Thursday 29 June 2017

पुस्तक प्रकाशनाचा एक अभुतपूर्व सोहळा




लोटस पब्लिकेशन प्रा.लि. तर्फे काल म्हणजेच दि. २६ जून २०१७ रोजी दोन पुस्तकांचे प्राचार्य बी. एन. वैद्य सभागृह येथे प्रकाशन करण्यात आले. ह्या पुस्तकांचे प्रकाशन अभिनेते माननीय श्री सचिन खेडेकर व माजी पोलिस महासंचालक श्री प्रविण दीक्षित तसेच ह्या पुस्तकांच्या लेखिका आशालता वाबगावकर व डॉ. वसुधा आपटे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
गर्द सभोवती आणि गुन्हेगारांचे कर्दनकाळ ही दोन पुस्तकं म्हणजे वाचकांसाठी एक पर्वणीच आहे.


बिगर राजकीय दैनिक प्रत्यक्षमध्ये आलेल्या ह्या दोन्ही लेखमाला आता पुस्तकस्वरुपात सर्व वाचकांसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत.  
अध्यात्म हाच मूलभूत पाया आहे आणि ह्याच तत्वानुसार ह्या कार्यक्रमाची सुरुवात श्रीआदिमाता शुभंकरा स्तवनाने करण्यात आली. 
त्यानंतर दोन्ही मान्यवरांचे श्री सचिन खेडेकर व प्रविण दीक्षित ह्यांचे स्वागत दैनिक प्रत्यक्षचे संपादक जितेंद्र रांगणकर ह्यांच्या हस्ते करण्यात आले तसेच दोन्ही दिग्गज लेखिका आशालता वाबगावकर आणि डॉ. वसुधा आपटे ह्यांचे स्वागत दैनिक प्रत्यक्षच्या मार्केटिंग मॅनेजर कल्पना नाईक ह्यांनी केले. हा सोहळा म्हणजे वाचकवर्गासाठी एक मेजवानीच होती. 

बिगर राजकीय असणाऱ्या दैनिक प्रत्यक्षची बारा वर्षाची वाटचाल कल्पना नाईक ह्यांच्यकडून ऐकून खुपच छान वाटले. कोणत्याही प्रकारचे राजकारण नाही, कोणतीही 'सनसनी' बातमी नाही, पण अन्तरराष्ट्रीय घडामोडिंची प्रत्येक माहिती, तसेच अध्यात्मही ज्यामधे भरले गेले आहे अशा ह्या दैनिकाची बारा वर्षाची यशस्वी वाटचाल खरोखरच कौतुकास्पद आहे. 

त्यानंतर मान्यवर श्री प्रविण दीक्षित ह्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करतांना लेखिका डॉ. वसुधा आपटे ह्यांबद्दल माहिती ऐकून आश्चर्य वाटले. १९५० साली न्यायवैद्यशास्त्र ह्या सारख्या एका अनोख्या विषयामधे त्यांनी हात घातला आणि त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिले नाही. गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी, विशेषतः गुन्हेगार जर घरातलीच व्यक्ति असेल,  तर त्यांचा शोध ह्या न्यायवैद्यशास्त्राने कशा प्रकारे करता येतो, हे सर्व ह्या पुस्तकामध्ये डॉ. वसुधा आपटे ह्यांनी अत्यंत सोप्या शब्दात मांडले आहे. आणि ह्यामुळे हे पोलिसांसाठी जेवढे उपयुक्त असेल टेवढेच हे सामान्य लोकांसाठीदेखील एक वेगळी माहिती देणारे उपयुक्त पुस्तक ठरु शकते.  

मान्यवर श्री सचिन खेडेकर ह्यांचे मनोगत अत्यंत प्रभावशाली होते. फक्त मापक गोष्टिंचाच अभ्यास करणाऱ्या आजच्या तरुण वर्गाला हे पुस्तक खोलवर जाऊन वाचन करता येण्यासारखे असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच स्तंभ लेखनाचे महत्व त्यांनी विषद केले. जसा गायक रोज त्याचे गाणे अधिकाधिक सुधारण्यासाठी रोज न चुकता रियाज करतोच, तसेच विजय तेंडुलकर हे कसे रोज दोन तास त्यांच्या लिखानासाठी देत ह्याचे उत्तम उदाहरण दिले. आणि तसेच ललित लेखन, स्तंभलेखन असणाऱ्या आणि ६० वर्षाचा नाट्य कारकीर्दीतला गाढा अनुभव त्यांनी मांडला. आणि सर्वात शेवटी त्यांनी म्हटलेली विं. दा. करंदीकर ह्यांची एक सुंदर कविता म्हणजे दुधात साखरच!!  


दोन्ही लेखिकानी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. आशालता वाबगावकर व डॉ. वसुधा आपटे ह्यांनी ज्यांच्यामुळे त्यांनी  हे सर्व लिहून आपल्यासमोर मांडले आहे ते डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी ह्यांचे आभारही व्यक्त केले. 
अशा प्रकारे हा सूंदर सोहळा पार पडला. त्यानंतर ह्या पुस्तकांवर स्वतः आशालता वाबगावकर व डॉ. वसुधा आपटे ह्यांनी सह्या करून दिल्या. सह्या देतांना प्रामुख्याने तरुण वर्ग हे पुस्तक वाचण्यात रस दाखवत आहे है बघताना त्यांच्या चेहऱ्यावर असणारा आनंद खरच अमाप होता जो ह्या शब्दामध्ये व्यक्त करता येणार नाही. 
एकंदरितच हा कार्यक्रम खूप छान प्रकारे सम्पन्न झाला. आणि ह्या कार्यक्रमामधे मलाही सहभागी होता आले ह्यासाठी मी खूप मनापासून आभारी आहे. एका बाजूला गुन्हेगारांसाठी कर्दनकाळ आणणाऱ्या न्यायवैद्यशास्त्र डॉ. वसुधा आपटे ह्यांचे पुस्तक, जे अत्यंत कणखर असे की ज्यातुन एक आगळी वेगळी माहिती आपल्याला मिळणार आहे आणि दुसऱ्या बाजूला एका मृदु मनातील भाव व्यक्त केले गेले आहेत.  
दोन्ही पुस्तकं आवर्जून वाचण्यासरखी आहेत. ही पुस्तकं नक्कीच वाचावी!!!!
 

"गर्द सभोवती
Garda Sabhowati - गर्द सभोवती (Marathi Print Copy)
"गुन्हेगारांचे कर्दनकाळ न्यायवैद्यक शास्त्र
Gunhegaranche Kardankaal - गुन्हेगारांचे कर्दनकाळ (Marathi Print Copy)
https://www.e-aanjaneya.com/productDetails.faces?productSearchCode=GKDMDL

Gunhegaranche Kardankaal - गुन्हेगारांचे कर्दनकाळ (Marathi E-Book)
https://www.e-aanjaneya.com/productDetails.faces?productSearchCode=GKDMAR

- केतकी कुलकर्णी

1 comments:

Akshata Achrekar said...

Ketkichya manatil Bhavna shabdat khup sunder ritya utarlya ahet..khup khup dhanyavad..Lotus Publication be Khupach veglya vishayanchi pustake vachnyasathi anli ahet. Amhi nakki vachu..Thnx once again.

Post a Comment

Feedback

Name

Email *

Message *