Thursday, 4 December 2014

हॅम रेडीओ - 1

Ham Radio
अनिरुद्धाज ऍकेडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट अंतर्गत मला हॅम रेडीओचे प्रशिक्षण घेण्याची संधी मिळाली. खुप आधी पासून ह्या विषयाची उत्सुकता होती. आणि परम पूज्य बापूंनी अर्थात माझ्या डॅडनी माझी ही इच्छा पूर्ण केली. याबद्दल मी अंबज्ञ आहे. त्यामुळेच काही लेखांमध्ये आपण हॅम रेडीओची माहीती जाणून घेणार आहोत.

Amateur radio किंवा Ham radio म्हणजे असा समूह ज्यात लोक समोरच्या इतर amateur radio चालकांशी संपर्क साधातांना Transmitters व receiversचा उपयोग करतात. ह्या amateur रेडियो ऑपरेटर्स ना ham रेडियो ऑपरेटर्स किंवा फक्त hams म्हणून ओळखले जाते.
ह्यामधे एक विशिष्ट प्रकारची सांकेतिक भाषा वापरली जाते, ज्याला Morse Code असे म्हणतात.  "डा" (-) व  "डिट" (.) अशा प्रकारची ही भाषा असते. ह्या Morse Code च्या सहाय्याने संदेश गुप्तपणे पाठवण्यास मदत होते.




ह्याचा उपयोग बहुदा मिलिट्री मधे वगैरे जास्ती होतो. समोरच्याला जर कळू द्यायचे नसेल की संदेश काय आहे तर तेव्हा हे उपयोगी ठरते. कोड language मधे बोलल्यामुळे गुप्तता राखली जाते.
त्याचबरोबर जेव्हा कधी कुठलीही आपत्ती येते तेव्हा आपली सर्व संवाद साधण्याची उपकरणे बंद पडतात. cell phones, computers, satellite cables ह्या सर्व सेवा विस्कळीत होतात व अशा वेळी ह्या ham radiosचा खुप उपयोग होतो. emergency संदेश पाठवताना जर संदेश पाठवणार्या आणि घेणार्याकडे दोन्हीकडे जर हे साधन असेल तर त्याला अशा बिकट प्रसंगी कोणतीही अडचण निर्माण होणार नाही.
Radio amateur बनण्यासाठी लायसेंस मिळवण्याची आवश्यकता असते व ह्यासाठी कुठल्याही विशिष्ट शैक्षणिक अहर्तेची गरज लागत नाही. हॅम रेडियोची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर आपल्याला लायसेंस मिळतो. restricted व general असे दोन ग्रेड परीक्षेत असतात.
परिक्षेमधे इलेक्ट्रॉनिक्सचे बेसिक व morse code हे विचारले जाते. संपूर्ण परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर आपण general ग्रेड ने पास होतो. जार morse कोड मधे आपण अनुत्तीर्ण झालो तर restricted ग्रेड मिळतो.

Continue....

1 comments:

Anonymous said...

Hari om, nice article...awaiting part 2..Ambadnya

Post a Comment

Feedback

Name

Email *

Message *