हॅम रेडिओ अंतर्गत मागे एका लेखा मध्ये आपण मॉर्स
कोड म्हणजे काय ह्याची एक संक्षिप्त माहिती बघितली. मॉर्स भाषेमध्ये डिट्
(.) आणि डा (-) ह्यांचा वापर केला जातो. आणि प्रत्येक अक्षराला एक विशिष्ट
प्रकारचा कोड दिला गेला आहे. आणि मॉर्स मधून संदेश हा ध्वनीरुपाने पाठविला
जातो. हे आपण बघितले.
पण अशी काय गरज भासली की हा कोड अस्तित्वात आला?
हा प्रश्न प्रत्येकाला पडू शकतो. कारण हा कोड एखाद्याला, किंवा अगदी
नवख्याला तसा किचकटच वाटणारा आहे. मग ही अशी भाषा शोधली गेली?
आपण
बर्याचदा एक म्हण वापरतो - गरज हीच शोधाची जननी आहे. ह्या गरजेतूनच नवीन
शोधांची उत्पत्ती होते, जशी ह्या भाषेची झाली आहे. ज्यांच्या नावाने हा कोड
ओळखला जातो, ते सॅम्युएल मॉर्स, ह्यांनी ह्या भाषेचा शोध लावला. सॅम्युएल
मॉर्स हे शास्त्रज्ञ होते का?? तर त्याचे उत्तर आहे - नाही. ते एक आर्टिस्त
होते. पोर्ट्रेट पेंटर. त्यांचा स्वतःचा एक आर्ट स्टुडिओ होता. मग असा एक
आर्टिस्ट असाणार्याला अशी काय गरज भासली, आणि एक आर्टिस्ट असूनही त्याने
एक आगळी वेगळी भाषा जगासमोर कशी काय आणली?
सॅम्युएल मॉर्स ह्यांची
पत्नी एकदा खूप आजारी पडली आणि त्यावेळी मॉर्स हे काही कामा निमित्ताने
दुसर्या ठिकाणी होते. मॉर्स ह्यांना त्यांची पत्नी खूप आजारी असल्याचा
संदेश मिळाला आणि ते तातडीने त्यांच्या पत्नीस भेटण्यासाठी निघाले. पण तिथे
पोहोचताच त्यांना कळले कि त्यांच्या पत्नीचे निधन झाले आहे व तिला
पुरलेदेखील गेले होते. त्यानंतर वर्षभरात त्यांचे वडिल आणि त्याच्या पुढील
तीन वर्षात त्यांची आई, ह्यांचे एकापाठोपाठ एक निधन झाले. त्यांना अतिशय
दुःख झाले होते. त्यांना वाटू लागले, जर आपल्याला आपल्या पत्नीच्या
आजाराविषयी वेळीच माहिती मिळाली असती, तर तिच्या शेवटच्या क्षणी आपण तिथे
उपस्थित राहू शकलो असतो.
![]() |
Telegraphy System |
ह्या सर्व दुःख परिस्थि नंतर त्यांनी
टेलिग्राफी वर विचार करण्यास सुरुवात केली. टेलिग्राफीमधून संदेश दूरगावी
पोचवण्यात मदत होत होती.
![]() |
Telegraphy System |
इलेक्ट्रिक पल्सच्या सहाय्याने हा संदेश पाठवला
जात आणि त्यामुळे समोर असलेल्या मशीनने एका फिरत्या कागदाच्या फीतीवर निशाण
बनत होते. हे निशाण समजण्याकरता एका कोडची आवश्यकता होती.
ह्या
निशाणांना मॉर्सने सर्वात पहिले एक कोड दिला. पण त्यांनी प्रत्येक शब्दाला
एक कोड दिला होता. त्यामुळे प्रत्येक वेळी पुस्तकामध्ये बघून मेसेज पाठवायला
लागत होता, जे फारच त्रासदायक ठरु लागलं. पुढे मग अलफ्रेड वेल ह्यांनी
प्रत्येक अक्षराला एक कोड दिला. अक्षरांबरोबरच त्यांनी काही विरामचिन्हे
आणि आकड्यांना पण कोड ठेवला. डॉट्स आणि डॅश ह्यांच्या एका विशिष्ट क्रमाने हा कोड डिझाईन केला गेला.
आता
कोणत्या अक्षराला कोणता क्रम, हे कसे ठरवले गेले? तर त्यांनी अक्षरांचा
अभ्यास केला ज्यामध्ये त्यांना असे आढळून आले, कि E हे अक्षर सर्वात जास्त
वापरले जाते. ह्या अक्षराचा उपयोग जास्त वेळा केला जातो. आणि म्हणून मग
त्यांनी ह्या अक्षराला सर्वात छोटा कोड म्हणजे एक डॉट (.) दिला गेला. आणि
अशाच प्रकारे इतर अक्षरांना ही कोड दिला गेला.
![]() |
Numbers assigned to each word |
हा कोड बनवल्या नंतर पहिला संदेश होता, ते बायबल मधले एक वाक्य - What Hath God Wrought, म्हणजे देवा हे तु काय केलं?
हळूहळू
टेलिग्राफी मधली कागदी फीत मागे पडू लागली. टेलिग्राफ ऑपरेटर्स हा नवीन
कोड वाचण्याऐवजी ऐकून शिकू लागले. आणि पुढे डॉट्स आणि डॅश ह्यांचा उच्चार
डिट् आणि डाह मध्ये केला जाऊ लागला. शॉर्ट आणि लॉंग बीप्स मध्ये हे सिग्नल
ऐकू येतात. डिस्ट्रेस सिग्नल हा SOS म्हणून संबोधला जाऊ लागला, त्याचे कारण
एवढेच होते की इमर्जंसी मध्ये तीन डॉट्स आणि तीन डॅश पाठवणे सोपे होते आणि
ते लक्षात ठेवायला ही सोपे होते. नंतर त्याचा अर्थ Save Our Ship, Save
Our Soul, अशा वाक्प्रचरांमध्ये होऊ लागला. ह्या मॉर्स कोडचा उपयोग
दुसर्या महायुद्धाच्या वेळी प्रचंड प्रमाणात झाला.
आजही मॉर्सचा उपयोग
बर्याच प्रमाणात होत आहे, इमर्जंसीच्या काळामध्ये तर संवाद साधण्याचं हे
एकमेव साधन ठरतं. मॉर्स कोड हा आता नवनवीन टेक्नॉलॉजीमुळे वेगवेगळ्या
प्रकारे पाठवता येतो. कोणी फ्लॅश कार्ड पाठवून, कोणी टॉर्च लाईटच्या
सहाय्याने तर कोणी गाण्यातून, ड्रम वाजवून अगदी, कोणत्याही प्रकारे पाठवू
शकतो.
पूर्वीच्या काळी संदेश तार यंत्रणेच्या सहाय्याने पाठवला जात होता. आणि ज्या गावात संदेश पाठवला जायचा, त्या गावातील तार केंद्रवर तो संदेश सांकेतिक कोड मध्ये लिहिला जात होता. आणि मग हा सांकेतिक कोड डिकोड केला जायचा. हा कोड म्हणजे मोर्स कोडच होता. म्हणजेच हा मोर्स कोड इथेही उपयोगात येत होता. आज तार यंत्रणा जरी बंद झाल्या असल्या तरीही मोर्स कोडचा वापर मात्र अजूनही होत आहे. आणि येणारा काळ बघता, हा कोड शिकणं एक फक्त छंद किंवा आवड न राहता प्रत्येकाची गरज बनू शकते, असे म्हणण्यास हरकत नाही.
पूर्वीच्या काळी संदेश तार यंत्रणेच्या सहाय्याने पाठवला जात होता. आणि ज्या गावात संदेश पाठवला जायचा, त्या गावातील तार केंद्रवर तो संदेश सांकेतिक कोड मध्ये लिहिला जात होता. आणि मग हा सांकेतिक कोड डिकोड केला जायचा. हा कोड म्हणजे मोर्स कोडच होता. म्हणजेच हा मोर्स कोड इथेही उपयोगात येत होता. आज तार यंत्रणा जरी बंद झाल्या असल्या तरीही मोर्स कोडचा वापर मात्र अजूनही होत आहे. आणि येणारा काळ बघता, हा कोड शिकणं एक फक्त छंद किंवा आवड न राहता प्रत्येकाची गरज बनू शकते, असे म्हणण्यास हरकत नाही.
तर अशा प्रकारे उगम पावलेल्या ह्या मॉर्स कोडचा अभ्यास नक्कीच
interesting आहे. ही भाषा शिकण्यात एक वेगळीच गंमत आहे. कमीतकमी एकदा तरी
हा मॉर्स कोड नक्कीच शिकण्याचा प्रयास करा, मग हळूहळु त्यामध्ये रुचि
आपोआपच निर्माण होईल.
References:
3 comments:
Va khup chan Ketakiveera lavkarach amhi tisrya Bhagat tumcha actual demo vdo chi vaat pahat ahot
Sunder , satya aahe mos kode hi kalachi garajch aahe
मॉर्स ह्यांना उशिरा मिळालेल्या संदेशामुळे ते पत्नीच्या जीवनाच्या अंतिम क्षणी उपस्थित राहू शकले नाहीत, ते पोहोचेपर्यंत तिचे अंतिम संस्कारदेखील झाले होते, याचे त्यांना अतीव दुःख झाले, पण ते दुःख उगाळत बसले नाहीत, त्यांनी इतरांवर अशा प्रकारच्या दुःखाला सामोरे जाण्याची वेळ येऊ नये या करुणेने परिश्रम वेचले आणि मोर्स कोडनिर्मिती केली, या ब्लाॅग पोस्टद्वारे ही मौलिक माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
Post a Comment