मागच्या लेखात आपण cancer वर नॅनो टेक्नॉलॉजी कशी उपयोगी ठरू शकते हे बघितले. आता आपण पुढे अजून कुठे कुठे वैद्यकीय शास्त्रात ह्याचा उपयोग होतो हे थोडक्यात बघू.
आज एक आजार अत्यंत कॉमन झालेला आहे, तो म्हणजे मधुमेह (डायबेटीस)… मधुमेह एकदा झाला की मग संपलं.
या मधुमेहामुळे एक छोटीशी जखम जरी झाली तरीसुद्धा त्याचे महाभयंकर असे परिणाम दिसून येतात. पायाला वगैरे जखम झाली असेल तर तो पाय अगदी कापायची वेळ येते आणि तीसुद्धा फक्त ह्या मधुमेहामुळे. शरिरातील साखरेच्या प्रमाणामधील बिघाड हे यामागचे प्रमुख कारण. तसेच लठ्ठपणा आला की मागोमाग पाठराखीण सारखा मधुमेह हा आजार आलाच. या मधुमेहाला कारणीभूत असते फ्रुक्टोज जे आपण भरभरुन घेत असतो. आपण रोजची साखर जी खातो ती किती प्रमाणात घातक असते हे खरं तर आपल्याला ही कळत नसतं, आणि आपण सर्रास ती खात जातो. ह्या साखरेत असते ग्ल्युकोज आणि फ्रुक्टोज. फ्रुक्टोज शरिराला एकदम घातक. त्यामुळे ते बाजूला सारुन आपण ग्लुकोज साखर अर्थात Dextrose वापरली पाहिजे. आमच्या घरी हेच वापरतात. ह्यामुळे शरिराला केवळ चांगल्या साखरेचाच पुरवठा होतो. या साखरे बद्द्ल अधिक माहिती आरोग्य सुखसंपदा या http://www. aarogyamsukhsampada.com/sugar/ ह्या website वर मिळेल.
या मधुमेहामुळे एक छोटीशी जखम जरी झाली तरीसुद्धा त्याचे महाभयंकर असे परिणाम दिसून येतात. पायाला वगैरे जखम झाली असेल तर तो पाय अगदी कापायची वेळ येते आणि तीसुद्धा फक्त ह्या मधुमेहामुळे. शरिरातील साखरेच्या प्रमाणामधील बिघाड हे यामागचे प्रमुख कारण. तसेच लठ्ठपणा आला की मागोमाग पाठराखीण सारखा मधुमेह हा आजार आलाच. या मधुमेहाला कारणीभूत असते फ्रुक्टोज जे आपण भरभरुन घेत असतो. आपण रोजची साखर जी खातो ती किती प्रमाणात घातक असते हे खरं तर आपल्याला ही कळत नसतं, आणि आपण सर्रास ती खात जातो. ह्या साखरेत असते ग्ल्युकोज आणि फ्रुक्टोज. फ्रुक्टोज शरिराला एकदम घातक. त्यामुळे ते बाजूला सारुन आपण ग्लुकोज साखर अर्थात Dextrose वापरली पाहिजे. आमच्या घरी हेच वापरतात. ह्यामुळे शरिराला केवळ चांगल्या साखरेचाच पुरवठा होतो. या साखरे बद्द्ल अधिक माहिती आरोग्य सुखसंपदा या http://www.
पण नॅनो टेक्नोलॉजीने मधुमेहावर देखील मात करण्याचा उपाय उपलब्ध करुन दिला आहे. संशोधकांनी मधुमेहच्या उपचारासाठी एक वेगळ्या प्रकारची ड्रग डिलिव्हरी टेक्निक विकसित केली आहे. ज्यामध्ये एक स्पंज सारखी असणारी वस्तू इन्सुलिनचा जो गाभा आहे त्या गाभ्याला व्यापून राहते. आपल्या शरीरातील ब्लड शुगर लेवेल कायम राखण्यासाठी, ज्या प्रमाणात इन्सुलिनची गरज असते त्या प्रमाणात हे स्पंज सारखी असणारी वस्तू आकुंचन किंवा प्रसारण पावते. कोळंबी मासा किंवा खेकडा ह्यांच्या कवचामध्ये असणार्या Chitosan नावाच्या वस्तूपासून हा, संशोधकांनी, हा गोलाकार असा स्पंज सारखा एक साचा तयार केला. ह्या साच्यात ग्लुकोस असणारे nanocapsules विखुरलेले असतात. ह्याचा आकार जवळपास २५० मिक्रोमीटर असतो आणि पेशंटच्या शरीरात सहजपणे इंजेक्ट केला जाऊ शकतो. आणि ह्याच्या सहाय्याने शरीरातील ग्लुकोसचे प्रमाण व्यवस्थित राखता येते. याचा प्रयोग एका मधुमेह असलेल्या उंदिरावर केला असता त्यात असे आढळून आले की हा स्पंजचा साचा, जवळपास ४८ तास ब्लड शुगर कमी ठेवण्यास मदत करतो.
त्याचबरोबर खूप ठिकाणी आपण आग लागलेली बघतो, त्या आगीत होरपळणारी अनेक माणसे असतात. किंवा घरातल्या घरातच जर काही गरम उकळतं हातावर पडले तर तिथे भाजले जाते. आणि जर एखादी व्यक्ती व्यक्ती जास्ती प्रमाणात भाजली गेली तर त्या भाजलेल्या ठिकाणी इलाज करतांना नक्कीच त्या व्यक्तीला खूप त्रास होत असणार.. साधी आगीची झळ पण आपल्याला असहय्य करते तर मग आगी मधे भाजले गेल्यावर काय होत असेल ह्याची कल्पना ही न केलेली बरी. ह्यासाठीच नॅनो सिल्व्हर म्हणून चांदीचा वापर ही मेडिकल मधे केला जाणार आहे. ह्यामुळे कुठेही काही भाजलेले असल्यास त्यावर ह्याच्या सहाय्याने त्वरित तो दाह कमी होण्यास मदत होईल. जुन्या काळी ह्या चांदीचा उपयोग ह्यासाठी केला जात होता पण कालांतराने एंटीबायोटिक्समुळे ते मागे पडले. पण आता ह्या नॅनो टेक्नोलॉजीमधून पुन्हा ह्याचा उपयोग केला जाणार आहे. भाजलेल्या जागेवर हे चांदीच्या कोटिंग असणारे बँडेज बांधले जाईल.. ह्यातल्या चांदीचे कण कातडीच्या आत जाऊन स्थिरपणे काम करतात व ह्यामुळे भाजलेल्या व्यक्तींना वरच्यावर ड्रेसिंग करण्याची ही गरज पडणार नाही.
तसेच एक advanced wound dressing तयार केले जात आहे. ह्या ड्रेसिंगमधून nanocapsules मधून antiobiotics सोडले जातील आणि भाजलेल्या जागी पुढे infection व्ह्याच्या आधीच त्यावर इलाज झालेला असेल. ह्याशिवाय त्यात अशी ही सोय असेल कि जर एखाद्या वेळेस त्या जखमेवर infection झालेले असेल तर लगेच त्या ड्रेसिंगचा रंग बदलून जाइल कि जेणेकरून डॉक्टरांना लगेच इन्फेक्शन झाल्याचे समजेल. भाजल्या गेलेल्या व्यक्तींवर उपचार करण्याची हा एक खूप महत्वाचा टप्पा आहे, विशेषतः लहान मुलांमध्ये, कारण लहान मुलांमध्ये जर असे इन्फेक्शन झाले तर त्यांचा त्यातून मृत्यू ही होऊ शकतो. जे नेहमीचे ड्रेसिंग असेल, आणि इन्फेक्शन झालेले असेल तर ते ड्रेसिंग काढून टाकायला लागते, आणि ह्यामुळे पुढे ती जखम भरण्यात खूप वेळ लागतो आणि ते त्रासदायक ही खूप होऊन बसते. ह्या advanced ड्रेसिंगमुळे recovery लवकर होऊ शकते. अल्सर झाला असल्यास किंवा मिलिटरी मधल्या लोकांना जखमा झालेल्या असल्यास, त्यावर ही ह्या ड्रेसिंगचा उपयोग होऊ शकतो.
एखादी शस्त्रक्रिया करण्यासाठी एक डॉक्टर/सर्जन आपल्या शरीराच्या आतमधे जाऊन आपल्यावर इलाज करतो आहे... काय, केली आहे का कधी अशी कल्पना??? नाही ना.. पण हे ह्या टेक्नोलॉजीमधून होऊ शकणार आहे. आश्चर्य वाटलं ना? पण हे असे खरोखर घडू शकणार आहे. नॅनो टेक्नोलॉजी मधे असे काही छोटी यंत्र बनविले जात आहेत की जे आपल्या रक्त वाहिन्यांमधून आपल्या हृदयात जाऊन तिथे शोध घेतात व आपल्या हृदयातील आजारी valve शोधून त्यावर तिथल्या तिथे इलाज करतात.. आणि त्याचबरोबर अजून काही कायमस्वरूपी छोटे छोटे यंत्र सोडले जातील की जे शरीरातल्या कमकुवत organs ना नीट काम करण्यासाठी सहाय्य करतील..
आपण नेहमी म्हणतो ना.. "काट्याने काटा काढला जातो" तसेच काहीसे आहे हेसुद्धा..
आपल्यातील विविध आजारांना कारणीभूत असणारे आपल्याच शरीरातील वाईट बॅक्टेरिया किंवा व्हायरस हे असेच छोट्या नॅनो आकाराचे असतात व ह्यावर म्हणूनच उपाय ही अशाच नॅनो कणांनी केल्यावर जास्ती प्रभावी ठरतो..
ह्या टेक्नॉलिलोजिच्या सहाय्याने अस्थमा रुग्णांना सुद्धा आराम मिळण्याचे चांसेस खुप आहेत तसेच आपली श्वसनक्रिया, रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यासाठी सुद्धा ह्याचा खुप मोठा हात असणार आहे.
असे काही नॅनोकणही तयार केले जात आहेत की जे औषधद्रव्यांमधे टाकल्यवर, जेव्हा ते औषध शरीरात जातील तेव्हा त्यातील नॅनोकण direct त्या आजारी पेशींवर जाऊन त्यावर इलाज करतील. जेव्हा असे द्रव्य आपल्या शरीरात टाकले जातील तेव्हा मग ह्याचा अर्थ असा होऊ शकतो का, की आपल्या शरीरात काही आजार निर्माण करणारी पेशी असेल तर त्या पेशिवर आधीच इलाज केला जाईल आणि जर असे झाले तर मग आपल्यातील आजारी पडण्याचे प्रमाण कमी कमी होत कदाचित एक दिवस पूर्ण नाहीसेच होईल..आणि मग मनुष्याचे वयोमान वाढेल. मृत्यूचे प्रमुख कारण असणारे "आजारपण" ह्या कारणाचाच मृत्यू होईल काय? म्हणजे फार फार पूर्वीच्या काळातील कथा आपण ऐकतो की हा मनुष्य ३५० वर्षे जगला. हा ५०० वर्षे जगला..असे देखील होईल काय? हे खर तर अजून फिक्शनच आहे.
पण खरच असं झाल तर?
- संदर्भ
- नॅनोदय - अच्युत गोड्बोले व माधवी ठाकुरदास
- डॉ.अनिरुद्ध धै जोशी (सेल्फ हेल्थ सेमिनार)
- डॉ.अनिरुद्ध धै जोशी (सेल्फ हेल्थ सेमिनार)
- केतकी कुलकर्णी
2 comments:
केतकी कुलकर्णी,
तुमचा लेख वाचला. तंत्र ज्ञानामुळे मानवाच्या आरोग्यामध्ये किती फरक पडू शकतो हे ह्या लेखमधुन समजले.मधुमेह, भाजलेल्या व्यक्तींसाठी nano -सिल्वर, तसेच अस्थमा रोगावरचा इलाज ह्या गोष्टींची साधी कल्पना सुद्धा नव्हती. मानवी आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असणारी माहिती दिल्याबद्दल आभार.
राजीव कदम
Ketaki your article gives amazing info about Nano Technology. It may proove a boon for diabetes patients, patiens with burns and wounds ! Insertion of antibiotics through Nano capsules may heal many difficult complications of human body.
Thanks for giving such wonderful information.
Post a Comment