Saturday, 23 May 2015

एक आगळी वेगळी कविता..... :-)


कविता आणि लेख एकदा
असेच एकमेकांना येऊन भेटले
दोघेही मग नकळतच
गप्पांमधे रंगून गेले

लेखास कविता बोलू लागली
तुझी किमया तर लय न्यारी
इवलासा शब्द मिळाला जरी
अख्खे एक पुस्तक लिहिले जाते भारी

असो कोणती प्रेमाची कादंबरी
वा असो कुठली थ्रिलर स्टोरी
तुझ्यातल्या शृंगारिकतमुळे वाचतांना 
त्यात निर्माण होते एक वेगळीच गोडी

ह्यावर लेख म्हणाला..
तुझे ही कौतुक काही कमी नाही
तुझ्यात झळकते ती शब्दांची रोषणाई
सुरेल सुमधुर यमकांचा मेळ बसुनी
चारोळ्या अन त्रिवेणीतूनही तू नटतेस भारी

तुझ्यातल्या नाजूक हळुवारपणाने
लोक होती घायाळ जागीच
तुझ्यातील तन्मय अर्जवाने
पाषाणास ही पाझर फूटती

दोघेही मग एकमेकांस म्हणाले
लेख-कविता ही जोडीच आगळी
एकात श्रृंगारिकता तर एकात अदाकारी
दोघेही आपण बोधकारी

असेच शब्दांच्या खेळामधुनी
लोकांपर्यंत पोचत राहु
आपल्या ह्या कलेच्या प्रेमात पाडण्यासाठी
लोकांना उद्युक्त करत राहु


-  केतकी कुलकर्णी 

2 comments:

Viraj Sarode said...

Fantastic... Never read a kavita of kavita..

Prasanna Laud said...

असेच शब्दांच्या खेळामधुनी
लोकांपर्यंत पोचत राहु
आपल्या ह्या कलेच्या प्रेमात पाडण्यासाठी
लोकांना उद्युक्त करत राहु.....

अप्रतिम ...
तुझा हा विचार बापू तुझ्या जीवनात प्रत्यक्ष उतरवू देत...

Post a Comment

Feedback

Name

Email *

Message *