आज आपल्या प्रत्येकाकडे संवाद साधण्याच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. संगणक, मोबाइल्स, इत्यादि गोष्टींचा वापर करून आपण संवाद साधू शकतो. जवळपास आज प्रत्येकाकडेच साध्या फोन्सच्या जागी स्मार्ट फोन आले आहेत, मोठ्या कंप्यूटर्सच्या जागी लॅपटॉप, नोटपॅड वगैरे उपलब्ध झाले आहेत, आणि ह्यामुळे आपण अगदी सहजपणे संभाषण करू शकतो. अगदी साध्या गप्पांपासून ते अगदी इमरजेंसीच्या प्रत्येक गोष्ट आपण ह्या माध्यमांच्या सहाय्याने बोलू शकतो. कधी डायरेक्ट कॉल करून तर कधी व्हाट्सअप, एस एम एस, फेसबुक, ट्विटरवरुन आपण बोलू शकतो.
अगदीच जास्त इमरजेंसी असेल तर आज आपल्या फोन्समधे इमरजेंसी कॉल्स करण्याची पण सोय आहे. रेल्वे, पोलिस, आग अशा कोणत्याही परिस्थितिमधे कोणत्याही ठिकाणी आपण कोणत्याही अडचणीबद्दल ह्या ठिकाणी आपण सांगू शकतो.
पण कधी आपण विचार केला आहे का, की अचानक एखादी आपत्ति आली, नैसर्गिक असो की मानवनिर्मित असो की अजुन कोणती आपत्ति असो, पण ह्या आपत्तिमुळे सर्वच्या सर्व उपकरणं बंद पडली तर काय? मोबाइल बॅटरी डाउन, नेटवर्क नाही, सगळी साधनं ठप्प झाली तर काय करणार?
आज तिसरं महायुद्ध उम्बरठा ओलांडून घरा घरामधे चालु झाले आहे. त्यामुळे ह्या परिस्थिति कधीही उद्भवु शकेल. अशा वेळेस आपण कोणाशी आणि कसा संवाद साधणार?? कधी विचार केला आहे का आपण ह्याचा?
अशा आणिबाणीच्या वेळेस आपल्या उपयोगी पडतो तो हॅम रेडियो! हॅम रेडियो हे अशा आणिबाणीच्या काळामधे अत्यंत उपयोगी पडणारं असं साधन आहे. हा हॅम रेडियो शेकडो वेगवेगळ्या फ्रीक्वेंसी वापरु शकतात आणि अगदी कमी वेळामधे नेटवर्क स्थापित करू शकतात आणि ह्यामुळे कार्य करण्याची क्षमता वाढते.
२००१ मधे मेनहट्टन येथील वर्ल्ड सेंटरवर झालेला हल्ला, सप्टेम्बर २००५ मधे चक्री वादळ कतरिना, ह्या सर्व ठिकाणी हॅम रेडियोचा उपयोग आपत्ति राहत कार्यामधे समन्वयासाठी केला गेला. २००४ मधे भारतीय महासागरापलीकडे झालेल्या भूकंप आणि त्यातून निर्माण झालेल्या त्सुनामीमधे सर्वच उपकरणं धुतली गेली पण हॅम रेडियोमुळे तिथे राहत व बचाव कार्य करणे अत्यंत सोपे झाले होते.
अशा प्रकारे ह्या हॅम रेडियोचे अनेक उपयोग आहेत. येणारा काळ बघता आपल्याला अशा गोष्टी शिकण्याची खरोखर खुप गरज आहे. ह्याबद्दल अधिक माहिती आपण पुढील लेखात बघुया.
- केतकी कुलकर्णी

![]() |
Ham operators |
![]() |
Ham radio operator Bharti Prasad assists with rescue operations after the 2004 Indian Ocean earthquake and tsunami |
अशा प्रकारे ह्या हॅम रेडियोचे अनेक उपयोग आहेत. येणारा काळ बघता आपल्याला अशा गोष्टी शिकण्याची खरोखर खुप गरज आहे. ह्याबद्दल अधिक माहिती आपण पुढील लेखात बघुया.
- केतकी कुलकर्णी
6 comments:
मस्त लेख...
तुम्ही हॅम आहात का?
Ambadnya 👍 very nice Post.
g8 info.....अशा गोष्टी शिकण्याची खरोखर खुप गरज आहे.
Waiting for next article Ambadnya
Ketaki, thank you dear for the eye opener article on HamRadio - Need of the hour to be updated with the latest technologies and techniques to stay connected with the world even during natural disasters, where we lose hope of everything.
Good article.
Post a Comment