Friday, 13 February 2015

भांडण प्रेमाचे.....

भांडण प्रेमाचे.....


असे म्हणतात भांडणातून प्रेम वाढत जाते...
असे म्हणतात भांडणातून प्रेम वाढत जाते
असेच एकदा तिने ठरवले
प्रेमाचे छोटे भांडण करावे


तो येताक्षणीच ती
कोपर्यात एका रुसुन बसली
काय झाले हे विचारताच
पाठ फिरवून ती फुगून बसली

त्याला कळत नव्हते काही
नाना तर्हे तिला तो मनवू पाही
ती मात्र गालातच हासुनी
मजा घेत होती त्याची

नेमके त्याने त्याच दिवशी
आणला होता मोगर्याचा गजरा सुवासिक
मस्त त्याने मग एक युक्ति केली
हार काढला तो खिशातुनी

हलकेच केसांतून हात फिरवुनी
माळला त्याने गजरा प्रेमानी
सुगंध तो दरवळला तिच्या मनी
गालातले हसू तिचे आले ओठावरी

उसना राग तो गेला पळूनी
प्रेम दाटले दोघांच्या अंतरी
आला तिचा उर भरुनी 
त्या सुगंधात ती मोहून गेली

असेच असावे हे भांडण प्रेमाचे
अन्नामधे असते मीठ ज्याप्रमाणे
मग स्वादही येइ व प्रेमही वाढे
कडवेपणास मग वाव न मिळे

आणि म्हणूनच जे म्हणतात ते नाही खोटे 
भांडणातून प्रेम वाढत जाते

    भांडणातून प्रेम वाढत जाते.....

- केतकी कुलकर्णी

2 comments:

Unknown said...

केतकीवीरा, खूप छान कविता ....नात्यात हे प्रेमाचे भांडणच प्रेमाची वीण अधिक घट्ट करते हे सर्वस्वी खरे आहे..

Viraj Sarode said...

Truely Awesome

Post a Comment

Feedback

Name

Email *

Message *