आपण अनेक वेळा काही खाद्य पदार्थ बाजारातून आणतो आणि घरी येईपर्यंत ते बहुतेक वेळेला खराब होतात.. काही वेळेला आपल्याला समजतसुद्धा नाही की नक्की हा पदार्थ खाण्या योग्य आहे की नाही.. आणि म्हणूनच आपल्याला तो खाद्य पदार्थ चांगला आहे की नाही हे आधीच कळण्यासाठी आता नॅनोसंवेदक (NANOSENSORS) वापरण्यात येणार आहेत.
हे नॅनो संवेदक अन्न pack करणाऱ्या materials बरोबरच एकत्रित केले जातात आणि ह्यामुळे रोग निर्माण करणारे विषाणू, त्यामुळे तयार होणारे विष, घातक केमिकल्स हे सर्व नॅनो संवेदक शोधु शकतील. हे नॅनो संवेदक एका इलेक्ट्रॉनिक जीभ किंवा नाकासारखेच काम करतील..
जेव्हा ही इलेक्ट्रॉनिक जीभ किंवा नाक त्या packing मटेरियल मधे बसवले जातील आणि जर आतील अन्न खराब होउ लागले तर तसा संकेत ह्या जीभेला मिळेल आणि त्याप्रमाणे एक तर त्या packing मटेरियलचा रंग तरी बदलेल किंवा जर त्यावर एक दिवा बसवलेला असेल तर अन्न खराब झाल्यावर तो दिवा उघडझाप करायला लागेल..
SALMONELLA ह्या नावाचा bacteria ज्यामुळे आपल्याला food poisoning होते, तो ही ह्या नॅनो संवेदक मुळे डिटेक्ट होण्यात मदत होते.
काही कंपन्यांनी तर अशी काही materials बनविले आहेत की त्यात चक्क प्रोटीन्स वापरली आहेत. ही प्रोटीन्स अन्न खराब करणाऱ्या जीवाणूंना स्वतःशी बांधून घेतात आणि चमकायला लागतात. त्यांच्या ह्या चमकण्यामुळे अन्नात जीवाणू तयार होत आहेत हे कळतं. जेवढे जीवाणु जास्त तेवढे हे प्रोटीन्स जास्त चमकतात.
तसेच आपण बाजारातून फळे आणतो.. आणि काही वेळेला आपल्याला वरुन पाहून कळत नसतं की हे फळ अति पिकलेले आहे का कच्चे आहे.. लगेच खाण्यासारखे आहे की नाही.. आणि मग ती फळं बहुतेक वेळा वाया जातात. ह्यासाठी आपल्याला मदत होते ती INTELLIGENT RIPENESS INDICATORची. जेव्हा फळं pack केले जातात तेव्हा, हे indicators फळांमधुन येणाऱ्या वासाला प्रतिसाद देतात व ग्राहकाला ते फळ घरी जाऊन खाण्यायोग्य आहे की नाही हे सांगतात आणि ह्यामुळे फळ विक्रेत्यांकडची फळेही वाया जात नाहीत.
FRESHNESS INDICATOR.. pack केलेलं अन्न ताजं आहे की नाही ते ह्या visual फ्रेशनेस इंडिकेटर ने कळायला मदत होते. ह्यात packing मटेरियल मधे चांदीचा नॅनो थर वापरण्यात येतो. जर अन्न फ्रेश नसेल तर त्या packingचा रंग बदलून जातो. समजा जर packing एका चॉकलेटी रंगाचे असेल आणि अन्न जर शिळे झालेले असेल तर त्या चॉकलेटी रंगाचा पांढरा रंग होतो व आपल्याला कळते की हे अन्न शिळे झालेले आहे किंवा तिथे एक लेबल असते ज्यावर क्रॉस उमटून येतो की ज्यामुळे हे अन्न खाऊ नये अशी सूचना आपल्याला मिळू शकते.
RFID (RADIO FREQUENCY IDENTIFICATION) chips packaging मटेरियलवर बारकोड सारखे प्रिंट केले जातात..पण हे नेहमीचे RFID चिप्स खुप महाग असतात पण तेच नॅनो बेस्ड RFID चिप्स नॉर्मल सिलिकॉन चिप्सला पूर्णपणे रिप्लेस करू शकतील. हे नॅनो बेस्ड RFID चिप्स खुपच स्वस्त दरात मिळतात आणि ते आकारातही लहान असतात आणि जास्ती लावचिकही असतात व त्याचबरोबर ह्यामधे माहिती ( केव्हा, कुणी, कशी बनवली, त्याची जागा, वजन...) साठवलेली असते.
आपण एखाद्या मॉल मधे गेल्यावर ज्या काही वस्तुंची खरेदी करतो, त्या सर्व वस्तु आपल्याला बारकोड रीडर मधून वाचण्यासाठी बाहेर काढायला लागतात पण ह्या RFID टॅग सतत वायरलेस पद्धतीने संदेश RFID रीडरला पाठवत असतो. त्यामुळे आपण फक्त वस्तुंची ट्रॉली त्या RFID रीडर समोरून नेइल. त्या निवडलेल्या वस्तुंचे टॅग्ज वायरलेस पद्धतीने माहिती रीडरकडे पाठवतील. रीडरमधला computer मग त्या टॅग लावलेल्या वस्तुंच्या कीमतीवरून एकूण बिलाचं गणित करून ते छापेल आणि ह्यामुळे आपला वेळही वाचेल.
तसेच ह्या टॅग्ज मुळे अन्न कुठे कुठे फिरत आहे हे ही आपल्याला कळुन येईल. समजा एखाद्या चोराने कुठे चोरी केली आहे आणि नंतर पोलिसांना असे समजले की त्या चोराकडे एक पोटॅटो चिप्सचे वगैरे packet आहे तर त्या packet मधील ह्या RFID टॅगमुळे चोराची exact जागा लोकेट करून त्या चोराला पकडणे सोपे होउ शकते.
आपल्या प्रत्येकाची शरीररचना वेगवेगळी असते.. कोणाला तिखटाची एलर्जी असते तर कोणाला गोडाची.. काही जणांना B.P चा त्रास असतो तर काहींना मधुमेहाचा. त्यामुळे प्रत्येकाला एकसारखेच अन्न खाल्लेले चालत नाही. आणि ह्यासाठीच पुढे INTERACTIVE FOODची कल्पना विकसित होत आहे. ह्यातून अन्नाचा शरीराशी संवाद होउ शकतो आणि शरीरातील ज्या भागाला ज्या पोषकद्रव्यांची जशी गरज असेल तसे त्याप्रमाणात यया भागापर्यंत ते द्रव्य पोचवण्याचे काम ह्यामुळे होउ शकेल.
'क्राफ्ट इंटरनेशनल' या कंपनीने पंधरा विद्यापीठांचा एक ग्रुप बनवला आहे. ह्या ग्रुपद्वारे एक आगळं वेगळं संशोधन करण्याचा विचार चालु आहे. आपल्या शरीरात काही प्रोटीन्स किंवा enzymes पासून बनवलेले नॅनो संवेदक सोडले जातील. आपल्या शरीरात कुठल्या पोषकद्रव्यांची कमतरता आहे हे शोधले जाईल आणि मग त्याप्रमाणे ते पोषकद्रव्य असलेली नॅनो कॅप्सुल शरीरात सोडली जाईल आणि जेव्हा शरीराला त्याचीबगराज असेल तेव्हाच ती कॅप्सुल उघडली जाईल. समजा आत्ता मला कॉडलिव्हर ऑइलची गरज आहे तर एका विशिष्ट कॅप्सुलमधे ते ऑइल भरलं जाईल आणि ती कॅप्सुल ज्यावेळी लिव्हर मधे जाऊन पोचेल तेव्हाच ती उघडेल आणि ह्यामुळे मला त्या ऑइलची वाईट चव ही घ्यावी लागणार नाही.
काही संशोधकांच्या मते तर ह्या INTERACTIVE FOODची पुढची पायरी म्हणजे 'नॅनो फूड पिल' असेल. ज्यामधे आपल्याला लागणाऱ्या सर्व विटामिन्स वगैरे त्यात असेल.. भूक लागली की फक्त ही एक अन्नगोळी खल्ली की काम झालं!
पण ही नॅनो फूड पिलचि सुविधा ज्यांना खाण्याचा कंटाळा येतो अशांसाठीच उपयोगी ठरेल.. कारण आपल्या प्रत्येकालच चविष्ट पदार्थ खायची आणि बऱ्याच जणांना स्वादिष्ट अन्न बनवण्याची हौस असते.
खरच! किती उपयोग आहे ह्या नॅनो टेक्नॉलॉजीचा.. पुढच्या आयुष्यात मला हे आवडत नाही आणि ते आवडत नाही म्हणून मी अमुक अमुक खाणार नाही अशी तक्रार मुलांकडून येणारच नाही.. कारण प्रत्येकाला हवी ती चव, हवा तो वास, हवे तसे अन्न मिळत जाईल आणि ते ही त्या अन्नाचा पौष्टिकपणा अबाधित ठेवून. हेल्थी आणि टेस्टी फूड ते ही कमी श्रमात असे ह्या नॅनो टेक्नोलॉजीमुळे सहज शक्य होऊ शकेल, हेल्थी फूड मिळाल्यामुळे नक्कीच आजारांचेही प्रमाण कमी होण्यास मदत होईल, नाही का? एकापेक्षा एक भन्नाट कल्पना ह्या नॅनो टेक्नोलॉजीमुळे विकसित होत आहेत.
पुढे भेटुच अशाच नविन कल्पनांसोबत!!
Reference: * नॅनोदय बुक
* http://www.tappi.org/content/events/09PLACESY/Symp_Papers/yezza.pdf
- केतकी कुलकर्णी
हे नॅनो संवेदक अन्न pack करणाऱ्या materials बरोबरच एकत्रित केले जातात आणि ह्यामुळे रोग निर्माण करणारे विषाणू, त्यामुळे तयार होणारे विष, घातक केमिकल्स हे सर्व नॅनो संवेदक शोधु शकतील. हे नॅनो संवेदक एका इलेक्ट्रॉनिक जीभ किंवा नाकासारखेच काम करतील..
जेव्हा ही इलेक्ट्रॉनिक जीभ किंवा नाक त्या packing मटेरियल मधे बसवले जातील आणि जर आतील अन्न खराब होउ लागले तर तसा संकेत ह्या जीभेला मिळेल आणि त्याप्रमाणे एक तर त्या packing मटेरियलचा रंग तरी बदलेल किंवा जर त्यावर एक दिवा बसवलेला असेल तर अन्न खराब झाल्यावर तो दिवा उघडझाप करायला लागेल..
SALMONELLA ह्या नावाचा bacteria ज्यामुळे आपल्याला food poisoning होते, तो ही ह्या नॅनो संवेदक मुळे डिटेक्ट होण्यात मदत होते.
काही कंपन्यांनी तर अशी काही materials बनविले आहेत की त्यात चक्क प्रोटीन्स वापरली आहेत. ही प्रोटीन्स अन्न खराब करणाऱ्या जीवाणूंना स्वतःशी बांधून घेतात आणि चमकायला लागतात. त्यांच्या ह्या चमकण्यामुळे अन्नात जीवाणू तयार होत आहेत हे कळतं. जेवढे जीवाणु जास्त तेवढे हे प्रोटीन्स जास्त चमकतात.
तसेच आपण बाजारातून फळे आणतो.. आणि काही वेळेला आपल्याला वरुन पाहून कळत नसतं की हे फळ अति पिकलेले आहे का कच्चे आहे.. लगेच खाण्यासारखे आहे की नाही.. आणि मग ती फळं बहुतेक वेळा वाया जातात. ह्यासाठी आपल्याला मदत होते ती INTELLIGENT RIPENESS INDICATORची. जेव्हा फळं pack केले जातात तेव्हा, हे indicators फळांमधुन येणाऱ्या वासाला प्रतिसाद देतात व ग्राहकाला ते फळ घरी जाऊन खाण्यायोग्य आहे की नाही हे सांगतात आणि ह्यामुळे फळ विक्रेत्यांकडची फळेही वाया जात नाहीत.
FRESHNESS INDICATOR.. pack केलेलं अन्न ताजं आहे की नाही ते ह्या visual फ्रेशनेस इंडिकेटर ने कळायला मदत होते. ह्यात packing मटेरियल मधे चांदीचा नॅनो थर वापरण्यात येतो. जर अन्न फ्रेश नसेल तर त्या packingचा रंग बदलून जातो. समजा जर packing एका चॉकलेटी रंगाचे असेल आणि अन्न जर शिळे झालेले असेल तर त्या चॉकलेटी रंगाचा पांढरा रंग होतो व आपल्याला कळते की हे अन्न शिळे झालेले आहे किंवा तिथे एक लेबल असते ज्यावर क्रॉस उमटून येतो की ज्यामुळे हे अन्न खाऊ नये अशी सूचना आपल्याला मिळू शकते.
![]() |
With meats, Japan uses labels with changing colors based on the level of ammonia the food emits as it ages |
आपण एखाद्या मॉल मधे गेल्यावर ज्या काही वस्तुंची खरेदी करतो, त्या सर्व वस्तु आपल्याला बारकोड रीडर मधून वाचण्यासाठी बाहेर काढायला लागतात पण ह्या RFID टॅग सतत वायरलेस पद्धतीने संदेश RFID रीडरला पाठवत असतो. त्यामुळे आपण फक्त वस्तुंची ट्रॉली त्या RFID रीडर समोरून नेइल. त्या निवडलेल्या वस्तुंचे टॅग्ज वायरलेस पद्धतीने माहिती रीडरकडे पाठवतील. रीडरमधला computer मग त्या टॅग लावलेल्या वस्तुंच्या कीमतीवरून एकूण बिलाचं गणित करून ते छापेल आणि ह्यामुळे आपला वेळही वाचेल.
तसेच ह्या टॅग्ज मुळे अन्न कुठे कुठे फिरत आहे हे ही आपल्याला कळुन येईल. समजा एखाद्या चोराने कुठे चोरी केली आहे आणि नंतर पोलिसांना असे समजले की त्या चोराकडे एक पोटॅटो चिप्सचे वगैरे packet आहे तर त्या packet मधील ह्या RFID टॅगमुळे चोराची exact जागा लोकेट करून त्या चोराला पकडणे सोपे होउ शकते.
आपल्या प्रत्येकाची शरीररचना वेगवेगळी असते.. कोणाला तिखटाची एलर्जी असते तर कोणाला गोडाची.. काही जणांना B.P चा त्रास असतो तर काहींना मधुमेहाचा. त्यामुळे प्रत्येकाला एकसारखेच अन्न खाल्लेले चालत नाही. आणि ह्यासाठीच पुढे INTERACTIVE FOODची कल्पना विकसित होत आहे. ह्यातून अन्नाचा शरीराशी संवाद होउ शकतो आणि शरीरातील ज्या भागाला ज्या पोषकद्रव्यांची जशी गरज असेल तसे त्याप्रमाणात यया भागापर्यंत ते द्रव्य पोचवण्याचे काम ह्यामुळे होउ शकेल.
'क्राफ्ट इंटरनेशनल' या कंपनीने पंधरा विद्यापीठांचा एक ग्रुप बनवला आहे. ह्या ग्रुपद्वारे एक आगळं वेगळं संशोधन करण्याचा विचार चालु आहे. आपल्या शरीरात काही प्रोटीन्स किंवा enzymes पासून बनवलेले नॅनो संवेदक सोडले जातील. आपल्या शरीरात कुठल्या पोषकद्रव्यांची कमतरता आहे हे शोधले जाईल आणि मग त्याप्रमाणे ते पोषकद्रव्य असलेली नॅनो कॅप्सुल शरीरात सोडली जाईल आणि जेव्हा शरीराला त्याचीबगराज असेल तेव्हाच ती कॅप्सुल उघडली जाईल. समजा आत्ता मला कॉडलिव्हर ऑइलची गरज आहे तर एका विशिष्ट कॅप्सुलमधे ते ऑइल भरलं जाईल आणि ती कॅप्सुल ज्यावेळी लिव्हर मधे जाऊन पोचेल तेव्हाच ती उघडेल आणि ह्यामुळे मला त्या ऑइलची वाईट चव ही घ्यावी लागणार नाही.
काही संशोधकांच्या मते तर ह्या INTERACTIVE FOODची पुढची पायरी म्हणजे 'नॅनो फूड पिल' असेल. ज्यामधे आपल्याला लागणाऱ्या सर्व विटामिन्स वगैरे त्यात असेल.. भूक लागली की फक्त ही एक अन्नगोळी खल्ली की काम झालं!
पण ही नॅनो फूड पिलचि सुविधा ज्यांना खाण्याचा कंटाळा येतो अशांसाठीच उपयोगी ठरेल.. कारण आपल्या प्रत्येकालच चविष्ट पदार्थ खायची आणि बऱ्याच जणांना स्वादिष्ट अन्न बनवण्याची हौस असते.
खरच! किती उपयोग आहे ह्या नॅनो टेक्नॉलॉजीचा.. पुढच्या आयुष्यात मला हे आवडत नाही आणि ते आवडत नाही म्हणून मी अमुक अमुक खाणार नाही अशी तक्रार मुलांकडून येणारच नाही.. कारण प्रत्येकाला हवी ती चव, हवा तो वास, हवे तसे अन्न मिळत जाईल आणि ते ही त्या अन्नाचा पौष्टिकपणा अबाधित ठेवून. हेल्थी आणि टेस्टी फूड ते ही कमी श्रमात असे ह्या नॅनो टेक्नोलॉजीमुळे सहज शक्य होऊ शकेल, हेल्थी फूड मिळाल्यामुळे नक्कीच आजारांचेही प्रमाण कमी होण्यास मदत होईल, नाही का? एकापेक्षा एक भन्नाट कल्पना ह्या नॅनो टेक्नोलॉजीमुळे विकसित होत आहेत.
पुढे भेटुच अशाच नविन कल्पनांसोबत!!
Reference: * नॅनोदय बुक
* http://www.tappi.org/content/events/09PLACESY/Symp_Papers/yezza.pdf
- केतकी कुलकर्णी
3 comments:
Amazing technology
केतकी आपण नॅनो टेक्नोलॉजीमुळे शक्य होणार्या ज्या स्मार्ट फूड पॅकींगची माहिती दिली ती खरोखरच थक्क तर करणारी आहेच, ही नॅनो टेक्नोलॉजी अनेकविध क्षेत्रांमध्ये माणसासाठी एक उत्तम वरदान ठरणार आहे असे जाणवले.
नॅनोसंवेदकाचे काम कसे चालते , INTELLIGENT RIPENESS INDICATOR , FRESHNESS INDICATOR. नॅनोवर आधारीत RFID (RADIO FREQUENCY IDENTIFICATION) ह्या सर्व अनभिज्ञ विषयांची माहिती खूप सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेतून करून दिल्याबद्दल आपले खरेच कौतुक करावे तेवढे कमीच आहे.
आपल्या लेखांतून नॅनो टेक्नोलॉजी संबंधित अशीच उत्कंथावर्धक माहिती वाचायला मिळेल ही अपेक्षा.
केतकी अतिशय सुंदर माहिती तुझ्या प्रत्येक लेखातून आम्हाला मिळते ,
नॅनो टेक्नोलॉजीसारख्या अत्यंत महत्त्वपूर्ण विषयाबद्दल भोवतालच्या जगात ज्या नवनवीन गोष्टी घडत आहेत ते आम्हाला समजत आहे.
RFID, INTELLIGENT RIPENESS INDICATOR चा उपयोग खरच किती आहे हे कळले .
waiting for reading more form you about this Amazing technology.
Post a Comment