Wednesday 8 June 2016

हॅम रेडियो - 4

         



लायसेंसचे जनरल आणि रेस्ट्रिक्टेड असे दोन प्रकार असतात हे आपण बघितले. ह्या दोन्ही लायसेंसमधला फरक अगदी संक्षिप्त स्वरुपात बघायचं झालं तर रेस्ट्रिक्टेड मधे सिग्नल पाठवण्यासाठी 50 वॉटच्या पॉवर पर्यन्तच उपयोग होऊ शकतो पण जनरल मधे मात्र पूर्ण 400 वॉट पॉवर वापरता येऊ शकते. तसेच व्ही.एच.एफ. आणि एच.एफ. फ्रीक्वेंसी बैंड्समधे ही फरक असतो. हे पुढे विस्तृतपणे आपण पाहूच


आता हा लायसेंस मिळवण्यासाठी नेमकं काय करावं लागतं हे आपण पाहू. 




परीक्षा पास झाल्यानंतर जी काही ग्रेड असेल त्या ग्रेड मधे आपण पास झाल्याचे एक लेटर आपल्याला दिल्लीच्या वायरलेस आणि प्लानिंग कोऑर्डिनेशन डिपार्टमेंट मधून येते. 


त्यानंतर आपली चारित्र्य पडताळणी होते. आपल्यावर कोणत्या प्रकारचे गुन्हे किंवा आरोप तर नाही ना, आपण कोणत्याही राजकारणी पक्षाशी आहोत का वगैरे तपासले जाते व ह्यासाठी आपल्या घराजवळील पोलिस आयुक्त घरी येतात. योग्य ती चौकशी झाल्यावर आपले डॉक्युमेंट्स (आय.डी प्रूफ, अड्रेस प्रूफ ई.) आपल्याला आपल्या पोलिस स्थानकामधे जमा करायचे असते. 

हे सर्व झाल्यानंतर मग आपण लायसेंससाठी अर्ज करू शकतो. लायसेंस 20 वर्षासाठी किंवा आयुष्यभरासाठी आपल्याला मिळू शकतो. म्हणजे ह्याची वैलिडिटी 20 वर्षे किंवा लाइफटाइम अशी मिळते. आपल्याला जसं हवं असेल त्याप्रमाणे आपण अर्ज करू शकतो. ही सर्व प्रक्रिया पूर्ण व्हायला साधारण ६ महीने लागू शकतात.  म्हणजे परीक्षा देऊन लायसेंस मिळाणं, हे साधारणपणे ६ महिन्यांमधे होते. 

एकदा लायसेंस मिळाला की मग हॅम कामाला लागू शकतात. पुढील गोष्टी हॅम्स लायसेंस मिळवल्यानंतर करू शकतात.
- हॅम ऑपरेटर मग स्वतःचे बेस स्टेशन बसवु शकतो.
- एखाद्या एस्ट्रोनॉटशी सुद्धा संपर्क साधू शकतो. 
- जगातील कुठल्याही कोपर्यात तो दुसऱ्या हॅमसोबत संवाद साधू शकतो.
- आपत्ति काळात तर ह्यामुळे खुप फायदा होऊ शकतो. पुर, महापुर, भुघसरण, चक्रीवादळ, भूकंप, कोणत्याही प्रकारचा एक्सीडेंट असो, जिथे जिथे नॉर्मल कम्युनिकेशनची साधने बंद होतात, तिथे तिथे हॅम्स अत्यावश्यक सेवा देण्यासाठी तयारच असतात.
          
ह्या हॅम रेडियोवरुन सर्व साधारण गप्पा तर मारता येणार नाही पण आवश्यक सन्देश मात्र जगाच्या अगदी कोणत्याही कोपर्यात विनासायास नक्कीच पोहोचवता येईल.

          
हॅम रेडियो मध्ये अजून एक असणारी महत्वाची गोष्ट म्हणजे call sign. आपली परीक्षा झाल्यावर, सर्व formalities पूर्ण झाल्यावर जेव्हा आपल्याला लायसेन्स मिळतो, त्यावर एक call sign लिहिलेली असते. ही call sign म्हणजे आपण ह्याला आपली हॅमच्या विश्वातली आपली ओळख म्हणू. जसे आपण आपले नाव सांगून ओळख देतो, तसेच हॅम्सची ओळख ह्या call signने होते. 

आपल्या भारतामध्ये VU ह्या कोडने call signsची सुरुवात होते.  
उदा. VU2 किंवा VU3. 2 आणि 3 ने जनरल किंवा रेस्ट्रीकटेड ग्रेड ओळखली जाते. म्हणजेच VU2 हे जनरल तर VU3 हे रेस्ट्रीकटेड ग्रेडचा लायसेन्स असतो. call signs पुढील प्रमाणे असतात - VU2LCH, VU3RSB, VU2JHM इत्यादी…….  
          
आता आपली परीक्षाही झाली, आपल्याला आपला रिझल्ट पण मिळाला, सगळी प्रोसिजर झाल्यावर आता लायसेन्सपण मिळाला, त्यावर आपली call sign पण आली…. हॅम सेट आणून तो घरी बसवला आहे… मग आता पुढे काय?????
          
आता ह्या हॅम रेडियोवरून संभाषण कसे करायचे? आपण नेहमी फोन वरून बोलतो तसे बोलायचे का? म्हणजे आपली नेहमीची भाषा आपण वापरतो का? का फक्त मोर्सचीच भाषा वापरतो? असे अनेक प्रश्न आपल्याला पडत असतील. ह्याचे उत्तर असे की, संदेश पाठवताना आपण मोर्स कोडने पण ट्रान्समिट करू शकतो किंवा त्याऐवजी दुसरा प्रकार म्हणजे फोनेटिक्स आणि Q कोड्सने आपण संदेश पाठवू शकतो. आता हे फोनेटिक्स किंवा क्यू कोड्स म्हणजे नक्की काय, कुठलाही मेसेज आपण कशा प्रकारे पाठवतो, ते आपण पुढच्या भागात पाहू.

- केतकीवीरा कुलकर्णी

7 comments:

Unknown said...

Ambadnya

VIJAYSINH said...

nice info.

Rasikaveera Sant said...

Apt information & the procedure for documentations for Ham Radio. Thank you Ketki.

Viraj Sarode said...

Nice Articles... Ambadnya for sharing

ANANDSINH said...

Good info especially in marathi so that any one can understand in depth about getting & operating ham radio...Ambadnya

Vidula Yeolekar said...

Great information, ambadnya.

Unknown said...

Ambadnya, waiting further parts.

Post a Comment

Feedback

Name

Email *

Message *