Tuesday, 28 April 2015

बळीराजा बळी




काय करू कूटं जाऊ
काय बी कळंना
कुनास साद घालू कसी घालू
काय बी सुधरंना


रोजच्याला घाम गाळून
जातो श्येतात कामसनी
राब राब राबुन करतो
त्यात धान्यांची पेरनी


साऱ्या जगासनी अन्न धान्य पुरवितो
अन मी स्वतः मात्र उपाशीच मरतो
धन्यासनीच सारा पैसा मिलतो
अन आमचे श्येत असूनही आम्ही मात्र कर्जात बुडतो


आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास महनून की काय
इन्दरदेव ही त्यात भर टाकतो
ऐन पिकाच्या येळीच हा
अगदी धो धो धो धो कोसळतो


आता निसर्गराजा बी कोपला म्हंतल्यावर
आम्ही तरी जायाचं कूटं
याचे कारण इचारावं म्हनून
'त्या'च्याकडचीच वाट पकडतो


बळीराजा बळीराजा महन्ता महन्ता
ह्या राजाचा फकस्त बळीच जातो
बळीराजाचा धनीराजा कर
असच देवासनी जाऊन सांगेन महन्तो

- केतकी कुलकर्णी 

0 comments:

Post a Comment

Feedback

Name

Email *

Message *