Monday, 7 March 2016

Happy Women's Day..

         

          काही दिवसांपूर्वीच माझ्या ओळखीमधे असणाऱ्या एका जोडप्याला मुलगा झाला. ते संपूर्ण कुटुंब त्यामुळे अगदी खुश होतं. खुप जल्लोष केला जात होता. सगळीकडे अगदी आनंदाचे वातावरण होते. मीसुद्धा तिथे त्यांना अभिनन्दन करायला गेले होते. तिथे गेल्यावर मुलगा झाला म्हणून अर्थातच सगळे खुपच खुश असल्यामुळे त्यांनी एक छोटासा समारंभ ठेवला होता. मीदेखिल त्या समारंभामधे आनंदाने सहभागी झाले होते. तेवढ्यात
माझ्या कानावर शब्द आले,"बरं झालं बाई हिला मुलगा झाला. नशीब घेऊन आली आहे ह्यांची सुन. चुकून जरी हिला मुलगी झाली असती तर मग काही खरं नव्हतं हिचं. हिच्या सासुने तर हिला कच्च खाल्लं असतं"...हे शब्द ऐकले आणि मी तिथल्या तिथेच स्तब्ध झाले. एवढे शिकलेले लोक, इतकं स्वतःला समंजस म्हणून मिरावणारे हे लोक आणि ह्यांचे विचार एवढ्या खालच्या पातळीचे??
          आज एकविसाव्य्या शतकामधे आपण पोचलेलो असतांनाही आपली विचारसरणी एवढी मागासलेली का? वंशाचा दिवा म्हणून मुलगा पाहिजे पण मग त्याला जन्म देणारी स्त्री मुलगी म्हणून का नको? पुरुषप्रधान असणाऱ्या समाज आता बदलून स्त्रीप्रधान होण्याच्या वाटेवर येत आहे. पण तरीही स्त्रीची निर्भर्त्सनाच केली जाते. एक खेळणं म्हणून तिचा वापर केला जातो. 
खरं तर आजची स्त्री ही एवढी समर्थ आहे की ती प्रत्येक क्षेत्रामधे पुरुषांच्या खांद्याला खांदा लाउन जगु शकते. अगदी गृहिणी असल्यापासून ते अंतराळापर्यंत प्रत्येक क्षेत्रामधे स्त्रीने आघाडी मारलेली आहे., आणि अजूनही चांगलेच कार्य करत आहे.
अहल्या होळकर, सावित्रीबाई फुले, माता जिजाऊ, कल्पना चावला, इंदिरा गांधी, किरण बेदी ह्या सारख्या महिलांनी जगातील स्त्रियांसमोर एक आदर्श मांडला आहे. ह्यासारख्यांमुळेच आज प्रत्येक स्त्री स्वतःचे स्वतः काहीतरी करण्याची धडपड करत असते. स्त्रीला कितीही खाली पाहिले, पण तरीही जर तिच्या स्वाभिमानाला कोणी ठेच पोचवली तर मात्र ती तिची सारी शक्ति एकवटुन त्याचा सामना करते.
          आजच्या घडीला हे एक सूंदर उदाहरण उभं करणारी स्त्री म्हणजे स्मृति इराणी.

 हल्लीच झालेल्या संसद परिषदेमधे ज्या प्रमाणे स्मृतिजींनी कोणालाही न घाबरता, जरा ही न डागमगता, प्रत्येक गोष्ट, विशेषतः जेनयुचे सर्व पुरावे मांडले,ते खरोखर वाखाणण्याजोगे आहेत. ज्याने महादुर्गेचा अपमान केला, ज्याने भारतमातेचा अपमान केला,त्याला सर्वांसमक्ष उघडे पाडण्याचे त्यांनी केलेले कार्य अतिशय उत्कृष्ट होते. 
         एक स्त्री जेवढी सहनशील असते तेवढीच ती कठोरदेखिल होउ शकते. ही भारतमातासुद्धा एक स्त्रीच आहे. ती तिच्या बाळांच्या चुका पोटात घालते, पण जर तिचा अपमान केला, तिलाच जन्म देणाऱ्या त्या मोठ्या आईचा कोणी अपमान केला, तर मात्र ती गप्प बसणार नाही. शेवटी हा महिषासुरसुद्धा त्या मोठ्या आईच्या पायाखाली येऊन गतप्राण झालाच होता. आणि प्रत्येक कल्पात हेच घडत आले आहे आणि हेच घडत राहणार आहे. 
         आज प्रत्येक स्त्रीने तिचे स्वतःमधले सुप्त गुण ओळखून,न खचता, ना घाबरता जगलं पाहिजे. 'भीत्या पोटी ब्रम्हराक्षस' ही म्हण लक्षात ठेवून, भीति घालवून जगायला शिकलं पाहिजे.
         एकविसाव्या शतकातील स्त्री म्हणून मानाने जागता आलं पाहिजे, आणि एकाचे चार हात करण्याची क्षमता असलेल्या ह्या स्त्रीने अगदी बेधडकपणे चुकीच्या गोष्टींना विरोध केला पाहिजे,तेव्हाच कन्हैया कुमार सारख्या भुरट्या चोर देशद्रोहयांना धडा मिळेल.

- केतकी कुलकर्णी 

9 comments:

Unknown said...

मस्त लेख. अंबज्ञ

Amruta's Kalasadhana (kalechi upasana) said...

Nice ketaki

Nitin Gurav said...

खुप सुंदर लेख

VIJAYSINH said...

Nicely, touching wordings g8 speechless

Unknown said...

निर्भयतेचे दुसरे नाव स्त्रीशक्ती proud to be a woman

Unknown said...

Sundar Lekh ketakiveera

Unknown said...

Atishay cchan luhilay;

Unknown said...

केतकी खूप सुंदर लेख. स्मृती इराणीजींनी संसदेमध्ये सर्वांसमक्ष ज्याने महादुर्गेचा अपमान केला, ज्याने भारतमातेचा अपमान केला,त्याला उघडे पाडण्याचे केलेले कार्य हे खरोखरच वाखाणण्याजोगे आहे. एक स्त्री जेव्हा तिच्या आदिमातेचा दुर्गेचा आणि भारतमातेचा अपमान होतो तेव्हा अन्यायाविरूध्द कशी ईरेला पेटून उठते ह्याचा जिवंत दाखला आपण मांडला आहेत. एकविसाव्या शतकातील स्त्री म्हणून मानाने जागता आलं पाहिजे, आणि एकाचे चार हात करण्याची क्षमता असलेल्या ह्या स्त्रीने अगदी बेधडकपणे चुकीच्या गोष्टींना विरोध केला पाहिजे, हे आपले मत खरोखरीच स्तुत्य आहेच आणि सर्व महिलांना सबल, सक्षम होण्यासाठी नक्केच प्रेरीत करणारे आहे.

Unknown said...

Khup Sunder Lekh ...Shtriyaanch Sammaan hi kaalaachi garaj aahe...

Post a Comment

Feedback

Name

Email *

Message *