Saturday 2 April 2016

हॅम रेडियो - 3

           

          मागच्या लेखात आपण हॅम रेडियोची गरज बघितली. आता पुढे थोडक्यात हॅम म्हणजे काय ते आपण पाहू.
हॅम रेडियो म्हणजेच अमेच्युर रेडियो. अमेच्युरचा अर्थच मुळी हौशि असा आहे. ह्या अमेच्युर रेडियो एक छंद म्हणून वापरला जायचा. लोक हे स्वतःच्या आनंदासाठी, स्वतःचे रेडियो स्टेशन बसवण्यासाठी, जगभरातील व्यक्तींशी संपर्क साधण्यासाठी वापरत.

अठाराशेच्या शतकामधे, रेडियो लहरींचा शोध लागल्यानंतर हा हॅम रेडियो अस्तित्वात आला. एकोणवीसाव्या शतकामधे सुरुवातीला वायर्सच्या सहाय्याने अन्तर्गत तार संस्था स्थापन करण्यात आली. नंतर विसाव्या शतकामधे हळूहळू वायरलेस टेलीग्राफीचा प्रयोग सुरु झाला. 
          अमेच्युर रेडियो ऑपरेटर्सना 'हॅम' म्हटले जाऊ लागले. ह्याचे कारण काय? असे म्हणतात की.. हार्वर्ड रेडियो क्लबच्या काही मेंबर्सने पाहिले 'कॉल' स्टेशन स्थापित केले. त्यांचे नाव अल्बर्ट एस. हायमन, बॉब आलमी, आणि पूगी मुररे असे होते. सुरुवातीला ह्या तिघांनी त्यांच्या स्टेशनला 'हायमन-आलमी-मुररे' असे दिले. पण ते नाव खुप मोठे वाटल्याने त्यांनी 'हाय-अल्मु' असे ठेवले व पुढे त्यांनी त्यांच्या नावामधले फक्त पाहिले अक्षर घेण्याचे ठरवले, आणि अशा प्रकारे ते 'HAM' असे ठेवले गेले.  आणि मग पुढे हळूहळू ह्याला 'हॅम'ऑपरेटर्स म्हणूनच संबोधिले जाऊ लागले. 
          एक छंद म्हणून वापरली जाणारी ही गोष्ट आज काळाची गरज बनत चालली आहे. आपल्यातील प्रत्येकालच ह्यातले ज्ञान असणे आता आवश्यक झाले आहे. प्रत्येक  हॅम आपल्या स्वतःचे असे एक स्टेशन बसवु शकतो, जेणेकरून आपत्तिकाळात कुठेही संपर्क साधणे अगदी सहज सोपे होईल. जेवढे जास्ती हे हॅम्सचे स्टेशन्स तेवढेच जास्ती संपर्क सुरळीत होऊ शकेल. 


          आता तुम्हाला प्रश्न पडेल की हे हॅम स्टेशन कोण व कसे बसवु शकतं? तर आपल्याला ह्यासाठी गव्हर्नमेंटकडून लायसेंस मिळणे गरजेचे असते. जोपर्यन्त माझ्याकडे लायसेंस नाही तोपर्यन्त मी हॅम रेडियो घेऊ शकत नाही. हा लायसेंस मिळण्यासाठी एक परीक्षा देण्याची आवश्यकता असते. ही परीक्षा कोण देऊ शकतं? ह्यासाठी पात्रता काय?? 
तर 12 वर्षापुढील कोणीही व्यक्ति हया लायसेंसची परीक्षा देण्यास पात्र आहे.



            ह्यासाठी कुठल्याही विशिष्ट अहर्तेचि आवश्यकता नाही. 
ह्या हॅम लायसेंस 2 ग्रेडमधे असतो. एक रिस्ट्रिक्टेड आणि दूसरा जनरल
रिस्ट्रिक्टेड ग्रेड मधे मोर्स कोडची आवश्यकता नाही. ह्या परिक्षे मधे बेसिक इलेक्ट्रॉनिक्स आणि अमेच्युर रेडियो रूल्स एण्ड रेगुलशन्स वर प्रश्न विचारले जातात. ह्या प्रश्नांना पर्याय असतात व त्या दिलेल्या पर्यायांमधून आपल्याला उत्तर मार्क करायचे असते. जनरल ग्रेड साठी मात्र मोर्स कोडची आवश्यकता असते. 8 शब्द प्रति मिनट अशा प्रकारे शब्द मोर्स कोड मधे ट्रांस्मिट केले जातात व आपल्याला ते ओळखून पेपर वर लिहायचे असतात. ह्या मधे जर उत्तीर्ण होता आले नाही तर आपल्याला रिस्ट्रिक्टेड ग्रेडचा लायसेंस मिळतो. 
ह्या लाइसेंसिंगच्या परिक्षेला 'अमेच्युर स्टेशन ऑपरेटर्स सर्टिफिकेट एक्झामिनेशन' (ASOC) असे म्हटले जाते व ही परीक्षा 'वायरलेस प्लानिंग एंड को-ऑर्डिनेशन, नवी दिल्ली तर्फे घेतली जाते.
       भारतात व मुंबईमधे, केरळ, दिल्ली, घाटकोपर, बंगलौर, ई. अनेक ठिकाणी ह्या हॅमच्या संस्था आहेत. 
पुढील लेखात ह्याबद्दल आणखी जाणून घ्यायचा प्रयास करू.


- केतकी कुलकर्णी

References: https://en.wikipedia.org/wiki/History_of_amateur_radio
                    http://www.vigyanprasar.gov.in/ham/MEANING.htm

10 comments:

Amogh said...

खूपच सोप्पी आणि सुरेख माहिती, अंबज्ञ

Amogh said...

खूप छान आणि थोडक्यात माहिती आहे, आपत्तीजनक काळात खूप उपयुक्त आहे हॅम रेडिओ. अमेरिकेत काही वर्षांपूर्वी आलेल्या कॅटरिना वादळात त्यांची कुठलीच आधुनिक संपर्क यंत्रणा चालली नाही. शेवटी त्यांना जुन्या पद्धतीच्या हॅम रेडिओचा वापर करावा लागला.

Dr Nishikant Vibhute said...

खूप सोप्या शब्दात आणि सविस्तर माहिती मिळाली ।
गोंधळ बराच दूर झाला ।
जय जगदंब जय दुर्गे ।
हरि ओम् श्री राम अम्बज्ञ ।

Unknown said...

Very nice and informative article.will wait eagerly for your next update.
॥ हरिॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥
। जय जगदंब, जय दूर्गे ।

Unknown said...

Too good ketki

Unknown said...

Too good info

Amruta's Kalasadhana (kalechi upasana) said...

👍

Unknown said...

Ketaki very nice informative post. ABC of Ham Radio covered so nicely. eagerly waiting for next Post to know details of Ham Radio.
It's very true that when communication fails during disasters only Ham can be only source for communication in emergencies.

Unknown said...

This s very useful & imp infrmtn expressed in simple words.Ambadnya Ketakiveera.

Unknown said...

केतकी ham रेडीओ बद्दल खूप सोप्या भाषेत माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
EAGER to know more about it ...

Post a Comment

Feedback

Name

Email *

Message *