणाऱ्या व्यक्तिशी तरी कायम प्रामाणिक राहील, किमान प्रत्येक जण एका तरी व्यक्तीच्या विश्वासाला तडा जाणार नाही ह्याची काळजी घेईल तर कदाचित ह्या सध्या मजबूत झालेल्या  अविश्वासाच्या जाळयातून बाहेर पडायला सोपे होईल, नाही का? 
जर ही गोष्ट आपल्या स्वतःपासूनच सुरु करायचा प्रयास केला तर?

Monday 19 January 2015

विचार

आपण सर्वच जण ह्या शब्दाशी जोडले गेलेलो आहोत. विचार करणे ही एक आपल्या आयुष्यातील एक अविभाज्य गोष्ट बनलेली आहे. आपल्या आयुष्यात श्वासोच्छ्वासाचे जे महत्त्व आहे तेवढेच महत्व मला वाटते विचार ह्या गोष्टीला आहे. फरक इतकाच की माझी श्वास घेण्याची क्रिया माझ्या जन्माच्या आधिपासूनच म्हणजे आईच्या गर्भात असल्यापासूनच चालू होते व विचार करण्याची क्रिया मी जन्माला आल्यानंतर चालु होते. अगदी लहान बाळ सुद्धा विचार करतच असत.. आपण बघतो ना की कधी कधी मधेच बाळ खुदकन हसतं, मधेच रडतं.. कोणाकडे जातं खेळायला तर कोणाकडे पाठ फिरवतं.. तेव्हा त्याच्या ही मनात, डोक्यात विचार चालूच असतील ना! फक्त त्याला हे समजत नसते की आपण विचार करत आहोत.. इतकेच!

Friday 9 January 2015

प्रवास.....

ट्रेन पकडण्यासाठी प्लॅटफॉर्म वर आले. भरपूर गर्दी होती.. ट्रेन ची वाट बघत सगळे उभे होते... एकदाचि ट्रेन आली आणि सगळ्यांची जी ट्रेनमधे चढण्यासाठी ओढाताण सुरु झाली की काही बघायलाच नको.. कसेतरी धक्काबुक्की करत, ट्रेन मधे घुसले.. तर पुन्हा आतमधे पण गाडी भरलेलीच की! कस तरी वाट काढत काढत आत जायचा प्रयास केला आणि उभ राहण्यासाठी एक कोपरा पकडला.. हुश्श्! सुटकेचा श्वास सोडला..पण खरच अगदी भर गर्दीच्या वेळेत ट्रेन मधून प्रवास करण म्हणजे खर तर एक अत्यंत दिव्य काम आहे!!

आपल्या आयुष्यसुद्धा असेच असते नाही का? 

Thursday 1 January 2015

कनेक्शन


Connection
अगदी रोजच्या वापरातला किती महत्वाचा शब्द आहे ना हा!
अगदी तंत्रज्ञानापासून ते आपल्या रोजच्या जीवनात ह्या शब्दाचा समावेश होतो. 
हल्ली तर सोशल मिडीया साइट्सवर हा शब्द हमखास वापरला जातो. बेसिकली Connection म्हणजे जोडणे.. 
मी अमुक अमुक व्यक्तिशी फेसबुक किंवा ट्वीटर किंवा आणखी कुठे कनेक्ट झालो म्हणजेच माझा त्या व्यक्ति बरोबर फेसबुक किंवा इतर माध्यमांद्वारे संपर्क जोडला गेला..

Feedback

Name

Email *

Message *