Thursday, 12 February 2015

...प्रेम...

...प्रेम...


मुक्या भावनांना मिळे
डोळ्यात वास
हृदयातील शब्दाना असे
ओठांचा ध्यास

लपंडावातुनी होत असे
एकमेकांचा प्रवास
क्षणिक भेटीतही दुःख सारे विरून
लाभे अमोल सुखाचा सहवास

तुझे माझे नुरून येथे
येइ आपलेपणाचा सुवास
लटका जरी राग दिला
तरी अंतरी असे फक्त प्रेमाचाच श्वास

कुठलीही भाषा इथे नाही आड
इशार्यातूनच चाले मधुर संवाद
हेच का ते प्रेम अन हाच का तो प्रेमाचा आभास
प्रत्येकाच्या मनात असतील नक्कीच जपलेले क्षण हे खास

- केतकी कुलकर्णी 

1 comments:

Unknown said...

केतकीवीरा, अगदी भावना बोलक्या केल्या आहेत कवितेतून ... प्रत्येकाला त्याच्या आयुष्यातील खास जपलेल्या स्मृतींची आठवण करून देणारी तुमची कविता खूप भावली.

Post a Comment

Feedback

Name

Email *

Message *