Monday, 13 April 2015

विश्व नॅनो टेक्नोलॉजीचे!!!

नॅनो टेक्नोलॉजी.. 

सध्या एक अतिशय चर्चेत असलेला हा विषय.. ह्यास विज्ञान जगातील एक चमत्कार जरी म्हटले तरी काही वावगे ठरणार नाही.. अशी ही टेक्नोलॉजी.. काय आहे असे ह्यामधे? नक्की काय आहे ह्या टेक्नोलॉजीमध्ये??
मुळात नॅनो म्हणजे काय.. हे आपण आधी बघू.. 


एक नॅनोमीटर म्हणजे एक मीटरचा एक अब्जावा भाग. 100 नॅनोमीटरचे कण जेव्हा आपण बाजूला जोडून जोडून ठेऊ, तेव्हा त्याची रुंदी आपल्या एका केसाच्या रुंदी इतकी होईल.. म्हणजे विचार करा किती सूक्ष्म कण असतील हे!!! आणि ह्या अशा कणांमधुन जे काही तंत्रज्ञान विकसित होत आहे तेच हे नॅनो टेक्नोलॉजी.. 


आपण नेहमी एक म्हण ऐकतो..  "मूर्ति लहान पण कीर्ति महान" तोच प्रकार आहे ह्या नॅनो टेक्नोलोजीमधे..
एक छोटीशी गोष्ट, पण करामती मात्र खूप मोठ्या....
ह्या करामती ऐकतांना खरोखर एकएक आश्चर्याचे धक्के बसत जातात.. काय होऊ शकत नाही ह्यामुळे! अगदी अंतराळातील गोष्टींपासून ते आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात येणाऱ्या प्रत्येक ठिकाणी ह्याचा उपयोग होतो. कुठे कुठे ह्याचा उपयोग होउ शकतो हे आपण आता थोडक्यात बघू..

* औषधांमधील ह्याचा उपयोग..
संशोधक अशा प्रकारचे सानुकूल नॅनोकण तयार करत आहेत की जे औषधांद्वारे थेट शरीरातील आजारी पेशींमध्ये जाऊन त्यावर उपचार करू शकतील.. आणि जेव्हा हे परिपूर्ण होईल, तेव्हा,  कीमोथेरेपी सारख्या उपचारांमुळे जेव्हा मनुष्याच्या हेल्दी पेशींना हानी होते, त्या हानीचे प्रमाण कमी होईल..

* इलेक्ट्रॉनिक्स मधील उपयोग..
ह्या नॅनो टेक्नोलॉजीमुळे उपकरणांची क्षमता वाढते व ह्या उपकरणांचे वजन व पॉवर consumption कमी होते.

*अन्नामधील ह्याचा उपयोग..
ह्या टेक्नोलॉजीचा प्रभाव अन्नाच्या उत्पादनापासून ते अन्नाच्या पैकिंगपर्यंत सगळीकडे पडतो.
बऱ्याच companies असे काही नॅनो matetial तयार करत आहे ज्यामुळे अन्नाच्या चवीतच नाही तर अन्नाची सुरक्षितता आणि ते खाल्ल्यामुळे होणाऱ्या फायदे ह्यामधेही खूप मोठा व चांगला फरक दिसून येईल.

* इंधन cells.., solar cells..
इंधनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या उत्प्रेरकांची किंमत कमी करण्यात तसेच solar cells ह्यांची ही किंमत कमी होण्याचा ह्या टेक्नोलॉजीचा खूप मोठा वाटा आहे..

* बैटरी..
नॅनो मटेरियल ने बनवलेली एक बैटरी शेकडो वर्षे चालु शकते व तरीही नव्यासारखी राहते.. त्याचबरोबर एखादी बैटरी इतर बैटरीपेक्षा लवकर चार्ग होणारी असते.

ही फक्त एक थोडक्यात केलेली ओळख आहे.. असे बरेच उपयोग आहेत ह्या नॅनो टेक्नॉलॉजीचे..हे कसे होते व अजुन कुठल्या प्रकारचे संशोधन ह्यात विकसित होत आहे हे आपण पुढे बघूच... तोवर थोडी वाट बघा.. :-)

- केतकी कुलकर्णी

2 comments:

Unknown said...

नॅनो टेक्नोलॉजी.. विज्ञान जगातील एक चमत्कार ह्या विषयावर केतकी आापण सुंदर रीत्या आणि सोप्या भाषेत माहिती देत आहात. पुढील भागाच्या प्रतिक्षेत....

Maneeshaveera Sukthankar- said...

Hari om Ketkiveera
Good work on your blog and in simple language.
Ambadnya

Post a Comment

Feedback

Name

Email *

Message *