Tuesday 28 July 2015

A salute to Dr Abdul Kalam..

काल रात्री अगदी वाऱ्याच्या वेगाने डॉ. अब्दुल कलाम ह्यांच्या निधनाची वार्ता सर्वत्र पसरली.. ऐकून एक धक्काच बसला.. क्षणभर स्वतःवर विश्वासच बसत नव्हता.. 
डॉ. ए. पी. जे.अब्दुल कलाम हे एक थोर शास्त्रज्ञ होते. आणि एवढेच नाही तर त्यांना 40 देशांतील विद्यापीठांमधुन डॉक्टरेट ही पदवी ही बहाल केलेली होती व त्याचबरोबर पद्मभूषण, पद्मविभूषण, भारतरत्न असे पुरस्कारही त्यांना मिळालेले होते. 

Monday 13 July 2015

स्मार्ट फूड पॅकिंग

आपण अनेक वेळा काही खाद्य पदार्थ बाजारातून आणतो आणि घरी येईपर्यंत ते बहुतेक वेळेला खराब होतात.. काही वेळेला आपल्याला समजतसुद्धा नाही की नक्की हा पदार्थ खाण्या योग्य आहे की नाही.. आणि म्हणूनच आपल्याला तो खाद्य पदार्थ चांगला आहे की नाही हे आधीच कळण्यासाठी आता नॅनोसंवेदक (NANOSENSORS) वापरण्यात येणार आहेत.  

Tuesday 7 July 2015

एकांत


असेच सायंकाळी एका
मन रमले होते एका विश्वातच वेगळ्या
बाहेरही ढग जमुनी आले होते सारे
पसरली होती चोहिकडे अगदी निरव अशी शांतता

कसला ही आवाज नाही
नाही कुठलीही हालचाल
झाडांनाही अलगदच
स्पर्श होत होता वाऱ्याचा

बाहेर होती निव्वळ शांतता
मनात मात्र होता कल्लोळ विचारांचा
बाहेरील शांतता पाहून 
मनातला गोंधळ क्षणभर थांबला
वाटले जरा अनुभवावा 
कधीतरी एकांत हा

स्वतःशीच बोलावे अन 
स्वतःशीच हसावे
अगदी मनमुरादपणे, 
स्वतःशीच भांडावे
वाटले कधी रडावेसे तर 
भरपूर रडून ही घ्यावे
बांध सारे तोडून, 
सर्व भावनांना बेछूटपणे वाहू द्यावे

नको कोणते संभाषण
नको कुठल्या भेटी गाठी
सोडुनी भ्रांत साऱ्या
स्वतःच स्वतःमधे रंगून जावे

नाही कोणी रोखायला,
नाही कोणी टोकायला
पाहिजे तसे पाहिजे तेव्हा, 
मोकळे आपण बागडायला
सर्वांमधे राहून ही 
'एकटे' तर बरेच राहतात
पण एकांतात राहुनही 
मेळाव्याचा भास घेणारे तसे कमीच असतात.. 

- केतकी कुलकर्णी 

Feedback

Name

Email *

Message *