कधी कधी आपण एखाद्याला विचारतो,
"काय, इतका पण विश्वास नाही का माझ्यावर?"
तेव्हा ह्यावर अगदी सहज उत्तर काही वेळा दिलं जातं...
"विश्वास तर पाणिपतच्या लढाईत मेला"
खरच ना! आपल्या प्रत्येकाच्या जीवनात वैयक्तिक पातळीवर ही पानीपतची लडाई सुरूच असते..आणि ह्यामधे बळी जातो तो विश्वासाचा.
आणि एखाद्याच्या विश्वासाचा बळी जाणं म्हणजेच त्या व्यक्तीचा विश्वासघात होणं. आणि हा विश्वासघात होणं म्हणजेच आपण ज्याला म्हणतो एखाद्याच्या पाठीत खंजीर खुपसणं!
आणि ह्या अश्या परिस्थितीतून आपल्यातील प्रत्येक जण गेलेला असतो. कोणीही ह्याला अपवाद नाही..
आपण एखाद्या व्यक्तिवर खुप विशवास ठेवतो, अगदी किती तरी वर्षांच्या ओळखीतून एक बांधीलकि निर्माण झालेली असते आणि त्यातूनच पुढे मग हा विश्वास develop झालेला असतो.. आणि मग एक दिवस असा एक क्षण येतो की ती व्यक्ति मग काही स्वार्थामुळे म्हणा, किंवा कुठल्याही कारणासाठी म्हणा, आपल्या त्या विश्वासाला तडा द्यायला जरा ही मागे पुढे बघत नाही. आणि मग जेव्हा ही गोष्ट आपल्याला समजते तेव्हा मग एका क्षणासाठी काळजात असे चर्रर होऊन जाते आणि मग आपले मन असंख्य प्रश्नांच्या विळख्यात जखडले जाते... "का? कशासाठी? आपण काय ह्याचे वाईट चिंतले होते किंवा काय ह्याचे घोडे मारले होते? का असा विश्वासघात केला?" असे एक ना अनेक प्रश्न लहरी मनात तरंगायला लागतात. पण ह्याचे उत्तर काही सापडत नाही आणि मग नाईलाजाने गप्प बसावे लागते.. ह्यातूनच मग हळूहळू असे होत जाते की आपले मन कोणावरही विश्वास ठेवायला तयार नसते. आणि मग अविश्वासाचे जाळे पसरत जाते आणि आपण सर्वच ह्या जाळ्यात मग अडकून जातो.
कधी कधी खरेच असे वाटते की जर प्रत्येकाने असे ठरवले की.. मी माझ्या अगदी जवळ असणाऱ्या व्यक्तिशी तरी कायम प्रामाणिक राहील, किमान प्रत्येक जण एका तरी व्यक्तीच्या विश्वासाला तडा जाणार नाही ह्याची काळजी घेईल तर कदाचित ह्या सध्या मजबूत झालेल्या अविश्वासाच्या जाळयातून बाहेर पडायला सोपे होईल, नाही का?
जर ही गोष्ट आपल्या स्वतःपासूनच सुरु करायचा प्रयास केला तर?
पण खरं विश्वास म्हणजे नक्की काय..हा प्रश्न पडतो कधी कधी.. विचार केल्यावर वाटतं की विश्वास म्हणजे एक प्रकारची खात्री..
* जेव्हा लहान बाळाला खेळावतांना त्याचे वडील त्याला हवेत हलकेच उडवून मग झेलतात.. तेव्हा त्या बाळाच्या आनंदात असतो तो विश्वास.. की माझे बाबा मला खाली पडू देणार नाही..
* नवरा बायको मधे असतो तो महत्वाचा विश्वासाचा धागा.. की त्यामुळे संशयाला जागा उरत नाही..
* एका बहिणीला असतो तिच्या भावाबद्दल एक विश्वास.. की काही झाले तरी तिचा भाऊ तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील.. आणि तोच भावाचा बहिणीवर विश्वास.. की तिची साथ कायम त्याला असेलच..
* दोन मित्र किंवा मैत्रिणींमधे असलेला विश्वास.. की त्यांच्यातले "secrets" कधीच बाहेर पडणार नाहीत..
आणि ह्या विश्वासाच्या आधारावर मग एखादे नाते हळूहळू मजबूत बळकट होत जाते.. म्हणजेच नाते कुठलेही असो, ते टिकून राहण्यासाठी एकच गोष्ट लागते... विश्वास!
त्याचबरोबर स्वतःचा स्वतःवर विश्वास ठेवणे हे खुप जास्ती महत्वाचे आहे असे मला वाटते. माझाच जर माझ्या स्वतःवर विश्वास नसेल तर मी इतरांवर कधी विश्वास ठेऊ शकेल का? नक्कीच नाही ना... आणि नाही आपल्यावर कोण विश्वास ठेऊ शकणार.. बऱ्याच वेळा असे होते की, आपल्याला एखादे काम पाहिजे असते, हे कार्य आपल्याला मिळाव असे आपल्याला वाटत असते... पण ह्यासाठी आवश्यक आहे की त्या समोरच्या माणसाला आपल्यावर हा विश्वास वाटणे, की, हो.. ही व्यक्ति, मी दिलेले काम अगदी चोख पार पाडू शकते... पण हा विश्वास समोरच्याला तेव्हाच ठेवता येईल जेव्हा आपण स्वतः आपल्यावर विश्वास ठेऊ!
ह्याशिवाय, मी स्वतःसुद्धा जर काहीही करायचे ठरवले तर ते पूर्णत्वास नेण्यासाठीसुद्धा मला इतरांवर नाही तर स्वतःवरच विश्वास ठेवणे अत्यंत गरजेचे आहे, असे मला वाटते..
शेवटी ते म्हणतात ना..
CHARITY BEGINS AT HOME...
हे सर्व होईल तेव्हा होईल.. पण आपापल्या परीने आपण प्रयास करत राहूच..
कारण प्रयास हे आपल्यालाच करायला लागतात. विश्वास हा कुठलेही पुस्तक वाचून वाढवता येत नाही. शेवटी तो आपलाच आपल्याला डेव्हलप करायला लागतो.
एखादे लहान बाळ आहे, जेव्हा त्याला स्वतःवर विश्वास बसतो की, नाही आपल्याला आता चालायला येत आहे तेव्हाच तो चालण्यासाठी पाऊल उचलतो आणि चालता चालता धावण्यासाठी मग तो पुढे सरसावतो.
इथे त्याला कोणीही शिकवायला जात नाही.. की आता तू धावायला लाग किंवा चालायला लाग. हा आपसुकच बदल त्यात त्या विश्वासामुळे होऊ लागतो.
म्हणजेच जिथे विश्वास तिथेच प्रगती. विश्वास असेल तरच आपली वाटचाल प्रगतीच्या दिशेने होउ शकते.
एक महत्वाची गोष्ट म्हणजे विश्वास हा एक तर पूर्ण असतो किंवा अजिबात नसतो. एक तर 0% किंवा 108%.
एक विश्वास असावा पुरता....
काय मित्रांनो, पटतय ना??
- केतकीवीरा कुलकर्णी
"काय, इतका पण विश्वास नाही का माझ्यावर?"
तेव्हा ह्यावर अगदी सहज उत्तर काही वेळा दिलं जातं...
"विश्वास तर पाणिपतच्या लढाईत मेला"
खरच ना! आपल्या प्रत्येकाच्या जीवनात वैयक्तिक पातळीवर ही पानीपतची लडाई सुरूच असते..आणि ह्यामधे बळी जातो तो विश्वासाचा.
आणि एखाद्याच्या विश्वासाचा बळी जाणं म्हणजेच त्या व्यक्तीचा विश्वासघात होणं. आणि हा विश्वासघात होणं म्हणजेच आपण ज्याला म्हणतो एखाद्याच्या पाठीत खंजीर खुपसणं!
आणि ह्या अश्या परिस्थितीतून आपल्यातील प्रत्येक जण गेलेला असतो. कोणीही ह्याला अपवाद नाही..
आपण एखाद्या व्यक्तिवर खुप विशवास ठेवतो, अगदी किती तरी वर्षांच्या ओळखीतून एक बांधीलकि निर्माण झालेली असते आणि त्यातूनच पुढे मग हा विश्वास develop झालेला असतो.. आणि मग एक दिवस असा एक क्षण येतो की ती व्यक्ति मग काही स्वार्थामुळे म्हणा, किंवा कुठल्याही कारणासाठी म्हणा, आपल्या त्या विश्वासाला तडा द्यायला जरा ही मागे पुढे बघत नाही. आणि मग जेव्हा ही गोष्ट आपल्याला समजते तेव्हा मग एका क्षणासाठी काळजात असे चर्रर होऊन जाते आणि मग आपले मन असंख्य प्रश्नांच्या विळख्यात जखडले जाते... "का? कशासाठी? आपण काय ह्याचे वाईट चिंतले होते किंवा काय ह्याचे घोडे मारले होते? का असा विश्वासघात केला?" असे एक ना अनेक प्रश्न लहरी मनात तरंगायला लागतात. पण ह्याचे उत्तर काही सापडत नाही आणि मग नाईलाजाने गप्प बसावे लागते.. ह्यातूनच मग हळूहळू असे होत जाते की आपले मन कोणावरही विश्वास ठेवायला तयार नसते. आणि मग अविश्वासाचे जाळे पसरत जाते आणि आपण सर्वच ह्या जाळ्यात मग अडकून जातो.
कधी कधी खरेच असे वाटते की जर प्रत्येकाने असे ठरवले की.. मी माझ्या अगदी जवळ असणाऱ्या व्यक्तिशी तरी कायम प्रामाणिक राहील, किमान प्रत्येक जण एका तरी व्यक्तीच्या विश्वासाला तडा जाणार नाही ह्याची काळजी घेईल तर कदाचित ह्या सध्या मजबूत झालेल्या अविश्वासाच्या जाळयातून बाहेर पडायला सोपे होईल, नाही का?
जर ही गोष्ट आपल्या स्वतःपासूनच सुरु करायचा प्रयास केला तर?
* नवरा बायको मधे असतो तो महत्वाचा विश्वासाचा धागा.. की त्यामुळे संशयाला जागा उरत नाही..
* एका बहिणीला असतो तिच्या भावाबद्दल एक विश्वास.. की काही झाले तरी तिचा भाऊ तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील.. आणि तोच भावाचा बहिणीवर विश्वास.. की तिची साथ कायम त्याला असेलच..
* दोन मित्र किंवा मैत्रिणींमधे असलेला विश्वास.. की त्यांच्यातले "secrets" कधीच बाहेर पडणार नाहीत..
ह्याशिवाय, मी स्वतःसुद्धा जर काहीही करायचे ठरवले तर ते पूर्णत्वास नेण्यासाठीसुद्धा मला इतरांवर नाही तर स्वतःवरच विश्वास ठेवणे अत्यंत गरजेचे आहे, असे मला वाटते..
शेवटी ते म्हणतात ना..
CHARITY BEGINS AT HOME...
हे सर्व होईल तेव्हा होईल.. पण आपापल्या परीने आपण प्रयास करत राहूच..
कारण प्रयास हे आपल्यालाच करायला लागतात. विश्वास हा कुठलेही पुस्तक वाचून वाढवता येत नाही. शेवटी तो आपलाच आपल्याला डेव्हलप करायला लागतो.
एखादे लहान बाळ आहे, जेव्हा त्याला स्वतःवर विश्वास बसतो की, नाही आपल्याला आता चालायला येत आहे तेव्हाच तो चालण्यासाठी पाऊल उचलतो आणि चालता चालता धावण्यासाठी मग तो पुढे सरसावतो.
इथे त्याला कोणीही शिकवायला जात नाही.. की आता तू धावायला लाग किंवा चालायला लाग. हा आपसुकच बदल त्यात त्या विश्वासामुळे होऊ लागतो.
म्हणजेच जिथे विश्वास तिथेच प्रगती. विश्वास असेल तरच आपली वाटचाल प्रगतीच्या दिशेने होउ शकते.
एक विश्वास असावा पुरता....
काय मित्रांनो, पटतय ना??
- केतकीवीरा कुलकर्णी
2 comments:
केतकी वीरा आपण खूपच सुंदर उदाहरणे देउन आपले विचार सोप्या भाषेत मांडले आहेत. स्वतः वरचा विश्वास म्हणजेच आत्मविश्वास दृढ असतो तेव्हाच कोणतेही कार्य सुगम व सफल होते. कार्याची यशस्विता ही बव्हंशी आत्म्विश्वासावरच अधिकतम अवलंबून असते .
Hey hi ketaki...I must say u have framed this topic very thoughtfully....very nice work :-)
Post a Comment