Wednesday, 25 November 2015

चार्ल्स थामसन रीस विल्सन

Charles Thomson Rees Wilson



आज आपण पाहतो की अनेक नवनवीन संशोधनं होत आहेत आणि ह्याच संशोधनांच्या आधारे आपल्या जीवनात एक प्रकारची सहजता येऊ लागली आहे.
 संशोधनांचे काही उदाहरणं म्हणजे.....

आपल्याला हे चित्रपटांमधुन किंवा ऐकून हे माहीत आहे की सुरुवातीच्या काळामधे काबूतरांमार्फत संदेश पोचवला जाई..तेच आजच्या काळात आपण बघितलं तर आज अगदी साता समुद्रापालिकडेही माणूस दूरध्वनी वरून किंवा वीडियो कॉलिंग च्या सहाय्याने सहज बोलू शकतो...
घारीचे उदाहरण घेऊन विमानाचा शोध लावण्यात आला आणि ह्यामुळे आज आपल्याला परदेश गमनागमन एकदम सोपे झाले आहे..
सुरवातीच्या काळामधे संगणक हे एक अतिशय मोठे व अवजड असे यंत्र होते व प्रत्येकाच्या आवाक्याच्याही बाहेर होते पण तेच आज हे अगदी छोट्या आकारामधे (टॅब, नोटबुक... ) उपलब्ध आहेत आणि परवडणारेही आहे..
असे अनेक संशोधन आपण आजच्या जगात बघत आहोत.. हे सारे शक्य होऊ शकले ते मानवाने केलेल्या नवीन विचार व शोधांमुळे.. हे संशोधन निर्माण होतात ते व्यवस्थित केलेल्या निरिक्षण व अभ्यासामुळे.. एखादी गोष्ट किंवा घटना कशी घडली, का घडली ह्याचा योग्य रीतीने अभ्यास केल्यावर ही असे शोध लागतात.. असेच अनेक शोध लावणारे बरेच संशोधक ह्या आपल्या संपूर्ण जगाला लाभले व त्यांच्यामुळे आपले जीवन आज बऱ्यापैकी सोपे झाले आहे..


आकाशातील ढगांभोवती सूर्याची कडा बघुन ते खूप भारावुन गेले व ढग बनलेले बघुन त्यांनी त्यातून प्रेरणा घेतली व तसेच अनुकरण आपल्या प्रयोगशाळेत करण्याचे त्यांनी ठरवले.. त्यानी कृत्रिम मेघ बनवण्याचे ठरवले.. सृष्टीतील आश्चर्यजनक गोष्टींचा अभ्यास करण्यात त्यांना जास्त रूचि असे.. किरणोत्सर्गच्या मूळ तत्वाने, जे किरण हवेतून वाहतात, त्यांच्या आकारमाना मधे अचानक वाढ होते, व ह्यामुळेच ढग निर्माण होतात का? हे बघण्यासाठी त्यांनी प्रयोग केले व त्यांना असे आढळून आले की जेव्हा हवेमधे धूळ कण नसतात, आणि ढग निर्माण करण्यामुळे त्याचे जे आकारमान आहे त्याच्या सरल आकारमानापेक्षा कमी प्रमाण असल्यामुळेच ढग बनतात...आणि तेव्हा त्यांना समजले की आपले विचार बरोबर दिशेने आहेत..

For 40 years, the cloud chamber was the most important instrument for studying sub-atomic particles
CLOUD CHAMBER

त्यांच्या ह्या शोधामुळे भौतिकशास्त्रामधे एक मोठे पाऊल उचलले गेले. क्लाउड चेंबर ह्या त्यांच्या यंत्रामुळे ज्या कणांचे गुणधर्म नीट कळून येत नव्हते ते व्यवस्थित दिसून आले. ज्यावेळी हे क्लाउड चेंबर शोधले गेले, तेव्हा लोकांना इलेक्ट्रोन( परमाणू, electron) बद्दल पुसटशी माहिती होती की कशाप्रकारे हे विद्युतपरमाणुंची हालचाल होते... पण विलसन ह्यांच्या ह्या क्लाउड चेंबरमधे त्यांना प्रत्यक्ष त्यांची हालचाल कळून येत होती.. 
Wilson's cloud chamber enabled the discovery of anti-matter particles
CLOUD CHAMBER ENABLED THE STUDY OF ANTI- MATTER PARTICLES

जवळ जवळ 40 वर्षे हे क्लाउड चेंबर, अणूपेक्षाही लहान असणाऱ्या मूलकणांचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त ठरले.
चार्ल्स विल्सन ह्यांना ह्या शोधासाठी, 1927 मधे नोबेल पुरस्कारही मिळाला होता..



                      - http://www.bbc.com/news/uk-scotland-20608377

0 comments:

Post a Comment

Feedback

Name

Email *

Message *