Thursday, 1 January 2015

कनेक्शन


Connection
अगदी रोजच्या वापरातला किती महत्वाचा शब्द आहे ना हा!
अगदी तंत्रज्ञानापासून ते आपल्या रोजच्या जीवनात ह्या शब्दाचा समावेश होतो. 
हल्ली तर सोशल मिडीया साइट्सवर हा शब्द हमखास वापरला जातो. बेसिकली Connection म्हणजे जोडणे.. 
मी अमुक अमुक व्यक्तिशी फेसबुक किंवा ट्वीटर किंवा आणखी कुठे कनेक्ट झालो म्हणजेच माझा त्या व्यक्ति बरोबर फेसबुक किंवा इतर माध्यमांद्वारे संपर्क जोडला गेला..


आता हा संपर्क जोडण्यासाठी मला इथे माध्यमांची गरज पडते.. आणि एकदा ते connection झाले की मग आपला इतर अन्य व्यक्तींबरोबर संवादाचा प्रवाह चालू होतो..
तंत्रज्ञानामध्येही बघितले तर एखादी वायर जेव्हा एखाद्या पॉझिटिव्ह किंवा नेगेटिव्ह पॉइंटला जोडली(connect केली) जाते तेव्हा त्यातुन विद्युत प्रवाह चालु किंवा खंडित होतो...

पण शेवटी सर्वात महत्वाचे कनेक्शन कोणते? 

तर माझा आणि माझ्या भगवंतामधला असणारा दुवा!

कारण एकदा मी 'त्याच्याशी' जोडला गेलो ना की मग कुठलीही ताकद मला इतर कुठल्याही ठिकाणी असणाऱ्या माझ्या चांगल्या कनेक्शनपासून मला लांब करू शकत नाही. तो भगवंत माझ्याशी कनेक्ट व्हायला उभाच असतो. 'तो' हे नाही बघत की त्याच्याशी जोडली जाणारी व्यक्ति पॉझिटिव्ह (चांगली) आहे की नेगवटिव्ह (वाईट) आहे. तो त्याच्या अकारण प्रेमाचा प्रवाह अव्याहतपणे प्रत्येकासाठी चालूच ठेवतो. मी जर एखाद्या वाईट व्यक्तिशी जोडला गेलो तर माझ्या स्वतःची बिघडण्याची एक शक्यता असतेच.. पण भगवंताचे मात्र तसे नसते., उलट वाईट व्यक्ति परमेश्वराशी जोडली गेली तर ती व्यक्ति सुधरु शकते.. उदा. वाल्या कोळीचा झालेला वाल्मीकि ऋषि!

म्हणून मी कसा ही असलो तरी मला माझ्या भगवंताशी जोडून घ्यायचा प्रयास करत राहायला पाहिजे. 'तो' खुप प्रेमळ आहे आणि मला स्वीकारायला आतुर असतो. त्या एकाशी जोडलेले connection कधीच खंडित होत नाही..उलट जास्तीत जास्त मजबूत होत जाते ते आपल्या प्रयासांनी व त्या प्रयासांना मिळालेल्या 'त्या'च्या अमूल्य साथीमुळे. 

अत्ताच १३ डिसेंबर २०१४ रोजी सद्गुरु अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या आरोग्यावर केलेल्या व्याख्यानामध्ये एक वाक्य सांगितले...REAL HEALTH COMES FROM CONNECTION WITH THE GOD!!!
इथे ही हे दिसून येतेच की आपल्या देवाशी, आपल्या सदगुरुंशी आपले connection जोडणे किती महत्वाचे आहे. कारण शेवटी आपले आरोग्य हे ही महत्वाचे आहेच.. आरोग्य नीट नसले, कुठलाही छोटा आजार जरी झाला तरी त्याचे परिणाम किती टोकापर्यंत गंभीर होऊ शकतात हे सगळ्यांनाच माहीत असते. आणि त्यामुळे उत्तम आरोग्य राखण्यासाठी, निरोगी राहण्यासाठी मला माझ्या सदगरुशी "जोडलेले" राहणे अत्यंत महत्वाचे आहे.

ह्याशिवाय बापूंनी 25 डिसेम्बर 2014 ला सांगितले की 2015 हे साल प्रेमाचे आहे. मला प्रत्येकाशी प्रेमाने राहायचे आहे. पण सर्वात आधी मी माझ्या देवाशी प्रेमाने वागायचा प्रयास केला पाहिजे कारण त्याच्यावर आपण जितके प्रेम करतो त्याच्या दुप्पट प्रेम तो आपल्यावर करतो... ह्याच संदर्भातली एक ओवी सुंदरकांडमध्येही येते.. 
।।जनि जननी मानहु जियँ ऊना। "तुम्ह ते प्रेम राम कें दूना"।।

आणि त्याचे प्रेम जेव्हा मिळायला लागते, तेव्हा मग आपोआपच आपल्यातही त्याचे प्रेम हळूहळू उतरु लागते आणि मग आपल्याला ही प्रेम करायला तोच शिकवायला येतो. पण त्याचे हे प्रेम मिळण्यासाठी त्याच्याशी जोडले जाणे हे अत्यंत महत्वाचे आहे. प्रेम भावना पवित्र कनेक्शन दृढ करते. एकच प्रयास असावा की माझ्या देवाचे आणि माझे connection एकदम घट्ट असले पाहिजे.. ही मैत्री एकदा एकदम पक्की झाली की बस्स! 
हर पल, हर दिन, हर जनम, हर मंजिल पर सिर्फ खुशहाली ही खुशहाली!!

आपल्या आयुष्य आपल्याला जसे हवे असते त्या गोष्टींशी आपण स्वतःला जोडून घेत असतो. जर मला माझे आयुष्य सुखी, समाधानी, यशस्वी अशा पवित्र गोष्टींनी भरायचे असेल तर मी माझे कनेक्शन पावित्र्याशीच जोडले पाहीजे....अपावित्र्याशी कनेक्शन जोडून पावित्र्य कसे काय प्राप्त होऊ शकते? 

2 comments:

manatarang.blogspot.com said...

खुप सुंदर लेख. अंबज्ञ

Unknown said...

REAL HEALTH COMES FROM CONNECTION WITH THE GOD!!! Absolutely ...it can't get more accurate than this ...beautiful post Ketakiveera ....Let us first try to Love Him wholeheartedly and rest everything will fall in place .. Happy New Year !

Post a Comment

Feedback

Name

Email *

Message *