मी काय गाणं गाऊ तुझे
तूच एक गीत रे
मी काय शब्द रचू तुजवर
तूच एक काव्य रे
मी काय लेख लिहू तुजसाठी
तूच एक कादंबरी रे
मी काय करू स्तुति तुझी
तू सौंदर्याची खाण रे
मी काय नैवेद्य अर्पू तुजला
तूच अन्नदाता रे
मी काय स्नान घालू तुजला
तूच तेजाचे स्त्रोत रे
मी काय पूजन करू तुझे
तूच भक्तीचा दाता रे
बापू...
करुन घे हा 'मी'च पूर्ण तुझा
अन होऊ दे आमचे जीवन
तुझ्याच शब्दांचा एक ग्रंथ रे
हे त्रिविक्रमा तू प्रेमळ आहेस आणि मी अंबज्ञ आहे
अंबज्ञ
केतकीवीरा कुलकर्णी
3 comments:
सुंदर..... मी काय गाणं गाऊ तुझे....तूच एक गीत रे...... अप्रतिम
This was THE BEST kavita i have read in last 1 month... Awesome..
Khup Ambadnya Ketakiveera
Poem - 1 _जीवन तुझ्याच शब्दांचा एक ग्रंथ रे
खूपच छान लिहिली आहेस...
Post a Comment