Tuesday, 7 July 2015

एकांत


असेच सायंकाळी एका
मन रमले होते एका विश्वातच वेगळ्या
बाहेरही ढग जमुनी आले होते सारे
पसरली होती चोहिकडे अगदी निरव अशी शांतता

कसला ही आवाज नाही
नाही कुठलीही हालचाल
झाडांनाही अलगदच
स्पर्श होत होता वाऱ्याचा

बाहेर होती निव्वळ शांतता
मनात मात्र होता कल्लोळ विचारांचा
बाहेरील शांतता पाहून 
मनातला गोंधळ क्षणभर थांबला
वाटले जरा अनुभवावा 
कधीतरी एकांत हा

स्वतःशीच बोलावे अन 
स्वतःशीच हसावे
अगदी मनमुरादपणे, 
स्वतःशीच भांडावे
वाटले कधी रडावेसे तर 
भरपूर रडून ही घ्यावे
बांध सारे तोडून, 
सर्व भावनांना बेछूटपणे वाहू द्यावे

नको कोणते संभाषण
नको कुठल्या भेटी गाठी
सोडुनी भ्रांत साऱ्या
स्वतःच स्वतःमधे रंगून जावे

नाही कोणी रोखायला,
नाही कोणी टोकायला
पाहिजे तसे पाहिजे तेव्हा, 
मोकळे आपण बागडायला
सर्वांमधे राहून ही 
'एकटे' तर बरेच राहतात
पण एकांतात राहुनही 
मेळाव्याचा भास घेणारे तसे कमीच असतात.. 

- केतकी कुलकर्णी 

3 comments:

Makarand said...

एकांतपणा घेणारे खरच कमी असतात.

Unknown said...

केतकी खूप सुंदर हृदयस्पर्शी कविता... बांध सारे तोडून, सर्व भावनांना बेछूटपणे वाहू द्यावे --खरेच ही एकांताची किमया अगदी प्रत्येकाला अनुभवावीशी वाटते कायम .

नको कोणते संभाषण
नको कुठल्या भेटी गाठी
सोडुनी भ्रांत साऱ्या
स्वतःच स्वतःमधे रंगून जावे .... असा हा एकांत खरोखरीच आपलीच आपल्याला स्वत:ची एक नव्याने ओळख करून देतो...
अप्रतिम शब्दांनी रेखाटले आहे...

Viraj Sarode said...

Awesome Poem... Hatsoff to you KetakiVeera..
After listening to this poem i recollected these lines which i heard long back

Ek baki ekaki...
Ek ant ekaant..
Ek adke ekat..ek ekta jagat..
Ek Khidki ek vara...
Ek chandra ek tara...
Ek najar ek vaat..
Ek ekta...ektaach....

Post a Comment

Feedback

Name

Email *

Message *