
असेच एक वेगळ्याच विषयावर शोध लावणारे संशोधक म्हणजे - ग्रेगॉर मेंडेल. सर्व स्तरांवर वाढत जाणार्या गतीने व वेगवेगळ्या शाखांमध्ये होणारे बदल उत्सुकता निर्माण करतात. फक्त निसर्गाच्या देणगीवर संतुष्ट राहून जीवन जगण्य़ाऐवजी, उत्सुकतेच्या बळावर अधिकाधिक संशोधनांचे दरवाजे उघडणारे हे एक थोर वैज्ञानिक.
जन्मदात्यांचे गुण त्यांच्या मुलांमध्ये कसे उतरतात, एकाच आई-वडिलांची मुले एकसारखी का नसतात, अशा विविध प्रश्नांवर मेंडेल ह्यांनी अध्ययन सुरु केले. याआधीसुद्धा अनेकांनी ह्यावर उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला होता, पण कोणासही त्याचे उत्तर मिळू शकले नाही. मेंडेल ह्यांच्या वडिलांची मटाराची खेती होती. त्यांनी त्यांच्या प्रयोगासाठी मटाराचे झाड निवडले. मटारच्या फुलांमध्ये नैसर्गिक स्वयंउत्पत्ती असते आणि वर्षानुवर्षे स्वयंउत्पत्तीमुळे मटारच्या उपजाती, अनुवंशिकरुपाने शुद्ध होत राहतात. मटारचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे, नित्य स्वयंउत्पत्ती असूनही, ह्यात प्रयोगांद्वारेही उत्पत्ती केली जाऊ शकते.
सन १८५६ ते १८६३ मध्ये जवळपास २८,००० झाडांचे त्यांनी निरिक्षण केले. मुळ मटारापासुन निर्माण झालेल्या नविन मटारांमध्ये, काही प्रकारचे स्वभाववैशिष्ट त्यांच्या निदर्शनास आली..
* मटारच्या फ़ुलांचा रंग जांभळा किंवा पांढरा असतो
* देठ छोटे किंवा मोठे असते.
* बीज गोलाकार किंवा सुरकुतल्यासारखे असते.
* बीजाचा रंग पिवळा किंवा हिरवा असतो.
* शेंग वाढीव किंवा अरुंद असते
* शेंगांचा रंग पिवळा किंवा हिरवा असतो.
एकाच वेळी एका गुणाचे अनुग्रहण काही पिढ्यांपर्यंत कसे होते हे अभ्यासल्यानंतर त्यांनी दोन किंवा तीन गुणांच्या अनुग्रहणाचा प्रश्न हाती घेतला. ह्यामुळे जे यश आधिच्या संशोधकांना मिळाले नाही ते त्यांना मिळाले. अनुवंशिकता एक एक कारक असते आणि त्यांचे वेगवेगळे अस्तित्व असते. दोन कारक मिळून त्यांचे वेगळे अस्तित्व लोप पावत नाही हे मेंडेल ह्यांनी सिद्ध केले. आता कारकांना ’जिन्स’ म्हणून ओळखले जाते. मेंडेल यांनी सिद्ध केलेल्या नियमांना ’मेंडेलचे नियम’ म्हणून ओळखले जाते.
मेंडेल असेपर्यंत त्यांच्या ह्या कार्याची कोणीही दखल घेतली नव्हती. त्यांचे निधन ६ जानेवारी १८८४ साली झाले व त्यानंतर जवळपास १९०० सालानंतर त्यांच्या ह्या शोधाकडे लक्ष केंद्रित केले गेले. पुढे अनुवंशिकविज्ञानामध्ये खुप प्रगती झाली, पण मेंडेल ह्यांचे नियम हे ह्या विज्ञानाचा मुळ आधार ठरले.
- केतकी कुलकर्णी
4 comments:
आत्तापर्यंत मटार चे द्न्यान फक्त खाण्यापूर्तेच सिमित होते!
केतकी, सविस्तर व सखोल माहितीसाठी अंबद्न्य.
Interesting post. No wonder Mendel is regarded as father of modern genetics.
Gregor Johann Mendel (Father of Genetics) very useful information ketakiveera..
अनुवंशशास्त्राचे जनक ग्रेगॉर मेंडेल ह्यांच्या संशोधनाची पार्श्वभूमी, त्याचे संशोधन, त्यांच्या शोधाची उपयुक्तता या संबंधीची माहिती रंजक पद्धतीने आणि अत्यंत सोप्या भाषेत दिल्यामुळे लेख खूप उपयुक्त बनला आहे. शालेय जीवनात विद्यार्थ्यांना मेंडेल ह्या संशोधकाचे महान कार्य समजण्यास सुध्दा खूप उपयोगी पडेल असा अभ्यासपूर्ण लेख !!!
Post a Comment