Saturday 23 May 2015

एक आगळी वेगळी कविता..... :-)


कविता आणि लेख एकदा
असेच एकमेकांना येऊन भेटले
दोघेही मग नकळतच
गप्पांमधे रंगून गेले

लेखास कविता बोलू लागली
तुझी किमया तर लय न्यारी
इवलासा शब्द मिळाला जरी
अख्खे एक पुस्तक लिहिले जाते भारी

असो कोणती प्रेमाची कादंबरी
वा असो कुठली थ्रिलर स्टोरी
तुझ्यातल्या शृंगारिकतमुळे वाचतांना 
त्यात निर्माण होते एक वेगळीच गोडी

ह्यावर लेख म्हणाला..
तुझे ही कौतुक काही कमी नाही
तुझ्यात झळकते ती शब्दांची रोषणाई
सुरेल सुमधुर यमकांचा मेळ बसुनी
चारोळ्या अन त्रिवेणीतूनही तू नटतेस भारी

तुझ्यातल्या नाजूक हळुवारपणाने
लोक होती घायाळ जागीच
तुझ्यातील तन्मय अर्जवाने
पाषाणास ही पाझर फूटती

दोघेही मग एकमेकांस म्हणाले
लेख-कविता ही जोडीच आगळी
एकात श्रृंगारिकता तर एकात अदाकारी
दोघेही आपण बोधकारी

असेच शब्दांच्या खेळामधुनी
लोकांपर्यंत पोचत राहु
आपल्या ह्या कलेच्या प्रेमात पाडण्यासाठी
लोकांना उद्युक्त करत राहु


-  केतकी कुलकर्णी 

Friday 22 May 2015

आजार मोठा उपाय नॅनो - 2


मागच्या लेखात आपण cancer वर नॅनो टेक्नॉलॉजी कशी उपयोगी ठरू शकते हे बघितले. आता आपण पुढे अजून कुठे कुठे वैद्यकीय शास्त्रात ह्याचा उपयोग होतो हे थोडक्यात बघू. 

आज एक आजार अत्यंत कॉमन झालेला आहे, तो म्हणजे मधुमेह (डायबेटीस)… मधुमेह एकदा झाला की मग संपलं.

Saturday 2 May 2015

आजार मोठा उपाय नॅनो







आमच्या ओळखीतील एक आजोबा कॅन्सरची ट्रिटमेंट घेत असताना वारले. त्यांना कधीही व्यसन नव्हते. त्यांचे खाणे पिणे व्यवस्थीत होते. उभ्या आयुष्यात कधी कोणता मोठा आजार झाला नाही आणि उतारवयात लक्षात आले ते थेट कॅन्सर....लास्ट स्टेज..सारेच हळहळले. पण आता जाण्याचेच वय त्यात काय खंत करायची असे म्हणत त्यांनी ही धीराने घेतले आणि घरातल्या सगळ्यांना धीर दिला म्हणून सगळे या दुःखातून लवकर सावरले. परंतु त्यानंतर काही दिवसातच ४०-४५ वय असलेल्या एका मैत्रीणीचा कॅन्सरने मृत्यू झाल्याची बातमी धडकली आणि आधीपेक्षा जास्त सुन्न व्हायला झाले....४०-४५ हे काय वय आहे जाण्याचे....त्यानंतर अगदी विशीतल्या मुलाला देखील कॅन्सर झाल्याचे कानावर आले. एका पाठॊपाठ एक घटना समोर आल्यावर विचारचक्र आपोआप सुरु झाले की अचानक हा कॅन्सर सारखा आजार बळावला कसा? याने माझे डोके ठणकू लागले.

Feedback

Name

Email *

Message *