Tuesday, 28 July 2015

A salute to Dr Abdul Kalam..

काल रात्री अगदी वाऱ्याच्या वेगाने डॉ. अब्दुल कलाम ह्यांच्या निधनाची वार्ता सर्वत्र पसरली.. ऐकून एक धक्काच बसला.. क्षणभर स्वतःवर विश्वासच बसत नव्हता.. 
डॉ. ए. पी. जे.अब्दुल कलाम हे एक थोर शास्त्रज्ञ होते. आणि एवढेच नाही तर त्यांना 40 देशांतील विद्यापीठांमधुन डॉक्टरेट ही पदवी ही बहाल केलेली होती व त्याचबरोबर पद्मभूषण, पद्मविभूषण, भारतरत्न असे पुरस्कारही त्यांना मिळालेले होते. 


अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सर्वांनाच आपलेसे करणारे असे हे व्यक्तिमत्व.. कालच रात्री टी.व्ही. वर एका पत्रकाराची मुलाखत पाहिली.. त्यात तो सांगत होता की डॉ कलाम हे एकदा डोंबिवलीमधे आले होते आणि त्यांना लहान मुलांची प्रचंड आवड होती. ते आले आणि सर्व तरुण लहान मुलांनी त्यांना गराडा घातला.. आणि ह्याच त्यांना राग आला नाही तर उलट ते त्या सर्व लहान मुलांमधे पूर्णपणे मिसळून गेले. त्या मुलांना जराहि असे जाणवले नाही की ते कोणत्या 'मोठ्या' व्यक्ति सोबत आहेत., इतके ते त्या लहान मुलांमधे समरसले होते. 
हा खरच एक अत्यंत सूंदर गुण आहे त्यांचा.. 

डॉ. कलाम म्हणजे YOUTH ICONच!! नेहमीच ते युवकांसाठी एक प्रेरणास्रोत ठरत गेले. तसेच स्वतःकडे असलेले ज्ञान इतरांना द्यायचे.. देतच राहयचे.. हा तर त्यांचा सहज स्वभाव होता.. 
त्यांची अनेक प्रेरणादायी वाक्य आपण बघतो आणि त्यातले मला सर्वात जास्ती भावलेले वाक्य म्हणजे-
I'M NOT A HANDSOME GUY, BUT I CAN GIVE MY HAND-TO-SOME ONE WHO NEEDS HELP, BEAUTY IS IN HEART, NOT IN FACE..

गरजेला दुसऱ्यांच्या उपयोगी पडावं हे किती महत्वाचे त्यांना वाटायचे.. आणि तसेच त्यांनी केलेसुद्धा.. मी अगदी देखणा/देखणी आहे, माझ्याकडे भरपूर भरगच्च ज्ञान आहे.. माझी बुद्धि अगदी तल्लख आहे आणि एखाद्याला जर माझ्याकडे असलेल्या ज्ञानाची अगदी थोडी गरज असेल पण मी माझी वृत्ती मात्र अतिशय संकुचित ठेवून.. माझा स्वतःचच हित बघत जर ते ज्ञान दिलेच नाही तर काय उपयोग त्या सौंदर्याच्या आणि काय उपयोग त्या ज्ञानाचा!!!! आपले खरे सौंदर्य आपल्या संकुचित वृत्ती मधे नाही तर उदारपणे देण्याच्या वृत्ती मधे आहे.. हा एक खुप मोठा धडा आपल्या प्रत्येकाला डॉ कलाम ह्यांच्याकडून नक्कीच शिकायला मिळतो..  खरं तर इतक्या पदव्या.. इतके पुरस्कार माणूस काय असेल!! आजचा काळ बघता अशा माणसामधे किती मिजास असायला पाहिजे.. आपल्याला साधे शाळा/कॉलेज/ऑफिस मधे एखादे बक्षीस मिळाले तरी आपण स्वतःला कोणी मोठे समजून समोरच्याला तुच्छ लेखायला सुरुवात करतो.. पण डॉ कलाम मात्र ह्या विभागात अजिबातही मोडणारे नव्हते.. DOWN TO EARTH राहणे म्हणजे काय हे खरच आपल्याला डॉ कलाम ह्यांनी दाखवून दिले..

डॉ कलाम ह्यांच्यातली सर्वात खास गोष्ट म्हणजे. डॉ कलाम ह्यांनी स्वतःला कधीच मुस्लिम मानले नाही. ते जेव्हा राष्ट्रपति झाले तेव्हा संपूर्ण 'भारताचे' राष्ट्रपति म्हणूनच कार्यरत राहिले. ते पूर्ण शाकाहारी होते.  तसेच त्यांची परमेश्वरावरही अतूट श्रद्धा होती. ते रोज कर्नाटिक भजन ऐकत.. एवढेच नाही तर ते भगवद् गीतेचेही पठण करीत.. एवढा मान सम्मान मिळालेला असतांना ही त्यांची देवावर श्रद्धा होतीच.. हा एक अतिशय सूंदर आणि अतिशय महत्वाचा गुण त्यांचा घेण्यासारखा आहे. परमेश्वराचे अस्तित्व त्यांनी कधीच नाकारले नाही. आणि म्हणूनच ह्यात काहीच शंका नाही की साक्षात तो पांडुरंग त्यांना भेटायला आला व त्यांना अपल्यासोबत घेऊन गेला. आणि असे तसे नेले नाही तर त्यांची इच्छा पूर्ण करत घेऊन गेला. त्याना त्यांचे मरण शिकवतांनाच व्हावे असे नेहमी वाटायचे.. आणि घडले ही तसेच!
काय ती जिद्द आणि काय ते प्रेम.. किती ती ओढ.. स्वतःकडचे अर्जित इतरांना वाटण्याची.. 
स्वतःचा मृत्यु झाल्यानंतर शाळा/कॉलेज/कार्यालय बंद न ठेवता एक दिवस जास्ती श्रम करा असे सांगणारा बहुदा हा पहिलाच माणूस अस्तित्वात असावा..

भारत रत्न मिळालेले हे भारताचे सर्वोत्तम रत्न, अखेरपर्यंत चकाकतच राहिले. आणि पुढेही त्यांच्या प्रेरणादायी संदेशांमधून, त्यांनी आतापर्यंत विज्ञान, स्पेस, क्षेपणास्त्र.. अशा विविध क्षेत्रांमधे केलेल्या अनमोल कामगिरीमधून कायम चमकतच राहील..
ह्या MISSILE MANला, युवकांच्या प्रेरणास्थानाला, FOREVER YOUNG असणाऱ्या, डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम ह्यांना एक सलाम!!

Dr. Kalam Sir, we all are and we will always be proud of you...

- केतकी कुलकर्णी 

0 comments:

Post a Comment

Feedback

Name

Email *

Message *