Tuesday, 10 February 2015

कोल्हापुर वैद्यकीय व आरोग्य शिबिर..

कोल्हापुर वैद्यकीय व आरोग्य शिबिर..

फेब्रुवारी 2015!!!!
ह्या महिन्याच्या सुरुवातिचेच 2 दिवस माझ्या आयुष्यात कायमचे कोरले गेले आहेत.
मला बरेच काही शिकवून गेले हे 2 दिवस.. किती तरी गोष्टींची जाण करून गेले हे 2 दिवस..
असे काय होते ह्या 2 दिवसांमधे..
तर परमपूज्य अनिरुद्ध बापूंच्या कृपेने व प्रेरणेने होत असलेले कोल्हापुर वैद्यकीय व आरोग्य शिबिर!!!
दर वर्षी जानेवारी महिन्यामधे हे शिबिर आयोजित करण्यात येते. 
अवाढव्य अशा ह्या शिबिरात बरेच गावकरी सहभाग घेत व ह्याचा लाभ घेत.

हे शिबिर कोल्हापुरपासून काही अंतरावर असणाऱ्या पेंडाखळे ह्या गावामधे हे शिबिर आयोजित केले जाते. जवळ जवळ 10 एकर जमीन इथे वापरली जाते. ही जमीन तेथील गावकरी सारवुन घेतात व संपूर्ण जमीन सपाट करतात. ही तयारी 6 ते 8 महीने आधिपासूनच चालु होते. 
ह्या वर्षी मला ही ह्या शिबिरामधे सेवेसाठी सहभागी होण्याची संधी मिळाली.. २ दिवसांचे हे शिबिर होते..
दिवस पहिला..
ह्या दिवशी तेथील छोट्या छोट्या गावांमधे जाऊन वाटप केले जाते. आता हे वाटप कसले असते??
तर त्या प्रत्येक परिवाराला भांडी घासायची पाउडर, दात घासण्याची पाउडर, पाणी स्वच्छ करण्याचे औषध, खर्जेवरचे औषध, केस विंचरण्यासाठी कंगवा व फणी, साबण, बांगड्या, नववारी प्लेन तसेच प्रिंटेड सड्या, लहान मुलांना खेळणी.. ह्या सर्व गोष्टी विनामूल्य वाटल्या जातात. 



मी ही तिथे वाटप करायला गेले.. ४ ते ५ गावांमधे आम्ही गेलो.. आणि माझ्या वाटेला आले ते म्हणजे भांडी घासण्याची पौडर देणे.. खुप मजा आली.. हे काम करताना.. पूर्ण पौडर मधे माखून घेण्यात सुद्धा एक वेगळीच मजा येत होती.

हे सर्व साहित्य वाटण्यासाठीसुद्धा खुप छान planning केले जाते.
आपलेच कोल्हापुर येथे राहणारे कार्यकर्ते काही महीने अगोदर जाउन तिथे survey करतात.. किती families आहेत, एकेका घरामधे किती माणस, किती बायका, किती लहान मूल व मुली, किती म्हातारी माणस राहतात ह्या सगळ्याची पद्धतशीर नोंद केलि जाते.. व त्यानुसार त्याप्रमाणे लागणार्या सर्व गोष्टींची व्यवस्थित packing केले जाते. हे सर्व सामान मग कोल्हापुरला मुंबईवरून शिबिराच्या काही दिवस आधीच पाठवले जाते, जेणेकरून sorting करण सोपे जाते.
आणि मग शिबिराच्या पहिल्या दिवशी जवळपासच्या गावांमधे जाउन ह्या सर्व गोष्टींचे तेथील गरजू व कष्टकरी लोकांना वाटण्यात येते. 

रात्रि सर्व झाल्यावर तेथील गावकरी एक छोटासा सुंदर सत्संग करतात.
दिवस दूसरा:
आता ह्या दिवशी काय होते?
ह्या दिवशी सर्व गावकरी main पेंडाखळे ह्या शिबिराच्या स्थळी येतात. इथे येतानाच लहान शाळकरी मुलांना उन्हाचा त्रास होउ नये ह्यासाठी टोप्या वाटण्यात येतात व पायाला चटके बसू नये ह्यासाठी त्याना चपला देण्यात येतात.

तसेच मोठ्या माणसानाही आतमधे चपला वाटल्या जातात. आतमधे आल्यावर लहान मुलाना रात्रीचा अभ्यास करता यावा ह्यासाठी मेणबत्त्या व काडेपेट्या पुरावल्या जातात. तसेच विधार्थ्याना शालेय गणवेष, स्वेटर्स व गावातील लोकांना गोधडी हे सगळ मोफत दिले जाते.
एका बाजुला तिथे मेडिकल चेक अप होत असते.
तेथील रुग्णांची रक्त तपासणी, दंतचिकित्सा, ECG, xray, ह्रदयचाचणी, विनामुल्य केली जाते.. तसेच स्त्रियांसाठी gynaecologists ही तपासणीसाठी असतात. तसेच ENT surgeonsसुद्धा तिथे तपासणी करतात.
कोणालाही काही आजार आढळल्यास त्यांच्यासाठी लागतील ती योग्य औषधे ही विनामुल्य पुरवीली जातात. इतकेच नाही तर डोळ्यांची तपासणी करून त्याना लागणार असणार्या चश्म्यांचेही वाटप इथे विनामुल्य केले जाते.


ह्यानंतर ह्या सर्व लोकांसाठी जेवण ही पुरवले जाते. हे सगळे अगदी मोफत!
मला हे जेवण वाढायच्या ठिकाणीच सेवा होती. लहान मोठ्या मुलाना वाढताना एक वेगळाच आनंद येत होता..

खरोखर.. हा एक अद्भुत असा सोहळा आहे. इतक्या विराट स्वरुपाचे हे शिबिर अनुभवताना भरुन येते. त्या छोट्या चिमुरड्यांना जेव्हा खेळणी मिळतात तेव्हा त्यांच्या चेहर्यावरिल आनंद आपल्याला खुप काही देऊन जातो. आपण तुटलेली पर्स किंवा एखादे खेळण टाकून देतो पण हेच त्या लहान लहान मुलांसाठी खुप उपयोगी असतात. हातात पडल्या पडल्या सगळीकडे आनंदाने ते मिरवू लागतात.
जेवणा मधे त्यांना डाळ भात, पोळी भाजी,शिरा लोणच ह्या गोष्टी असतात. त्याना कित्येक दिवस हे असे पोटभर जेवण मिळालेले नसते, शिरा म्हणजे काय हे त्याना माहीत सुद्धा नसत.. व ज्यावेळी ते ह्याचा अस्वाद घेतात तेव्हा त्यांना बघून आपले पोट अपोआप भरत असते.
2004 पासून ह्या campची सुरुवात झाली. आज जवळ जवळ दहा वर्षे हे चालु आहे. आता तिथल्या गावकर्यांना बर्यापैकी स्वच्छतेचे महत्व समजले आहे. ह्याचे एक कारण असे की ज्या वेळी आपण कंगवे, फणी, साबण, पाणी स्वच्छ करण्याचे औषध, खरजेवरचे औषध ह्या सर्व गोष्टींचे वाटप करतो तेव्हा त्यांना त्याची आवश्यकता काय आहे हे ही सांगतो.. केसांच्या जटा झाल्या तर काय होते, अशुद्ध पाण्याने कसे रोग होतात हे सर्व समजावून सांगितले जाते. त्याचबरोबर आपल्या आजुबाजुचा परिसर स्वच्छ ठेवणे किती आवश्यक आहे हे सर्व त्यांना सांगितले जाते. आणि आज खरोखर त्यांच्या राहणीमानामधे खुप फरक दिसून येतो. आधी त्यांना सांगायला लागत होते.. काय व कस वापरायचे आणि कशासाठी वापरायचे., पण आता त्याना जेव्हा आपण सांगायला जातो तेव्हा ते स्वतःहूनच सांगतात.
लहान लहान मूल आता शाळेमधे आनंदाने जात आहेत. कितवीत आहे विचारल्यावर अगदी उड्या मारत सांगतात, पाचवीत आहे, मी 4थी मधे आहे.
शालेय गणवेषामधे अगदी ताठ मानने ही मूल येतात.
काही वेळेला त्यांची अति गरीबी पाहून वाईट वाटते, पण ह्या शिभिरामुळे त्यांच्यामधे होणारा इतका मोट्ठा बदल झालेला बघून मन नक्कीच सुखावते.
हे शिबिर अतिशय पद्धतशीरपणे पार पाडले जाते. जवळपास 45000 लाभार्थी ह्या शिबिरात सहभागी होतात पण कुठेही जराही अडचण, गोंधळ, धक्काबुक्की वगैरे इथे होत नाही. कार्यकर्ते अतिशय प्रेमाने व शिस्तिने हे सगळ हाताळत असतात.
शिस्त्बद्धता, प्रेम, कारुण्य, सेवा, आनंद... हे सअर्व जिथे एकाच ठिकाणी अनुभवायला मिळते ते म्हणजे हे एकमेव अद्वितीय, अद्भुत, शब्दांच्या पलिकडे असलेले, बापुंच्या प्रेरणेने सुरु झालेले हे कोल्हापुर वैद्यकीय व आरोग्य शिबिर.
ह्या शिबिराचा भाग होण्यास मिळाले ह्यासाठी मी कायम कृतज्ञ आहे..

- केतकी कुलकर्णी



0 comments:

Post a Comment

Feedback

Name

Email *

Message *