Wednesday 21 December 2016

मर्ल टेलर

असे दृश्य कदाचित दुर्मिळच आपल्याला बघायला मिळत असेल की एखादी व्यक्ती एका विशिष्ट गोष्टीतून किंवा एखाद्या व्यक्तीकडून प्रेरणा घेते आणि त्यानंतर मग त्या व्यक्तीचे आयुष्यच बदलून जाते. एक टर्निंग पॉईंट त्या व्यक्तीच्या जीवनात येतो आणि मग ती प्रेरणाच त्या व्यक्तीची आयुष्यभराची सोबती होऊन राहते. आता तुम्हाला कदाचित प्रश्न पडेल कि मला नक्की काय सांगायचं आहे!!! 
अशीच एक आपले आयुष्य एका छंद असणाऱ्या गोष्टीचे करिअर करून आजही त्याचा पुरेपुर आनंद वेचणारी व्यक्ती म्हणजे मर्ल टेलर.
आज वयाच्या ९३ व्या वर्षीसुद्धा मोर्स कोड चा आनंद घेऊन त्याची प्रॅक्टिस करणारी ही कॅनडिअन महिला.  
होय.. आज ९३ वर्ष झालेले असताना सुद्धा मर्ल टेलर मोर्स कोडची प्रॅक्टिस करत आहे.  

मर्ल टेलर
मर्ल टेलर ह्यांचा जन्म २ ऑगस्ट १९२३ साली झाला. ह्यांचे लहानपणीचे आयुष्य बघायला गेले तर अतिशय हाल अपेष्टांमध्येच गेलं. शाळेत असतांना त्या केअर टेकर म्हणून काम करत, ज्याचे त्यांना वर्षाला ५ डॉलर मिळत. पुढे ८वी ग्रेड पास झाल्यानंतर त्यांच्या घरच्यांना त्यांना पुढील शिक्षणासाठी बाहेर पाठवता आले नाही व ह्यामुळे त्यांनी ९ आणि १०वी ग्रेड बाहेरून केली. 
पुढे त्या मिलिटरीतील लोकांच्या कपड्यांना इस्त्री करून देण्याचे काम करू लागल्या. नंतर काही कारणास्तव त्या आजारी पडल्या व त्या घरीच होत्या. आणि त्याच वेळेस त्यांचे काका, जे एअर फोर्स मध्ये होते, ते त्यांना भेटायला आले. त्यांचा तो एअर फोर्सचा निळा युनिफॉर्म बघून त्यांना खूपच प्रभावी वाटले आणि त्या काळी दुसरे महायुद्ध चालू होते. अवघे १६ वर्षाच्या वयाच्या असणाऱ्या ह्या मुलीने तेव्हाच आपणही ह्या युद्धात आपले ही योगदान द्यायचे, हा मनाशी दृढ निश्चय केला. 
नंतर १९४२ साली आधीचा जॉब संपत आल्यावर त्यांनी एअर फोर्स मध्ये काही ओपनिंग आहे का हे शोधू लागल्या. काही ४ ५ प्रकारच्या पोस्ट्स तिथे होत्या त्यातील वायरलेस ऑपरेटर ग्राउंड ह्या पदासाठी त्यांनी जायचे ठरवले. त्यासाठी सर्वात महत्वाचे होते ते म्हणजे मोर्सची परीक्षा पास होणं.. 
टेस्ट मध्ये एक भाग असा होता की २  वाक्य मोर्स मध्ये पाठवले जातील आणि ते दोन्ही वाक्य सारखे आहेत का वेगवेगळे हे ओळखायचे.

मर्ल ह्यांनी ही परीक्षा पास केली आणि त्यानंतर त्यांना ट्रेनिंग दिले गेले. ट्रेनिंग नंतर नंबर १  शाळेमध्ये त्यांना पाठवण्यात आले. तिथे त्या मोर्स कोड कसा वापरायचा ते शिकल्या, तसेच लाईट्स फ्लॅग्स वापरून सिग्नल्स कसे पाठवायचे त्याचे ज्ञान त्यांनी करून घेतले. ह्याशिवाय रेडिओची थिअरी पण त्यांनी शिकून घेतली. 
जिथे १८ वर्ड्स पर मिनिट ह्या स्पीड ने मोर्स परीक्षा पास करणे गरजेचे होते, तिथे मर्ल ह्यांचा स्पीड मात्र २३ वर्ड्स पर मिनिट एवढा होता. ह्यावरूनच कळून येते त्यांची बुद्धी किती तल्लख असेल आणि त्याचबरोबर ह्यासाठी त्यांनी किती प्रयास केले असतील! पुढे त्यांची ही निपुणता बघून त्यांना वायरलेस इंस्ट्रक्टर म्हणून नेमण्यात आले. तिथे त्यांना पायलट वगैरे लोकांना मोर्सचे ट्रेनिंग द्यायचे होते. जे ट्रेनिंग नंतर युद्धासाठी कार्य करणार होते. 

एअरफोर्स मधील जॉब सोडल्यानंतर ही त्यांचे मोर्सवरचे प्रेम तसेच होते. १९८६ साली, जवळपास त्यांच्या वयाच्या ६३व्या वर्षी त्यांनी हॅम रेडिओ ऑपरेटर होण्यासाठी लागणारी परीक्षा १००% ने पास केली. पूढे त्यांनी त्यांच्या घरी हॅमचे बेस स्टेशन बसवून घेतले. 
आज वयाच्या ९३व्या वर्षीही त्या मोर्स सिग्नल वापरून संवाद साधत आहेत. जो कोणी भेटायला येईल त्यांनासुद्धा त्या मोर्स कोड बद्दल सांगून त्यांचे नाव मोर्स ने पाठवण्यास सांगत. 
खरंच ह्यावरून पुन्हा एकदा पटते की कोणतीहि चांगली गोष्ट करण्यासाठी किंवा शिकण्यासाठी ना वयाची मर्यादा आहे, ना कसल्या मोठ्या पदवीची. फक्त माझी जिद्द पाहिजे, की मग सगळ्या गोष्टी सुरळीत होऊ लागतात.  
त्यांच्या काकांचा युनिफॉर्म बघून त्यांच्या मनात उद्भवलेली इच्छा आणि ती पूर्ण होण्यासाठी त्यांनी घेतलेले प्रयास, हे आपल्याला खूप काही शिकवून जातात.
Start from where you are, with whatever you have. Make something out of it and never be satisfied
हे जॉर्ज कार्व्हर ह्यांचे वाक्य मर्ल टेलर ह्यांच्या बाबतीत शब्द अन शब्द खरे ठरतांना दिसते. 
MORSE KEY




4 comments:

Mahesh said...

Lovely info..
Inspiring to all of us..

Roopali said...

Ambadnya 😀

Nitin Gurav said...

खुप छान

Unknown said...

Hats off to dedication of Merle Taylor towards her passion and love for Ham Radio.

Ketaki superb informative article. Thanks for sharing such wonderful information.

Post a Comment

Feedback

Name

Email *

Message *