Tuesday, 23 December 2014

"मायक्रोचिप इम्प्लांट" " 'मेंदूच्या' मक्तेदारीला धोका" - अतीशय सुंदर लेख

हरी ॐ
दि. ६/१२/१४ च्या दैनिक प्रत्यक्ष वर्धापनदिन विशेषांकामधील "मायक्रोचिप इम्प्लांट"  " 'मेंदूच्या' मक्तेदारीला धोका" हा मिहिरसिंह नगरकर ह्यांनी लिहिलेला लेख वाचला.
वाचून अगदी थक्क व्हायला झाले. तंत्रज्ञान हे विकसित होत आहे हे तर आपल्याला माहीतच आहे पण ते ज्या झपाट्याने आणि ज्या पद्धतीने प्रगत होत आहे हे बघितल्यावर कधी कधी पुढे काय होईल ह्याची काळजी वाटल्याशिवाय रहात नाही. मायक्रोचिप इम्प्लांट वाचतना काहीसे असेच माझे ही झाले.



मायक्रोचिप इम्प्लांट म्हणजे एका विशिष्ट काचेच्या 'कॅप्स्यूल' मध्ये 'आरएफआयडी ट्रान्सपॉन्डर' (Radio Frequency Identification Transponders) बसवलेली यंत्रणा असते. सध्याच्या घडीला हे 'इम्प्लांट्स' आकाराने फक्त एका मोठ्या तांदूळाच्या दाण्याएवढे असतात. ही यंत्रणा शरीराबाहेरील संगणक किंवा एखाद्या संगणक संचालित - प्रणालीशी माहितीची देवाण घेवाण करू शकते. म्हणजेच ओळख पटवणे, वैद्यकीय इतिहास जाणने, संपर्कासाठीची माहिती मिळवणे, आपण असलेल्या स्थानाची अचूक माहिती देणे, इत्यादी माहितीची देवाण घेवाण ह्या 'इम्प्लांट्स' द्वारे होते.

सुरुवातीला वाचताना मला हे सगळे एकदम भारी वाटत होते. कारण ह्या इम्प्लांट्सचा एक महत्वाचा फायदा हा आहे की ह्यामुळे कोणी डायबेटिक पेशंट असेल आणि त्याच्या साखरेचे प्रमाण कमी जास्त होत असेल तर ह्या चिप मधून साखर नियंत्रित करणारे इंस्युलिन प्रसवते व ह्याशिवाय एकाच वेळेस त्यांच्या घरच्या व्यक्तीला साखर अचानक कमी किंवा जास्ती झाले तर ते 'एस. एम. एस'द्वारे पाठविण्याचि सोय होते. एवढेच नाही तर 'ब्रेन' किंवा 'हार्ट'च्या उपायांवर ही 'मायक्रोचिप इम्प्लांट' उपचारक ठरत आहे.
हे 'आरएफआयडी ट्रान्सपॉंडर्स' चार प्रकारे शरीरामधे किंवा शरीराशि जोडले जाऊ शकतात...
* इलेक्ट्रॉनिक टॅटू'(Tattoo)
* औषधाच्या गोळीबरोबर पोटात जाऊन स्थिरावणारे 'आरएफआयडी ट्रान्सपॉंडर्स'
* नॅनोबॉटस् (Nanobots)
* वेअरेबल्स (Wearables)
हे सगळे वाचताना आधी तर छान वाटले.म्हटल वा! किती छान! ह्यामुळे प्रत्येकाला वेळीच उपचार मिळून आजाराचे नियंत्रण केले जाऊ शकेल..
पण नंतर ह्याची पुढची माहिती वाचून धक्काच बसला...

ह्या मायक्रोचिप इम्प्लांटमधे आपली ओळख तर असतेच पण त्याच बरोबर आपल्या बँकेची खाती, क्रेडिट व डेबिट कार्ड, एटिएम(ATM) आणि करासंबंधीची सर्व माहिती साठवून ही माहिती नोंद करण्याच्या सर्व प्रचलित पद्धति कालबाह्य करायच्या. माणसाने स्वतः (त्याच्या शरीरातील इम्प्लांट) स्वतःची चलती फिरती बँकेची खाती आणि क्रेडिट व डेबिट कार्ड व्हायचे अशी योजना काही अर्थतज्ञ, समाजशास्त्रज्ञ व सत्ताधारी वर्गातील मंडळी आखत आहेत.

आता ह्यामुळे पैशांची चोरी, सुरक्षितता वाढेल व फसवणुकीचे प्रकार देखील कमी होऊ शकतील पण त्याचबरोबर एक खुप मोठा धोका आहे की इलेक्ट्रॉनिक रिडरद्वारे ही माहिती वाचली जाऊ शकते. आणि असाच धोका Conspiracy Theorist ह्यांनी ही दर्शविलि आहे. ह्याच लेखात पुढे ह्याचे काही धोके ही दिले आहेत. ही चिप व्हायरस ने बाधित होण्याची शक्यता आहे.. व त्यामुळे स्वतःलाच स्वतःची ओळख पटवून देण्यात त्रास होउ शकतो, तसेच ह्यामुळे कर्करोगाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे, शिवाय माणसाला मंद बनवतात व काही काळासाठी माणसाची बुद्धि नष्ट करण्याची व त्याच्या सर्व आठवणी पुसून टाकण्याची क्षमता देखील ह्या मायक्रोचिप इम्प्लांटस्मध्ये आहे. असे अजुन अनेक दुष्परिणाम आहेत.

हे सर्व वाचले की चाहूल लागते ती आगमी तिसऱ्या महायुद्धची! घरा घरात येऊन ठेपणारे हे युद्ध काहीसे असेच असेल नाही का!
आपलीच माहिती हॅक करणे किती सहज झाले आहे ह्यामुळे.. ह्या युद्धात होरपळला जाणार तो एक सामान्य माणूस ह्याची कुठेतरी खात्री आता पटु लागली आहे; कारण स्वतःचीच ओळख पटवून देणे अवघड झालेले असेल..विचार करा जर आपण आपणच आहोत हे आपल्याला सिद्ध करता आले नाही तर काय वेड लागेल. हे मग आपल्या पातळीवरील युद्धच नाही का?

तसेच या मायक्रोचीप्स इन्प्लांटद्वारे माणूस कुणाचा किंवा कशाचा तरी गुलामच होणार ना? स्वातंत्र्य कुठे राहते मग. हा लेख वाचत असताना डोळ्यासमोर एक चित्रपट आला. डीमोलेशन मॅन. १९९३मध्ये आलेला  सिल्हवेस्टर स्टेलोन्चा हा चित्रपट असून यात मायक्रोचीप इन्प्लांटची झलक पाहण्यास मिळते. पहायला एकदम रंजक चित्रपट आहे. पण त्यातील तथ्य जर नीट आणि चौकस बुद्धीने पाहीले तर या तंत्रज्ञानाचे संभाव्य धोके डोळ्यासमोर येतात. मनुष्यावर नियंत्रण मिळवू इच्छिणार्‍या आणि त्यांना गुलाम बनवू इच्छीणार्‍या काही मूठभर लोक या तंत्रज्ञानाचा कसा स्वार्थीवापर उद्दातीकरणाचा मुखवटा घालून करीत आहेत हे या चित्रपटात दिसून येते.
हा लेख वाचताना आठवते ते परम पूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंनि दिलेले आरोग्यावर केलेले प्रवचन. हा लेख वाचल्यावर परत एकदा आरोग्याच्या व्याख्यानाचे महत्त्व पटले. जर आधीच आरोग्याची नीट काळजी घेतली गेली तर ह्या सर्व अशा प्रकारच्या उपायांची गरजच मुळी पडणार नाही. कारण शेवटी "PREVENTION IS BETTER THAN CURE". आणि ह्यामुळे आपण स्वतःला जपु शकु. खरोखर माझ्या ह्या सदगुरुला त्रिवार अंबज्ञ!!!

- केतकीवीरा कुलकर्णी

4 comments:

Makarand said...

Hari om
Kontyahi goshtiche fayde aahet..tasech tote pan aahet.
Aapla drashtikon kahatwacha.

Unknown said...

exactly !!!
वरून चांगले दिसते म्हणून भारावून न जाता त्यामध्ये असलेले धोके पण बघितले पाहिजेत .
n its very imp for us ...
Ambadnya ketakiveera for sharing such imp info with us ...
1 min · Like

Sunny Sand said...

Good information......

Unknown said...

Very informative article Ketakiveera .. I loved how you connected it with 3rd World War and the recent speech given by Bapu on 'Self Health' ... Great going ...

Post a Comment

Feedback

Name

Email *

Message *