फिरणं.. ही एक गोष्ट आपल्यातील बहुतांश लोकांना अगदी आवडणारी गोष्ट.. कुठेतरी कधी तरीअसं मस्त चेंज म्हणून फिरून यावं, असं सगळ्यांनाच वाटत असतं. आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनातून, तणावातून एक ब्रेक प्रत्येकालाच हवाहवासा वाटतो.
असाच एक ब्रेक म्हणून आम्ही सुद्धा एक ट्रिप राजस्थानला केली.. ही ट्रिप आम्ही केली ते केसरी टूर्सतर्फे..
ह्या टूर मढे आमच्यासोबत केसरीचे दोन गाईड होते.. राजेश आंबेकर आणि सचिन उत्तेकर.. दोघेही एकदम नीट सर्व कही हाताळत होते. अगदी लहान मुलापासून ते वयस्कर व्यक्तिपर्यंत प्रत्येकाशीच ह्यांचे ट्यूनिंग जमत होते. कसल्याहीप्रकाराची गैरसोय झाली नाही. .
एकूण आम्ही 29 जण होतो.
एकूण 9 दिवस आणि 10 रात्री असे पूर्ण पैकेज होते.
त्यात आम्ही पाहिलेली स्थळं म्हणजे.. सवाई माधवपुर, जयपुर, उदयपुर, पुष्कर, माउंट अबू.
राजस्थान म्हटलं की डोळ्यासमोर येते ते म्हणजे.. मोठमोठे महल, आणि डोळे दिपुन टाकणारी कलाकृती.. आपला भारत देश खरच वेगवेगळ्या विविधतेने नटलेला आहे. कोणताही प्रदेश असो, त्या ठिकाणाची कलाकुसर वेगळी.. प्रत्येकाची एक वेगळी शैली.. सारे सौंदर्य पाहताना आपण भारतीय असल्याचा पुन्हा एकदा अभिमान वाटू लागतो!!
सवाई माधवपुर... इथे आम्ही रणथंभोर येथील एका जंगल सफारीसाठी गेलो होतो.. रणथंभोर मधील ह्या जंगलात एकूण 5 गेट होते.. ही सफारी कॅन्टर (canter... एक ओपन गाडी) मधून होते. ह्या कॅन्टरमधे एकूण 10 ते 15 जण बासु शकतात. आमचे वेगवेगळे ग्रुप्स करून एकेका कॅन्टरमधे बसलो. आणि प्रत्येक ग्रुपची गाडी वेगवेगळ्या गेट मधून गेली. ह्या जंगलामधे प्रामुख्याने आढळणारे प्राणी म्हणजे सर्व प्रकारचे हरिण(बार्किंग, स्पॉटेड, सांबार), वाघ, चित्ते, मोर, मगर, माकड.
![]() |
Canter |
प्रत्येकाची गाडी वेगवेगळ्या गेटमधुन गेली होती.. त्यामुळे कोणाला चित्ता दिसला तर कोणाला वाघ. हरिण मात्र भरपूर होते. एक गोष्ट तिथे मला भावली ती म्हणजे.. त्या जंगलात आम्हाला हरिण आणि माकड अगदी गुण्या गोविंदाने एकत्र राहताना दिसली. ह्याचे कारण सांगताना तिथल्याच एका माणसाने सांगितले की.. माकडं ही झाडांवर रहात असल्यामुळे त्यांना जर वाघ येत असेल तर आधीच कळत असे, व त्याप्रमाणे ते हरिणाना सावध करत व हरिण मग वाघ येण्या आधीच सुरक्षित ठिकाणी लपून बसत.. आणि त्याचबरोबर माकडं वरुन त्यांच्यासाठी खाणेही पुरवत असे. आणि ह्यामुळेच ते एकमेकांना सहाय्य करात एकत्र राहत होते. प्राणी असूनही त्यांच्यात एवढी समज!!
सर्वात जास्ती थंडी आम्ही कुठे अनुभवली असेल.. तर ती इथेच!! पण आम्हाला आमच्या गाईड ने आधीच त्या ठिकाणी हैवी वलेन्स wear सोबत घ्यायला सांगितले होते.
प्रत्येक ठिकाणी आम्हाला, कुठे किती थंडी असणार ह्या हिशोबाने गरम कपडे सोबत घ्यायला सांगत., त्यामुळे जिथे गरज नाही तिथे उगाच आम्हाला ओझे वहायला लागत नव्हते.
ह्या ठिकाणी 2 दिवस आमचा मुक्काम होता.
ह्या 2 दिवसांत इथे आम्ही पाहिले ते बिरला मंदिर, सांगानेरी प्रिंटिंग, चोखी ढाणी, आमेर फोर्ट, जयपुरचे सिटी पैलेस, जंतर मंतर..
बिरला मंदिर मधे खुप सूंदर कोरीव काम तिथल्या भिंतींवर केले होते. तिथे त्या मंदिरामधे आतमधे शिरताना एक छान गणपति कोरला होता. तो ज्या भिंतीवर कोरलेला, त्याची खासियत अशी होती की त्याचे प्रतिबिंब हे मागच्या बाजूला., म्हणजे आरपार जाऊन पडत होते.
![]() |
Birla Mandir |
त्यानंतरचे स्थळ म्हणजे.. चोखी ढाणी.. हे तिथले एक छोटेसे गाव आहे असे म्हणता येईल. ह्या छोट्या गावामधे राजस्थानी डान्स, मेंदी काढणे, कुंभारकाम, छोटे छोटे विक्रीचे दूकान.. ऊंट स्वारी, घोडेस्वारी, ह्या अशा अनेक गोष्टी होत्या. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तिथले जेवण. संपूर्ण राजस्थानी पद्धतीचे जेवण भारतीय बैठकीमधे होते. दाल बाटी, चूरमा लाडू, खिचड़ी आणि बरेच काही तिथे जेवायला होते.. आणि भरपूर आग्रह! हे सारे काही तिथे संध्याकाळी बघायला मिळते.
हे सारे काही एका दिवशी पाहुन झाल्यावर, मग दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो ते जयपुर शहरामधेच.. हवा महल, आमेर फोर्ट, सिटी पॅलेस, जंतर मंतर!!
हवा महल... हे तेव्हाच्या काळी महाराण्यांसाठी खास बनवण्यात आले होते. त्याला भरपूर छोट्या छोट्या खिडक्या होत्या त्यामधुन सतत हवा वाहत होती. ह्याशिवाय, आतमधेच बसून बाहेर काय चालले आहे हे त्या पाहू शकत होत्या.
![]() |
हवा महल |
आमेर फोर्ट मधे शीश महल, अंबा माता मंदिर, दीवाने खास हे सर्व होते.
शीश महल अतिशय सूंदर! ती सर्व कलाकृती पाहुन वाटत होते, की तेव्हाचे जे कारागिर होते, त्यांचे काय टॅलेंट असेल!! किती बार्काइने सारे काही बनवले गेले आहे.
ह्या शीश महल मधे वरील बाजूला छोटे छोटे आरसे लावुन डिजाईन तयार केलेली होती, ह्यामुळे, रात्रीच्या वेळी खाली एक दिवा लावला तरी त्यामुळे वर असंख्य दिवे टिमटिमाताना दिसत, आणि जेव्हा राजे महाराजे त्याखाली रात्री झोपत, तेव्हा त्यांना आपण जणू ताऱ्यांखालीच झोपलो आहोत, असे वाटत असे.
दीवाने खास म्हणजे.. तिथे एक खास जागा तयार केलेली होती की जिथे सर्व ख़ास मंत्रींची बैठक राजांसोबत होत असे.
![]() |
शीश महल |
इथले सर्व भिंतींवर केलेली कलाकुसर खरे जेम्स वापरून केली गेली आहे.. रूबी, एमराल्ड, टोपाज, सफायर, हे जेम्स वापरले गेले आहेत.
ह्या वर्कला इलरी वर्क असे म्हणतात.. आधी पेन्सिलने डिज़ाइन काढून मग त्यामधे हे सर्व जेम्स क्रश करून ही डिज़ाइन बनवली आहे..
![]() |
इलरी वर्क |
त्यानंतर आम्ही गेलो ते जयपुरच्या सिटी पॅलेस मधे.. इथे तेव्हाच्या राजांचे सर्व कपडे व आर्मरी होती. सवाई मानसिंग नावाच्या राजाची ऊँची 7 फुट आणि 250 किलो वजन होते.. त्यांचे कपडे 7 फुट उंच आणि 4 फुट रुंद असे होते आणि त्यावर त्यांचे चिलखत वगैरे ह्याचे वजन जवळ जवळ 25 किलोचे असत. ह्या राजा व त्यांच्या महाराण्यांच्या कपड्यांवर संपूर्ण सोन्याचे वर्क होते. महाराण्यांचे कपड्यांचे आणि दागिन्यांचे वजन मिळून जवळपास 9 किलो व्हायचे!
जसे आमेर फोर्ट मधे दीवाने खास होते तसेच इथेही दीवाने ख़ास व दीवाने आम असे होते. दीवाने आम म्हणजे सर्व साधारण जनतेसाठी घेतली जात असलेली बैठक!
जंतर मंतर.. ही एक वेधशाळा होती.. सूर्याच्या जागेवरून वेळ ओळखणे, तसेच जन्म कुंडली काढणे, वगैरे इथे होते.
जयपुर पूर्ण झाल्यावर आम्ही पुढे गेलो ते अजमेरला.. अजमेर च्या मोईनुद्दीन खिश्ति दरग्याचे दर्शन घेतले. हा दर्गा मक्का मदीनाच्या खालोखाल गणला जातो, व ह्यामुळे इथे प्रचंड गर्दी होती.
आमचे गाईडनी आम्हाला आधीच इथल्या गर्दीचि कल्पना देऊन ठेवली होती व तिथे कशा प्रकारे पैसे लुटु शकतात हा सर्व अंदाज आधीच दिला होता त्यामुळे सोबत फक्त गरजेपुरता लागणाऱ्या गोष्टीच आम्ही घेतल्या होत्या. तसेच अतिशय गर्दी असल्यामुळे दोघे गाइड्स आमच्या सबच होते. एक जण पुढे आणि दुसरा मागे. आणि मधे आम्ही सर्व लोक.. असे एकामागे एक चालत होतो. त्यामुळे कुठेही चुकामुक न होता आम्ही व्यवस्थित तिथून बाहेर पडू शकलो.
त्यानंतर आम्ही गेलो पुष्करला.. तिथे पुष्कर तीर्थाचे दर्शन घेतले.
आमचे गाईडनी आम्हाला आधीच इथल्या गर्दीचि कल्पना देऊन ठेवली होती व तिथे कशा प्रकारे पैसे लुटु शकतात हा सर्व अंदाज आधीच दिला होता त्यामुळे सोबत फक्त गरजेपुरता लागणाऱ्या गोष्टीच आम्ही घेतल्या होत्या. तसेच अतिशय गर्दी असल्यामुळे दोघे गाइड्स आमच्या सबच होते. एक जण पुढे आणि दुसरा मागे. आणि मधे आम्ही सर्व लोक.. असे एकामागे एक चालत होतो. त्यामुळे कुठेही चुकामुक न होता आम्ही व्यवस्थित तिथून बाहेर पडू शकलो.
त्यानंतर आम्ही गेलो पुष्करला.. तिथे पुष्कर तीर्थाचे दर्शन घेतले.
मग आम्ही जगातील एकमेव असणाऱ्या ब्रम्हामंदिर मधे जाऊन दर्शन घेतले.
पुष्करमधून बाहेर पडतांना आम्हाला बरेच मोर दिसले.. अगदी घरा घरा मधे, दोन दोन तीन तीन मोर दिसायचे. मोर आणि गुलाबाच्या बागा इथे भरपूर प्रमाणात होत्या.
पुढचा आमचा टप्पा होता तो म्हणजे उदयपुर.. उदयपुरमधेच नव्या वर्षाचे एकदम दणक्यात स्वागत केले गेले. उदयपुर मधे चित्तोरगढ फोर्ट.. आणि ह्या फोर्टमधे होते ते राणाकुंभ, मीरा मंदिर, विजयस्तंभ आणि पद्मिनी पॅलेस.,
विजयस्तंभ येथे बाजुलाच एक अतिशय दुःखकारक गोष्ट होती आणि ती म्हणजे जोहर स्थळ..
जोहर.. जसे सती जायचे तसेच इथेही स्त्रीया आपल्या नवऱ्याच्या मृत्युनंतर आगीमधे उडी मारून आपले प्राण देत होतेच.. पण त्याचबरोबर.. ज्यावेळी मुगल सैन्याने स्त्रियांचा सौदा करण्याचा प्रस्ताव मांडला, त्यावेळी ह्या स्त्रियांनी आपले पति विजयी व्हावे म्हणून अगदी नटुन, सजून आगीमधे हसत खेळत उड्या घेतल्या. त्यांच्या अगदी लहान लहान मुलींनीही कोणता ही मागचा पुढचा विचार न करता त्यामधे उड्या घेतल्या..
किती वेदना झाल्या असतील तेव्हा त्यांना ह्याची कल्पना ही करवत नाही..
विजयस्तंभ येथे बाजुलाच एक अतिशय दुःखकारक गोष्ट होती आणि ती म्हणजे जोहर स्थळ..
जोहर.. जसे सती जायचे तसेच इथेही स्त्रीया आपल्या नवऱ्याच्या मृत्युनंतर आगीमधे उडी मारून आपले प्राण देत होतेच.. पण त्याचबरोबर.. ज्यावेळी मुगल सैन्याने स्त्रियांचा सौदा करण्याचा प्रस्ताव मांडला, त्यावेळी ह्या स्त्रियांनी आपले पति विजयी व्हावे म्हणून अगदी नटुन, सजून आगीमधे हसत खेळत उड्या घेतल्या. त्यांच्या अगदी लहान लहान मुलींनीही कोणता ही मागचा पुढचा विचार न करता त्यामधे उड्या घेतल्या..
किती वेदना झाल्या असतील तेव्हा त्यांना ह्याची कल्पना ही करवत नाही..
![]() |
विजयस्तंभ |
![]() |
जोहर स्थळ |
नंतर पाहिले ते महाराणा प्रताप ह्यांचे स्मारक!
महाराणा प्रताप ह्यांचे वडिल उदयसिंग ह्यांना त्यांच्या अगदी लहानपणी, त्यांची आई म्हणजेच महाराणी कर्णावती हिने असेच जोहर करून घेतले होते व जाताना उदयसिंगला तिच्या एका खास सेविककडे जिला पन्ना धाई म्हणत हिच्याकडे सुफुर्त केले.. आणि ज्यावेळी उदयसिंगला मारण्यासाठी त्याचा शत्रु तिथे आला, त्यावेळी ह्या पन्ना धाईने तिथे उदयसिंगला उचलून स्वतःच्या 6 महिन्याच्या बाळाला उदयसिंगचे कपडे घालून झोपवले व स्वतःच्या डोळ्यांसमोर तिच्या मुलाचा मृत्यु होताना तिने पाहिला.. ह्या आईला किती यातना झाल्या असतील.. ह्याची गणती कोणीच कधीच करू शकणार नाही.. ह्या थोर आईमुळे पुढे महाराणा प्रतापसारखा वीर योद्धा आपल्या भारतभूमिला लाभला..
![]() |
Sacrifice of her son... Panna Dhaii |
नंतर आम्ही पाहिले ते सहेलियों की बारी.. ही एक प्रकारची बाग़च आहे. तिथल्या एका राजाच्या मुलीने एक दिवस काही अटी घातल्या.. तिला बिन बादल बरसात, धुँआधार बारिश, आणि सावन भादो हे सार काही पाहिजे होते.. आणि त्यासाठी म्हणून ही सहेलियों की बारी तयार केली गेली, जिथे तिच्या ह्या तीनही अटी पूर्ण झाल्या.
त्यानंतर क्रिस्टल गॅलरी मधे आम्ही गेलो.. इथे सर्व काही क्रिस्टलने बनलेले होते. अगदी डाइनिंग टेबल ग्लास डिश पासून ते झोपण्याच्या बेडपर्यंत सार्व काही फक्त आणि फक्त क्रिस्टलचे बनलेले होते.
हे झुंबर.. 8 फुट लांब.. क्रिस्टलचे बनलेले!
नंतर एकलिंजी टेम्पल मधे आम्ही गेलो. हे खास vip लोकांसाठी असलेले मंदिर..
हल्दीघाटीचे युद्ध जिथे झाले, ते स्थान पाहिले. तेथील डोंगरामधे हळदीच्या रंगाचे दगड होते व तो पूर्ण घाट असल्यामुळे ह्याला नाव हल्दीघाटी दिले गेले.
नाथद्वारा.. हे अतिशय सूंदर असे श्रीकृष्णचे मंदिर आहे.
उदयपुरचा सर्व परिसर पूर्ण झाल्यावर मग आम्ही गेलो ते माउंट अबु येथे.. इथे सनसेट पॉइंट पाहिला व नंतर गुरुशिखर इथे गेलो.. दत्तबाप्पाच्या पादुका व अनसूया आईचे मंदिर येथे आहे.
![]() |
Sunset at Mount Abu |
![]() |
GuruShikhar |
तसेच दिलवाडा टेम्पलमधे आम्ही गेलो.
अतिशय सूंदर जैन मंदिर.. ह्या मंदिराची खासियत म्हणजे.. ईथे आपण कुठेही मधे जर उभे राहिलो तर चारही बाजूला महावीर ह्यांची मूर्ती दिसते. आणि प्रत्येक भिंतीवर कोरीव काम. आणि कोणतेही कोरीव काम रिपीट केलेले नव्हते.
इथली एक विशेष गोष्ट म्हणजे.. हे मंदिर दोन भावांचे होते त्यांच्या बायका.. म्हणजेच जेठानी देवरानी ह्यांचेही इथे एक कलाकृती तयार केली होती पण ह्या कलाकृतिवरुन त्या दोघींमधे जवळ जवळ 8 वर्षे भांडणे होत होती व सरते शेवटी जेठानीचे तोड़ सरल व देवरानीचे जरा खाली वाकलेले असे केले व जेठानीकड़े 25 घोडे तर देवरानी कडे 24 घोडे असे बनवून ते भांडण संपुष्टात आणले गेले.
येथील मजदूरांनी आपली ओळख रहावी म्हणून हे मंदिर बनवताना जे काही वेस्ट राहिले होते त्यापासून अजुन एक भव्य दिव्य आणि तेवढेच सूंदर देखणे मंदिर तिथेच बाजूला बनवले होते. आणि हे संपूर्ण मंदिर अतिशय मनापासून त्यांनी बनवले असल्यामुळे ह्या मंदिराचे नाव दिलवाडा मंदिर असे ठेवले गेले..
आणि मग सरते शेवटी पूर्ण ग्रुपचा गेट टुगेदर झाला. संपूर्ण टूर खुप व्यवस्थित रित्या organise केली होती. अधुन मधून गेम्स, लहानतल्या लहान पासून अगदी म्हाताऱ्यातली म्हातारी व्यक्तिही खेळू शकेल असे गेम्स घेतले गेले.
ह्या दोन्ही गाईड्सकडून एक गोष्ट मला शिकायला मिळाली ती म्हणजे patience.. पेशंस लेवल व्यवस्थित मेनटेन करून, कोणत्याही प्रकारची चिडचिड किंवा आरडाओरडा न करता, सगळे काही नीट मॅनेज करणे, हे खरच ह्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे.
इथे राजस्थान मधले प्रत्येक ठिकाणाचे जे गाईड होते ते ही अतिशय उत्तम होते. जयपुर येथे रणबीर नावाचे गाईड, ज्यानी खुप सूंदर जयपुरचे वर्णन केले. उदयपुर मधे चित्तोरगढ ला संजीव शर्मा.. हा माणूस एवढा बुडून आम्हाला सारे काही सांगत होता, की आम्हाला सारे काही आमच्या समोरच घडत आहे असे वाटत होते. आणि खान चाचा म्हणून तीसरे गाईड.. अतिशय विलक्षण.. ह्यांची एक वेगळीच पद्धत होती सांगायची.. महाराणा प्रतापांची असो की आपल्या देवळाची असो.. खूपच छान माहिती त्यांनी आमच्यापर्यंत पोचवली..
खरोखर! ही ट्रिप करून खुप छान वाटले. सारा थकवा निघून टवटवी आली होती. प्रत्येकाने नक्कीच असे relaxation करणे गरजेचे आहे.. श्रमपरिहार केल्यामुळे नक्कीच पुढे अधिक वेगाने काम करायला मदत मिळते..
ह्या दोन्ही गाईड्सकडून एक गोष्ट मला शिकायला मिळाली ती म्हणजे patience.. पेशंस लेवल व्यवस्थित मेनटेन करून, कोणत्याही प्रकारची चिडचिड किंवा आरडाओरडा न करता, सगळे काही नीट मॅनेज करणे, हे खरच ह्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे.
इथे राजस्थान मधले प्रत्येक ठिकाणाचे जे गाईड होते ते ही अतिशय उत्तम होते. जयपुर येथे रणबीर नावाचे गाईड, ज्यानी खुप सूंदर जयपुरचे वर्णन केले. उदयपुर मधे चित्तोरगढ ला संजीव शर्मा.. हा माणूस एवढा बुडून आम्हाला सारे काही सांगत होता, की आम्हाला सारे काही आमच्या समोरच घडत आहे असे वाटत होते. आणि खान चाचा म्हणून तीसरे गाईड.. अतिशय विलक्षण.. ह्यांची एक वेगळीच पद्धत होती सांगायची.. महाराणा प्रतापांची असो की आपल्या देवळाची असो.. खूपच छान माहिती त्यांनी आमच्यापर्यंत पोचवली..
खरोखर! ही ट्रिप करून खुप छान वाटले. सारा थकवा निघून टवटवी आली होती. प्रत्येकाने नक्कीच असे relaxation करणे गरजेचे आहे.. श्रमपरिहार केल्यामुळे नक्कीच पुढे अधिक वेगाने काम करायला मदत मिळते..
![]() |
Light and sound show.. |
2 comments:
Amazing article. Ketaki you have narrated your tour experience so nicely that it gave an experience of touring Rajstan directly,Getting good guide is really an additional point , Kesari tour always arranges nice tours, wish to enjoy Rajsthan with same guide of your Rajsthan tour,
thanks for sharing valuble information of our great Country India.
विस्तृत आणि सुंदर मांडणी केतकी ..
जणू मी स्वतः या सफरीवर आहे अस वाटलं मला ..
खूप छान ......
तुझी अशीच सफर घडावी ,आणि आम्हाला त्याची अनुभूती मिळावी ...
अम्बज्ञ
Post a Comment