दि. ३ मार्च २०१५च्या प्रत्यक्ष दैनिकातील अजितसिंह पाध्ये ह्यांनी लिहिलेली कविता वाचली.. "गोष्ट एका बहिणीच्या दादाची".. कविता वाचली आणि टचकन डोळ्यात पाणी आलं..
बहिणीचे व तिच्या दादाचे प्रेम किती सुंदरपणे मांडले आहे.
बहिणीचे व तिच्या दादाचे प्रेम किती सुंदरपणे मांडले आहे.
बहिण दिवसभर भावाशी भांडते पण रात्री झोपतांना मात्र दादाच्या कुशीतच जाउन झोपते. आणि दादाचं पण प्रेम ते किती! शाळेत आपल्या छोट्या ताईकडे डबा नाही हे बघून तो स्वतः बहिणीला त्याचा डबा देतो ते ही तिला नकळत..तिला दादाकडे जावं ही लागत नाही.. तो आधीच तिच्याजवळ येउन उभा राहतो.. आणि मग नंतर जेव्हा बहिणीला समजतं की दादा उपाशी राहून आपल्यासाठी खाऊ आणून देतो तेव्हा मग ती त्याला खुप घट्ट मीठी मारते..
हे सगळे वाचून असाच विचार करत बसले... की खरच.. किती सुंदर नातं आहे ना हे!
अगदी त्या म्हणीसारखं हे नातं असतं.
तुझं माझं जमेना, अन तुझ्यावाचून करमेना!!
हा असा भाऊ मिळणं म्हणजे किती भाग्याची गोष्ट असेल ना!
जेव्हा केव्हा एखादी गोष्ट आईबाबांना सांगायची नसते तेव्हा हळूच जाउन दादाला सांगायचं.. काही पाहिजे असेल तर दादाकडे हक्काने मागायचं. रुसला असेल तर थोडी लाडी-गोडी लावायची.. आणि वेळ पडल्यास भावासाठी out of the way जाउन काहीही करणारी.. अशी ही बहिण.. आणि जितकं तो प्रेम करतो तितकच मग त्याच्या बहिणीकडून काही चुकले असताना तेवढाच तो तिला ओरडणारा.. तिला काही हवे असल्यास थोड भाव खाऊन पण लगेच देणारा.. दादा आहे म्हणून लगेच दादागिरी करणारा, असा हा भाऊ!
असेच असेल ना हे नातं!
लहानपणी वाटायचे की बरं आहे आपल्याला भाऊ नाही..कटकट नाही कसली.. :P
पण जसजसं मोठं होत जातो तसंतसं कुठेतरी वाटायला लागतं की असा एक भाऊ असता तर किती छान झाले असते.. किती मस्ती केली असती आणि किती मजा केली असती.. जेव्हा इतर ठिकाणी हे सगळ बघते तेव्हा नक्कीच कुठेतरी वाईट वाटते, पण मग त्यातही त्यांचा आनंद बघून, समाधान वाटते..
पण काही वेळा खुप खंत वाटते.. ह्या अशा पवित्र नात्याला लोक किती सहजपणे अपवित्र करतात.. स्वतःच्याच तुच्छ व खालच्या विचारांनी ह्या भावा-बहिणीच्या सुंदर नात्याला एक वेगळेच तुच्छ रूप देतात.. किती ते पाप!!! खूप मन हळहळते जेव्हा कोणी असे विचित्र विचार करतांना दिसते..
खरं तर ह्या नात्यामधे एक छानसा रेशमी धागा असतो विश्वासाचा, प्रेमाचा, सुरक्षिततेचा.. आणि हा धागा कधीही विरत नाही.. किती ही भांडण झाले असले तरी पण कोणी इतर व्यक्ति जर त्या बहिणीला किंवा भावाला काही बोलले तर तो भाऊ किंवा ती बहिण लगेच एकमेकांची बाजू मांडायला तयार असतात.. सगळ काही विसरून.. असं हे अनमोल नातं.. आपुलकीचं आणि सात्विक प्रेमाचं.. ज्यांना मिळालं त्यांनी नक्कीच जतन करावं..
आणि ह्या कवितेप्रमाणे जर भाऊ असेल तर अशा दादासाठी त्याची छोटी ताई काय करणार नाही! आणि जर अशी गोंडस बहिण असेल तर तिच्यावरही तिचा दादा नक्कीच खुप प्रेम करेल... नाही का?
भावा-बहिणीचे हे पवित्र नाते असेच फुलत राहो.. प्रत्येकाला असा एक तरी प्रेमळ दादा मिळो हीच शुभेच्छा!!!
- केतकी कुलकर्णी
3 comments:
Really the relation of Sister and brother is so pure and divine...you article reflects this bond in beautiful manner
Yes..
fulonka taronka sabka kehna he..
ek hajaronme meri behna he..
sari umar hame sang rehna he..
hya ganyachi aathvan zali..
nice article Kk..
Yes. Brother and sister relation is about pure love.
Perfectly described.
Fortunately i have three of them. 3 little sisters
Post a Comment