Monday 12 September 2016

जॉन डाल्टन

     चिकाटी आणि जिद्द माणसाकडे असली, तर त्याच्या समोर कितीही आव्हाने आली, कितीहि विरोध आला, तरी त्याला न जुमानता आपल्या ध्येयाच्या दिशेने योग्य वाटचाल करुन, ते त्यांना हवे ते मिळवतातच.
हवामान शास्त्रामध्ये खरे तर आवड असणारे, मूळात वकिली किंवा वैद्यकीय शिक्षण घेण्याबद्दल विचार केला असताना, विज्ञान विषय घेऊन एक वेगळाच शोध लावणारे हे संशोधक. हे संशोधक म्हणजे जॉन डाल्टन!

     ज्याला आपण पाहू शकत नाही, स्पर्श करु शकत नाही, आणि नाही ते कोणत्या उपयोगात आणू शकत, ते विज्ञानात किंवा शास्त्रात कसे येउ शकते?? अठराव्या शतक संपेपर्यंत जवळपास सर्वच संशोधनकर्त्यांना हा प्रश्न भेडसावत होता.
     अठराव्या शतकामध्ये जॉन डाल्टन ह्यांनी जेव्हा ’अणु’ (परमाणु) (atom) ह्याची संकल्पना शोधून काढली त्यावेळी अधिकतर संशोधनकर्त्यांनी जॉन डाल्टन ह्यांना वेड्यातच काढले होते. कोणालाही त्यांच्या ह्या संशोधनावर फारशी काही पटली नव्हती, पण तरीदेखिल डाल्टन ह्यांना मात्र आशेचे किरण दिसत होते. ते त्यांच्या ह्या संशोधनावर आणि संकल्पनेवर ठाम होते. हवामानशास्त्राचा अभ्यास रसायनशास्त्राच्या दृष्टीकोनातून हवेबद्दल ते माहिती घेउ लागले. वातावरणामध्ये वायु एकत्रित रुपाने कसे राहतात ह्याचे उत्तर शोधण्यासाठी ते आपोआपच अणुच्या कल्पनेकडे वळले. अठराव्या शतकाच्या आधी ग्रीक तत्वज्ञ ’ल्युसिपस’ने अणुची संकल्पना मांडली होती. आणि ह्याही आधी हिंदु महर्षि कणद ह्यांनी ’पदार्थांचेसुद्धा मूल कण असतात’ ही संकल्पना मांडली होती. एवढेच नाही, तर ही संपूर्ण सृष्टी़च कणमय असल्याचे कणाद महर्षि ह्यांनी सांगितले होते. आणि ह्या दोन्ही संकल्पनांचा अभ्यास करुन जॉन डाल्टन ह्यांनी आपले संशोधन कार्य सुरु केले.
      जॉन डाल्टन ह्यांना संशोधन करण्यासाठी त्यावेळी अशी मोठमोठ्या प्रयोगशाळा उपलब्ध नव्हत्या आणि ज्या काही उपलब्ध होत्या त्यामध्ये डाल्टन ह्यांना प्रवेश मिळू शकला नाही. पण तरीदेखिल त्यांनी हिम्मत हरली नाही. त्यांनी निरिक्षण आणि चिंतन ह्या दोन गोष्टींचा नीट उपयोग करुन त्यांनी आपले संशोधन कार्य सुरु केले. हवामानशास्त्राचा अभ्यास करतांना त्यांनी केलेल्या हवेचे नमुने त्यांना उपयोगी पडले.
      हायड्रोजन वायुच्या शोधाला प्रमाण ठेवून त्यांनी ’एथिलीन’ व ’मिथेन" ह्या वायूंवर प्रयोग सुरु केला आणि त्यावेळी त्यांना ’अणु’ ह्या संकल्पनेवर पुर्ण विश्वास बसला. आपल्या सर्व निरिक्षणांवर आधारित ’रसायन वर्गीकरणाची नवी प्रणाली’ हे पुस्तक त्यांनी प्रकाशित केले. पुस्तक प्रकाशित करण्याआधी, त्यांनी आण्विक वस्तुमानाची प्रथम यादी जाहीर केली आणि त्यावर एक व्याख्यानही केले. त्या व्याख्यानामध्ये त्यांनी पुढील काही मुद्दे मांडले.
* सर्व द्रव्य अतिसुक्ष्म कणांनी बनलेले असतात आणि त्या मूलकणांना अणु असे म्हणतात
* एका मुलद्रव्याचे सर्व अणु समान असतात.
* दोन वेगळ्या मुलद्र्वयांचे अणु एकत्रित जर केले तरी त्यांचे गुणधर्म वेगवेगळे असतात.
* एका मुलद्रव्याचा अणु दुसर्‍या मुलद्रव्याबरोबर एकत्रित आल्यावर संयुग तयार होते, पण त्यांचे गुणधर्म भिन्न असू शकतात.
* अणुंचे अजुन अधिक जास्त प्रमाणात विभाजन नाही होऊ शकत.

डाल्टनची ही पाच तत्व ’डाल्टन अ‍ॅटॉमिक थिअरी’च्या नावाने प्रसिद्ध झाले. ह्यातील पाचवा मुद्दा, म्हणजेच अणुंचे विभाजन होऊ शकत नाही, हा कालांतराने बदलला गेला आणि अणुचे विभाजन होऊ शकते हे सिद्ध झाले. पण ह्यामुळे डाल्टन ह्यांचे महत्व कमी झाले नाही. कलर ब्लाईंडनेस असतांनासुद्धा, त्यावर रिसर्च करुन त्यास ’डॅल्टोनिसम’ म्हणुन जे ओळखले जाऊ लागले, असे हे जिद्दी, मेहनती जॉन डाल्टन आणि त्यांनी मांडलेले सिद्धांत आजही तेवढेच लोकप्रिय आहेत.

References: http://www.newscast-pratyaksha.com/hindi/john-dalton/

- केतकीवीरा कुलकर्णी 

0 comments:

Post a Comment

Feedback

Name

Email *

Message *