ज्यावेळी कॉम्पुटरचा शोध लागलेला तेव्हा कॉम्पुटर हे जवळजवळ एका खोलीइतक्या मोठ्या आकाराचे होते आणि त्यामानाने त्याचा वेग हा अतिशय कमी होता. मग पुढे पुढे जसजशी प्रगती होत गेली, तसतशी ह्या कॉम्प्यूटर्सचा आकार कमी कमी होत गेला..
आता आपल्याकडे अगदी मुबलक प्रमाणात नोटबुक, टॅबलेट पीसी उपलब्ध असतात.. अगदी आपला डेस्कटॉप पीसी पण फ्लॅट, छोट्या आकारामधे आणि जलद वेगाचा असतो.. मग हा नॅनो कॉम्पुटर काय आहे?? ह्यात असं काय वैशिष्ट आहे? ह्याचा आकार किती असेल?? कोणाला काही अंदाज आहे का की किती लहान असेल हा नॅनो कॉम्पुटर??
नॅनो कॉम्पुटर हा एका माइक्रो कॉम्पुटरपेक्षाही लहान आकारातला असेल.. ह्यातले मुलभुत घटक, काही नॅनोमीटरपेक्षा मोठे नसतील..
ह्या कॉम्पुटरचा आकार साधारणपणे एका क्रेडिट कार्ड इतका असेल.. हे नॅनो कॉम्पुटर असे दिसेल...
हे नॅनो कॉम्प्यूटर्स इतके लहान असतील की ते जॅकेटच्या पॉकेट मधेही आरामात राहु शकतील आणि एवढे लहान असूनही त्यामधे आजच्या सर्व इंटरनेटच्या सोई आणि इतरही गोष्टी व्यापलेल्या असतील. तसेच, हेच कॉम्पुटर, कार्यक्षमतेमधे आजच्या सुपर कॉम्प्यूटर्सनासुद्धा फार मागे पाडतील..
ह्या नॅनो कॉम्प्यूटर्समुळे कॉम्पुटरच्या विश्वामधे एक बराच मोठा बदल घडून येऊ शकतो.. मेमरी आणि बॅकिंग स्टोरेज सारखे जे अस्तित्वात असणाऱ्या टेक्नोलॉजी आहेत त्या मुबलक प्रमाणात उपलब्ध होऊ शकतात तसेच जे अप्रचलित मशीन्स आहेत, त्यांनाही हे नवीन तंत्रज्ञान रिप्लेस करू शकेल.
नॅनो कॉम्प्यूटर्स चार प्रकारे बनवले जातील...
* इलेक्ट्रॉनिक नॅनो कॉम्पुटर
* मेकॅनिकल नॅनो कॉम्प्यूटर्स
* बायोकेमिकल नॅनो कॉम्प्यूटर्स
* क्वांटम नॅनो कॉम्प्यूटर्स...
इलेक्ट्रॉनिक नॅनो कॉम्प्यूटर्स...
हे कॉम्प्यूटर्स सध्याच्या माइक्रोकॉम्प्यूटर्सप्रमाणेच काम करतील.. ह्यामधे जो महत्वाचा बदल केला जाईल तो कॉम्प्यूटर्समधे वापरल्या जाणाऱ्या ट्रांसिस्टर्सचा!! ह्यामधे सिंगल इलेक्ट्रान ट्रांसिस्टिर वापरण्यात येईल..
ट्रांज़िस्टरचे काम एखाद्या नळासारखं असतं. पाण्याच्या पाईपमधलं पाणी जसं नळातून बाहेर येतं तसंच ट्रांसिस्टरच्या सोर्स आणि ड्रेनमधे बॅटरी जोडली की सोर्समधून इलेक्ट्रॉन्स ट्रांसिस्टरमधे येतात आणि ड्रेनमधून बाहेर पडतात.. म्हणजेच ट्रांसिस्टरमधून विद्युतप्रवाह वाहतो.
पण ह्या नेहमीच्या ट्रांसिस्टर्स मधे बरेचसे इलेक्ट्रॉन्स सोर्सपासून ड्रेनपर्यंत जातात, आणि ह्या प्रक्रियेमधे बरीच उष्णता निर्माण होते आणि ट्रांसिस्टर गरम होतो व त्याबरोबरच विजही फुकट जाते आणि ह्यावर उपाय म्हणून सोर्स पासून ड्रेन पर्यंत जाणाऱ्या इलेक्ट्रॉन्सची संख्या कमी करणं हे संशोधकांनी ठरवले.. व त्याप्रमाणे कमी म्हणजे, सोर्स पासून ड्रेन पर्यंत अगदी एकच इलेक्ट्रान गेला पाहिजे..असे त्यांनी तयार केले.. आणि ह्यालाच 'सिंगल इलेक्ट्रॉन ट्रांसिस्टर' (SET) असे म्हणतात..
आणि हा SET ह्या नॅनो कॉम्प्यूटर्समधे वापरला गेला आहे..
![]() |
SET |
हे इलेक्ट्रॉनिक नॅनो कॉम्प्यूटर्स कशा प्रकारे असतील आणि बाकीचे प्रकार सुद्धा कसे असतील, त्यांची वैशिष्ट आपण पुढील पोस्ट मधे पाहू..
References: * http://www.slideshare.net/manpreetgrewal/nano-computing
* नॅनोदय
3 comments:
Interesting subject related to Technology, Ketakiveera. Need of the hour to be updated.
विज्ञानाची सतत होणारी प्रगती ही नेहमीच आपल्याला थक्क करणारी असते. संगणकाची सुरुवात डेकस्टॉप पासून झाली मग त्यानंतर LCD नंतर LED desktops लॅपटॉप, टॅबलेट पर्यंतची प्रगती वाखाण्यजोगी आहेच. आणि केतकी तुम्ही समोर आणलेल्या ह्या नॅनो कम्प्युटरची बहुपयोगी माहिती अतिशय योग्य आणि काळाच्या गरजेला साजेशी आहे.
धन्यवाद.
नॅनो टेक्नोलॉजी मुळे नॅनो कॉम्प्युटर उपलब्ध होतील ह्याची शक्यता वाटतच होतील, पण एवढ्या लहान स्वरूपाचे कॉम्युटर होऊ शकतात हे वाचून खरेच आश्चर्याने डोळे विस्फारले गेले. केतकी तुम्ही खूप सोप्या भाषेत ही माहिती दिली आहेत.
'सिंगल इलेक्ट्रॉन ट्रांझिस्टर' (SET) ची संकल्पना सुध्दा सुंदर रीत्या समजावली आहेत. अजून माहिती वाचण्यासाठी पुढील लेखाचे वेध लागले आहेत.
Post a Comment