Saturday, 20 December 2014

Self Health - By Dr. Aniruddha D Joshi (Sadguru Aniruddha Bapu)

Self Health- Trivikram
Photo Courtesy : Aniruddha Kaladalan

13 डिसेम्बर 2014 रोजी परमपूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापू एक डॉक्टर म्हणून, म्हणजेच Dr. Aniruddha Dhairyadhar Joshi आरोग्यावर जवळ जवळ 5 तास बोलले. ह्यात आता अगदी लहान वयापासून ते म्हातार्‍या लोकांना होणारे कॉमन आजार कुठले ते कशामुळे होतात हे सगळे बापूंनी सांगितले.
प्रत्येक आजाराचे मूळ कारण लट्ठपणा आहे. मग तो आजार diabetes असो, high BP असो, heart संबंधी असो की स्पोंडेलिसिस, arthritis गुढघेदुखी असो! सगळे आजार होण्यामागचे एक महत्वाचे कारण म्हणजे लट्ठपणा. मग मला हा लट्ठपणा कमी करण्यासाठी काय करायला पाहिजे आणि काय नको ह्याचे मार्गदर्शन बापूंनी केले. रोजच्या अन्नामधे मी काय खायला पाहिजे, जीभेवर माझे नियंत्रण असणे किती आवश्यक आहे ह्याचे महत्व पटवून दिले. "आपण मानव आहोत पशु नाही..."

साखर... रोजची साखर न खाता त्याऐवजी glucose d साखर म्हणून वापरावी जेणेकरून मला नेहमीच्या added sugar मधे असणाऱ्या fructose चा त्रास होणार नाही. 
फळ,भाज्या(कोबी, भेंडी, वांगी, गाजर, मेथी, लाल भोपळा....)ह्या सारख्या fiberयुक्त भाज्या खाव्या. ह्याशिवाय मासे खाणाऱ्यांनी ते deep fry किवा जास्ती मसाल्याचे न बनवता, ते कमी तेलात shallow fry करून खावे. व्यायमाची आवश्यकता समजवुन सांगितली. त्याचबरोबर, आपल्या शरीरात bacteriaचे प्रमाण खुप आहे आणि त्यात चांगले bacteria व वाईट bacteria असतात. आपल्याला चांगले bacteria वाढवणे गरजेचे असते. आणि हे चांगले bacteria आम्बवलेल्या पदार्थमधून मिळतात. ईडली, डोसा, घरचे दही, आम्बिल, अश्या प्रकारचे खाणे खायला हवे. खुप प्रमाणात उपवास केल्यामुळे वाईट bacteria वाढत जातात. वाईट bacteria वाढले की त्यामुळे मग आळस, depression ह्या सारख्या गोष्टी वाढू लागतात. चांगले bacteria वाढणे म्हणजे ह्या सर्व रोगांना लांब ठेवले जाऊ शकते.

आध्यात्मिक दृष्टया बघितले तर हे चांगले bacteria आणि वाईट bacteria म्हणजे माझ्यातले चांगले बीज आणि वाईट बीज...चांगले खाऊन आणि चांगली योग्य संगत ठेऊन मी माझा भौतिक, आध्यात्मिक अशा सर्वच पातळींवर माझा विकास करण्याचा प्रयास करीन. ज्या प्रामाणे मी माझ्या उचित अहाराने चांगल्या bacteriaची वृद्धि करू शकतो तसेच माझे आचार विचार विहार शुद्ध ठेवण्याचा प्रायस केल्याने मी माझ्यातले चांगली बीजे वाढवू शकतो.
शेवटी खत पाणी घालणारा मीच आहे.. आणि माझ्या सहाय्याला माझ्याबरोबर माझा त्रिविक्रम! मी चांगले योग्य प्रकारे खत घातल्यास 'तो' माझ्यातले चांगले बीज वाढवून त्याचे मजबूत वृक्ष बनवायला उभाच आहे. कारण छोटे असणारे बीजाचे मोठे रोप व एक मजबूत वृक्ष होते ते शेवटी सूर्याच्या दिशेनेच.. जसा सूर्य त्याच्या तेजाने, प्रकाशाने रोपांना वाढवत राहतो तसाच सद्गुरु (सूर्य)त्याच्या उचित मार्गदर्शनाने(प्रकाशाने) त्याच्या बाळांना अधिकाधिक सामर्थ्यवान बनवत राहतो जेणेकरून कुठल्याही परिस्थितीत त्याची बाळ सक्षम व सबळ राहु शकतात.

१३ तारखेचे हे व्याख्यान व त्यातील महत्त्वाचे मुद्दे समिरसिंह दत्तोपाध्ये म्हणजे समिरदादांच्या ब्लॉगवर येतीलच. तसेच बापूंनी सांगितल्याप्रमाणे वेबसाईट देखील येणार आहे....तर त्याचीही आपण वाट पाहूया

अंबज्ञ
केतकीवीरा कुलकर्णी

2 comments:

Unknown said...

॥ अंबज्ञ ॥ ॥ अंबज्ञ ॥ ॥ अंबज्ञ ॥

Reshma Narkhede said...

hari om very nicely written...
mi dekhil ha seminar anubhavala
very nice...

apale aarogya aapalya haatat asalyache spasta kalale

Post a Comment

Feedback

Name

Email *

Message *